कथा एका माझ्या चित्रकला स्पर्धेची ! - श्री.सुभाष शिंदे (बुधगाव) जत
कथा एका माझ्या चित्रकला स्पर्धेची!
- श्री.सुभाष शिंदे,(बुधगाव)जत
कथा एका माझ्या,
चित्रकला स्पर्धेची..! 🥇🎨🎨🎨🥇🥇🥇🥇💐💐🎨🎨✍️🥉🥉🥉💐💐💐💐
-श्री.सुभाष शिंदे ( बुधगाव) कलाशिक्षक,जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत.ता.जत.जि.सांगली.
🟤🔵🔴🟡🟣🟤🔵🔴🟡🟤🔵🔴🟡🟣
सन-१९८०-१९८१ ला बुधगाव हायस्कूल, बुधगाव. मध्ये इयत्ता -८ वी मध्ये माझे शिक्षण सुरू होते.कलाशिक्षक -गुरूवर्य परीट सरांची प्रेरणा होती. ते कोणत्याही चित्रकला स्पर्धेच्या विशेषी मला माहिती देत असतं. मी पण चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी होत असे. माझी अडचण रंग साहित्य विपुल प्रमाणात माझ्याकडे नव्हते. घरी रंग साहित्य मागितलं की मिळतं नसे. पण स्पर्धेत सहभागी होणार हे मात्र माझं नक्की होतं! मी मित्रांना खराब किंवा शिल्लक रंग मागत असे.त्यापासून रंग साहित्य जमा करीत असे.
सांगली मध्ये आमराई मध्ये भव्य चित्रकला स्पर्धा होती. असं मला समजले होते.त्या स्पर्धेमध्ये सहभागी फक्त आमचा गावचा मी एकटाच होतो. बुधगाव ते सांगली पाच किलोमीटर अंतर होते. एस टी ने जाण्यासाठी पैसे नव्हते.सायकल पण माझ्या कडे नव्हती. चित्रकला स्पर्धेला कसं जायचं हा प्रश्न माझ्यासमोर होता .चित्रकला स्पर्धेला सांगलीला जाणार हे घरी व शाळेत सुद्धा सांगितलेलं नव्हते .स्पर्धेचा दिवस उजाडला .मी स्पर्धेसाठी लागणारे साहित्य ,रंग ,पोस्टर खडू, पट्टी ,पेन त्याची एक पिशवी तयार केली .आणि शाळेचे दप्तर घेऊन शाळेत गेलो. माझ्या मित्राला मी सांगितलं की हे दप्तर तुझ्यापाशी असू दे ! माझ्या मित्राने विचारलं तू कुठे निघालास? मी चित्रकला स्पर्धेला सांगलीला आमराई मध्ये जात आहे .तुझ्या जवळचे रंग मला दे !अरे ....बुधगाव पासून आमराई खूप लांब अंतर आहे. कसं जाणार ? माझ्या मित्राने मला विचारलं ,अरे मला त्या चित्रकला स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे. मी जुन्या बुधगाव रोड ने चालत ,चालत त्या चित्रकला स्पर्धेला जाणार आहे .हे माझं ऐकून माझ्या मित्राने माझ्या हात, हातात घेऊन मला त्याने चित्रकला स्पर्धेला शुभेच्छा दिला ! त्यांने त्याच्या जवळचे सगळे रंग साहित्य मला दिले. वा..! सुभाष ! तू स्पर्धेमध्ये सहभागी हो !आणि बक्षीस घेऊन ये बरं का ! मी कुणाला न सांगता जुन्या बुधगाव रोड ने आमराई दिशेने चालत जात होतो. मनात जिद्द होती .आपण त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आणि बक्षीस मिळवायचे! चालत ,चालत,चालत जाताना खूप वेळ झाला .आणि स्पर्धा संपायच्या वेळीच मी आमराई मध्ये पोचलो. तेथील संयोजकांनी माझ्याकडे बघितले. हे बाळ कुठून आलायस ? साहेब !मी बुधगाव वरून आलोय ते साहेब खवळले .अरे तुला स्पर्धेची वेळ कळत नाही का रे .स्पर्धेची वेळ बारा ते दोन वाजेपर्यंत ची होती आणि तू आता दीड वाजता आला आहेस! वेळेचे भान तुला नाही का? मी शांत उभा होतो. आणि त्यांना मी नमस्कार केला. मला चित्रकला स्पर्धा आणि स्पर्धेची वेळ मला माहिती होती. पण ...इथे येण्यासाठी एसटी साठी पैसे नव्हते .आणि माझ्याकडे सायकल पण नाही आणि रंग कसे तर गोळ्या करून येथे आलो आहे. ते चिडलेले साहेबांनी मला जवळ घेतले .तुझं नाव सांग काय आहे? .मी सुभाष शिंदे बुधगावाचा आहे. तुला स्पर्धेसाठी सहभागी होता येईल. पण एक अट आहे ....कोणती ? बघ तीस मिनिटांच्या आत तुझं चित्र काढले पाहिजेल .आणि तू दिलं पाहिजेल हे जर तुला मान्य असेल तर तू या चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊ शकतोस . मला खूप आनंद झाला .मी पण त्यांनी सांगितलेली वेळेच्या आत चित्र काढून देतो. असे मी म्हणालो ...! मला या चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संधी मिळाली .