मातृत्वाची भावना जपणारे, डॉ.श्रीपाद जोशी साहेब मला भेटले¡. - श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक ,जत हायस्कूल, जत.

मातृत्वाची भावना जपणारे* :
मला भेटले. डॉ.श्रीपाद जोशी साहेब!
    - श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत. 
🟪🟧
 
जत हा शब्द मी शाळेत असताना पाठ्यपुस्तक शिकताना असताना, सांगली जिल्ह्यातील एक मोठा तालुका व दुष्काळ छायेमध्ये असतो.एवढचं मला माहिती होते ‌
 बघा हो जीवन! मी जत मध्ये ३५वर्ष शिक्षक म्हणून सेवा करेल, असं केंव्हाच वाटले नव्हते! आज मी लेखमालिका लिहित आहे. कारण सेवानिवृत्तीच्या  दिशा  जवळ येत आहे. माझ्या मनातील भावनेला वाट करून देण्यासाठी मी वाट पाहतोय!
 मला या जत आणि या तालुक्यात सर्वांनी खूप दिले आहे. आलो तेंव्हा छत  नव्हते,
पाघराला पांघरूण नव्हते,मायेचा हात नव्हता!
आज रोजी लाखो प्रेमाचे! मायेचे हात! माझ्याजवळ आहेत!
त्यातील एक हात माझ्या मातृत्वाची भावना जपणारा !
डॉ.श्रीपाद जोशी या ज्ञानयोगी 
माझ्या गुरूचा...!
    मी जत मध्ये सन - १९८८ साली आलो तेंव्हा मी मूक बधिर विद्यालय जत चे मुख्याध्यापक श्री.कदम सरांना विचारले जत शहरात नवीन, प्रसिद्ध काय आहे. मला सांगा.तेंव्हा त्यांनी सर्व काही माहिती सांगितली. 
आपल्या संस्थेचे आश्रयदाते,जत हायस्कूल, जतचे मुख्याध्यापक मा.डॉ.श्रीपाद जोशी, छान बोलतात, सुंदर अक्षर आणि प्रेमाने बोलणारे 
हे एक आदर्श शिक्षक आहेत!
तेवढ्यात डॉ.श्रीपाद जोशी यांनी लिहिलेले पत्र शाळेत आलं ....!
श्री.कदम सरांनी मला ते पत्र मला दिले. बघा  हे सुंदर अक्षर! ते पत्र घेऊन मी वाचु लागलो! अक्षरांचे लेणे ,वळणदार अक्षर बघून त्यावेळी  मला न बघताच हा ज्ञानयोगी ची भेट आजच घेणार असं मनाशी ठरवले . आणि श्री.कदम सरांना सांगितले.आज शाळा सुटल्यानंतर जायचे...!
माझ्या मनात डाॅ.श्रीपाद जोशी साहेब कसे असतील ? ह्या भावना जागृत झाला.
  आमचे  मूक बधिर विद्यालय जत हे कुलकर्णी मळ्यामध्ये होते. शाळा सुटल्यावर मी ,कदम सर जत हायस्कूल,जत निघालो.मी कदम सरांना विचारतं होतो. शिंदे सर ,तुम्ही जरा थांबा हे बघा ....! ते बघा पांढरे वेशभूषा, हातात पुस्तके, दुसऱ्या हातात पट्टी हे शिक्षक 
कोण असेल शिंदे सर मला सांगा?
असे श्री.कदम सर म्हणाले...!
हेच असणार डॉ.श्रीपाद जोशी 
शंभर टक्के.....!
कदम सरांनी मला विचारले तुम्ही कसं ओळखले! त्यांच्या पट्टी मुळे..!अक्षर लेखन करताना अत्यंत महत्त्वाचे साधन...!
आम्ही सरांच्या दिशेने  निघालो. सर, आमच्याकडे आले आणि कदम सर नमस्कार! कदम साहेब नमस्कार केला आणि हे कोण तुम्हांला नमस्कार सर ओळख करून देतो. आमच्या विद्यालयांमध्ये कलाशिक्षक म्हणून श्री सुभाष शिंदे आले आहेत. त्यांना तुमच्या बरोबर बोलायचं आहे .त्यासाठी आम्ही आलोय मग चला की ऑफिसमध्ये जाऊन बसू या ! मी ऑफिसला जाऊन बसलो .गप्पाला सुरुवात कशी झाली वेळ कसा गेला हे कळालं नाही. मला पण या सरांचा नातं आपलं पहिलं असेल अशी भावना झाली ..रात्र झाली साहेब म्हणाले, सुभाषराव उद्या शाळा सुटल्यावर या आपण पुढील चर्चा करू या....आता आपण  निरोप  घेऊ. आणि आम्ही निघालो. ..