संयोजकांनी मला कागद दिला माझ्या मित्रांच्या रंग साहित्यातून एक सुंदर निसर्ग देखावा! मी रेखाटन करून रंगकाम करीत होतो. माझे चित्र बघण्यासाठी आजूबाजूचे मुलं माझ्याकडे येत होती .अरे वा! ...वा छान! छान !असे म्हणत होती .मी चित्र काढलं आणि विसाव्या मिनिटालाच ते चित्र मी संयोजकांच्या हाती दिले.ते खुश झाले अरे तू एकटाच आहेस .होय ,मी शाळेत, घरी पण सांगितलं नाही . संयोजकांनी मला म्हणाले या चित्रकला स्पर्धेचा निकाल दहा मिनिटात लागणार आहे. या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळायचा आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसत होता ! तेथे जवळच हनुमान मंदिर दिसलं आणि जाऊन दर्शन घेतलं आणि हनुमानाला माझ्या मनाने सांगितलं हनुमान देवा !तुझ्यामुळे मला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. मी त्या मंदिरा जवळ बसलो होतो.चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर होत होता. मी काही त्या निकाल ऐकण्यासाठी गेलो नव्हतो .तेवढ्यात माझं नाव पुकारलं माझा त्या चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता. पण तिथं मी नव्हतोच ...साहेब, मला शोधू लागले.अरे शिंदे ! या मंदिरापाशी काय करतोयस... चल , तुझं चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहेस . हे ऐकल्यावर मला खूप आनंद झाला. . मला बक्षीस प्रमाणपत्र आणि मला पन्नास रुपयाची रक्कम मला मिळाली होती .मी ते बक्षीस घेतल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. संयोजकांनी मला परत स्टेजवर बोलवलं. संयोजक म्हणाले हा मुलगा चित्रकला स्पर्धेसाठी बुधगाव वरून सांगली ला चालत आला आहे .आणि त्यानं कमी वेळेमध्ये चित्र सुंदर काढून प्रथम क्रमांक मिळाला आहे! त्याबद्दल त्याचं हार्दिक अभिनंदन !!!
आमच्या गावचे प्राथमिक शिक्षक पण चित्रकला स्पर्धेसाठी मुले घेऊन आले होते .त्यांनी सांगितलं सुभाष आता चालत जायचं नाही .माझी सायकल आहे. तुला मी डबल सीट घेऊन जातो .तेवढ्यात रात्र झाली होती. घरातली सर्वजण मला शोधत होती. कुठे गेला सुभाष ..कुठे गेला माझ्या मित्राने घरी जाऊन माझं दप्तर दिलं .आणि सुभाष चित्रकला स्पर्धेला सांगलीला गेला आहे .असं सांगितलं. घरच्यांना बरं वाटलं .घरचे सगळे घरा बाहेर उभे होते .तेवढ्यात गुरुजींच्या सायकलवरून मी बुधगावात आलो .आणि आई मला खवळली तुला सांगून जायला काय होतं .आम्ही किती वाट बघायची ?.....गुरुजी, म्हटले अहो ! सुभाषाला रागवू नका .त्याचा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आला आहे . सर्वांनी माझं अभिनंदन केलं ! त्यावेळी आमच्या गावामध्ये एकच वृत्तपत्र येत असे त्याचं नाव नव संदेश आणि हा पेपर आमच्या घराच्या समोर च्या दुकानात येत होता .त्या दुकानातील मालकानं पेपर मधलं माझं नाव पाहून माझ्या वडिलांना बोलावलं .तुझ्या पोराचं नाव पेपर ला आले आहे.वडिलांना सुद्धा खूप आनंद झाला .कारण पेपरला नाव कोणाचीही आलं नव्हतं ,माझ्या पोरानं चित्रकलेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळून पेपरला नाव आणलं .आणि त्यांच्या डोळ्यात आनंदअश्रू आले.ते सर्वांना सांगत होते. माझ्या मुलाचा पहिला क्रमांक आला ! ही आठवण ज्यावेळी माझ्या मनात येते त्यावेळी मनात विविध भावना येऊन माझ्या पण डोळ्यात आनंदअश्रू येतात.आनंद खूप होतो !
कथा एका माझ्या चित्रकला स्पर्धेची !
तुम्हांला कथा आवडली तर प्रतिक्रिया लिहिण्यासाठी विसरू नका....!
माझ्या जीवनातील कलेच्या प्रवासातील अनेक प्रसंग लिहिण्यासारखं आहे ते लिहिणार आहे.
- श्री.सुभाष शिंदे (बुधगाव) कलाशिक्षक,जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स जत,जत.ता.जत जि.सांगली
🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨
Comments
Post a Comment