परत मी शाळा सुटली की जत हायस्कूल ,जत मध्ये येत असे.  विविध गोष्टी, अक्षर लेखन, सामाजिक ,शैक्षणिक याविषयी  डॉ . जोशी साहेब यांच्या शी बोलत असे! सर्व बोलताना  मला  साने गुरुजी  बरोबर  बोलतो ! काय असं वाटू लागलंय ... आम्हांला मूक बधिर विद्यालय जतला पगार केंव्हा  मिळेल नक्की  सांगता येत नव्हतं.त्यावेळी सर गावी जाताना पाकिटात  काही रक्कम आम्हाला देत असे !    आणि काही लागलं तर सांगा हे शब्द आम्हाला  आधार देत होते . दिवाळी सण आला की ,आमचा  पगार आम्हांला  नव्हताच .. कसं तर एसटीला पैसे होते .ते घेऊन मी गावी गेलो आणि घरच्यांना सांगितले. दिवाळीचे पदार्थ थोडेच करा .पगार सुरू झाला की आपण दिवाळी मोठ्या प्रमाणात करू, दिवाळीच्या आधी दोन दिवस श्री.कदम सर बुधगावाला  एक पाकीट घेऊन आले. त्यामध्ये काही  रक्कम होती.हे पाकीट  डॉ . श्रीपाद जोशी साहेबांनी दिवाळी सणासाठी दिली आहे. दिवाळी सण साजरी करा, असं सांगून कदम सर त्यांच्या गावी निघून गेले. ते पाकीट म्हणजे दिवाळी सण साजरा करण्याची इच्छा होती .ती इच्छा पूर्ण करण्यासाठी साहेबांनी हा क्षण जीवनातील ज्ञानयोगी हा असा मी पाहिला !                                                         मा.श्री.ऐनापुरे साहेब , डॉ . जोशी साहेब मूकबधिर विद्यालय,जत मध्ये येऊन विद्यार्थ्यांची चौकशी करीत असे                                       माझा निर्णय : गावी  बुधगावाला आल्यानंतर आपण परत मूक बधिर विद्यालय,जत ला  परत जायचं नाही .असं मी ठरवलं. सर्वच प्रश्न निर्माण झाले होते .जत  मध्ये राहून आपलं जीवन कसं जगायचं हा प्रश्न माझ्यापुढे होता .मी मुंबईला निघालो.तिथे माझे दाजी पी.एस.आय .होते .त्यांच्याकडे गेलो मुंबईमध्ये नोकरी करावी असं मला वाटलं. तिथे पण नोकरी मिळेल असं  वाटतंय.. मी मुंबईला मरोळ पोलिस कॅम्पस मध्ये राहत  होतो. तेथे  श्री . पाटील साहेब होते .त्यांनी मला सांगितले  की तुला दैनिक सामना  मध्ये   नोकरी बघू या...! मी तेथील  साहेबांना विचारून  दोन दिवसात पाटील साहेबांनी दैनिक सामना कार्यालय ,मुंबई येथे जाऊन आले . मुलाखतीला येण्यासाठी भेट घेतली.  त्यावेळी मी दैनिक सामना चे कार्यकारी संपादक साहेबांची होते  .त्यांनी भेट घेतली.मी त्यांना सर्व माहिती सांगितली आणि पान नंबर चार चे काम त्यांनी  मला दिले. एका ट्रे मध्ये बातम्या ,फोटो  आणि मला वेळ  ४५ मिनिटे वेळ दिला .
आणि म्हणाले हे पेज  तयार करून  माझ्याकडे ये ! मग मी तुझं काम बघतो ‌.आणि ते कार्यालय निघून गेले .मी दैनिक केसरी प्रमाणे ते पेज तयार केले. फोटोसाठी जागा योग्य प्रमाणात निवड केली .आणि साहेबांच्या कडे गेलो. साहेब म्हणाले काय रे!  पेज तयार केले. साहेब ....झालं !  चल बघूया !माझं काम बघल्या नंतर साहेबांच्या...शब्द त्यांच्या तोडून आला  वा... वा...! तू आजपासूनच दैनिक सामनामध्ये हजर हो. अशा रीतीने माझी दैनिक सामना , मुंबई मध्ये कामकाज सुरू झाले . माझं मोठे भाग्य! सभेमध्ये बोलताना ,टी .व्ही .मध्ये बघत
होतो. त्यांच्या थोरांच्या सहवासात मला काम करण्याची संधी मिळाली हे भाग्यच माझं!
मला दैनिक सामना मुंबई मध्ये पहिले व शेवटचे पेज तयार करण्याची संधी मिळाली. प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा होता. तरी ग्रामीण भागातील होतो. पण प्रत्येक कामात एक वेगळेपण होते. माझ्या स्वभावामुळे सर्वांना माझे  काम आवडू लागले.पण दैनिक सामना, मुंबई मध्ये जास्त काळ काम करू शकलो नाही.
    वेळ कशी असती बघा... माझ्या वडिलांचा अपघात झाला.त्याच्या सेवेसाठी मी परत बुधगावाला आलो. वडिलांना औषध ,पाणी केले. बराच कालावधी गेला. पुन्हा तोच प्रश्न नोकरी शोधावी लागणार ? सांगली जिल्हा परिषद मध्ये माझ्या मित्राचे मामा जेष्ठ लेखनिक होते.त्यांनी तात्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.श्री.म.ल.देसाई साहेब त्याची भेट झाली.माझा प्रवास 
ऐकल्यावर साहेब म्हणाले ,सुभाषराव तुमचं काम मी नक्कीच करणार मला पाच दिवस द्या....!
परत मुंबईला जाण्याच्या निर्णय परत घेतला नाही.
दुसऱ्या दिवशी मला पाच शाळेची नावे दिली. तुला कुठे जाण्यासाठी आवडेल? असे साहेबांनी विचारले.... पहिल्या पासून शेवटपर्यंत यादी वाचली. मला फक्त तीन क्रमांकाची शाळा आवडली! त्यापुढे बरोबर चिन्ह केले. साहेबांनी यादी बघत मला विचारले सुभाषराव तुम्ही तीन क्रमांकाची शाळा का निवडी?
मी जत मध्ये नोकरी केली आहे. त्यावेळी  डॉ.श्रीपाद जोशी, साहेबांच्या हाताखाली काम करण्याची इच्छा आहे. तुम्ही जर संधी दिली तर....
साहेब म्हणाले ...माझे पण डाॅ.जोशी साहेब आदर्श गुरूवर्य आहेत.
योग्य वेळी तुम्हांला निरोप देतो .  असे  मग  जतला जावा. तुमचं काम शंभर टक्के होणार!
मा.श्री. देसाई साहेबांच्या रूपा मध्यें देवच मला भेटला...!
काही दिवसांनी मी जत हायस्कूल,जत मुलाखतीला गेलो . आणि सेवेला सुरूवात झाली. पण पगार सुरू होई पर्यंत डॉ.जोशी जबाबदारी घेतली. सेवा करताना काही अडचणी येत होत्या. पण त्यातून मार्ग काढत होतो. विद्यार्थी, विद्यर्थ्यिनी खुष होत्या.त्यांना कलाशिक्षक  मिळाला होता . मी रेखाटन करताना....!उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात मला पण आनंद वाटायचा.मी पण  नव नवीन प्रयोग करून जिल्हा राज्यस्तरीय  चित्रकला, नाट्य,गायन स्पर्धेत सहभागी होऊन विविध बक्षिसे मिळाली तेव्हा पालकांना वाटले की कलेला प्रोत्साहन दिले पाहिजे. आणि कलेचा सुगंध दरवळला आणि जिल्हा, राज्यस्तरीय बक्षिसे माझ्या   हातात दिसु लागली. डॉ.श्रीपाद जोशी साहेबांना चित्रकला विषयांचं ज्ञान छान होते! स्वातंत्र्याची ७५वर्ष या विषयावर माझी चित्रे, सरांनी स्वातंत्र्यदिन याविषयीची सुविचार, सुवचने लेखन केले.हे चित्रप्रदर्शन जत शहरात पहिले होते. जत करांनी 
प्रतिसाद मला आवडला...!
(पुढील भाग लवकर देत आहे.वाचा आणि प्रतिक्रियाचे स्वागत आहे.)

Comments