माझ्या जीवनातील चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पहिले बक्षीस प्राप्त झालं... पण ! स्वागत मात्र! माराने झाले! - श्री.सुभाष शिंदे
स्वागत मात्र ! माराने कौतुक !
- श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक
प्राथमिक शाळा पासून कलेची आवड होती! त्या वेळी प्राथमिक शाळेत चित्रकला स्पर्धा कमीच होत्या. मला माध्यमिक शिक्षणाची ओढ लागली होती. चौथी पास झाल्यानंतर मी बुधगाव हायस्कूल, बुधगाव मध्ये प्रवेश घेतला . कारण चित्रकला विषय शिकविण्यासाठी कलाशिक्षक आहेत. याचा आनंद मला खूप झाला होता. प्रवेश मे महिन्यात घेतला. पण शाळा सुरू जून महिन्यात! मला जून महिना केंव्हा येईल असे झाले होते. दि.११जून ला शाळा सुरू झाली. मी सकाळी १० वाजता गेलो. शिपाई मामा मला खवळले ये पोरा सकाळी -१०.३०वाजता शाळेला ये.मी परत घरी गेलो आणि परत वेळेत शाळेत गेल्यावर खुप आनंद झाला.शिपाई मामा ला विचारले, चित्रकला शिक्षकांचे नाव काय आहे? त्या शिपाई मामा ने जवळ घेतले सकाळी लवकर तूच आला होतास ना....!
होय, त्यांने माझी मुलाखत घेतली. त्यांना कळलं या मुलाला चित्रकला विषयाची आवड आहे. त्यांनी मला नाव विचारले मी सुभाष सदाशिव शिंदे सांगतात त्यांची माझ्या वडिलांची ओळख होती. ते म्हणाले सदा पेटी मास्टर मुलगा आहेस.! मी त्यांना तुमचं काय ? मी भाई मामा सांगितले. त्य शाळेत आपलं कोणीतरी ओळखीचे आहे. .असं मला वाटलं! श्री.स्वामी सर थोड्या वेळाने येतील तू वर्गात बस जा.
प्रार्थना झाली सर्व शिक्षक, शिक्षिका समोर होते.पण चित्रकला शिक्षक श्री.स्वामी सर कोणते हे माहित नव्हते?
वर्गशिक्षक वर्गात आले,यांनी वेळापत्रक दिले. त्यामध्ये तिसरा तास चित्रकला विषयाचा होता.माझं
लक्ष्य होतं तिसरा तासा कडे सर वर्गात आले. वेशभूषा पांढरा रंगाचा हसतमुख चेहरा मला ते देवदूत आल्यासारखे वाटले! सर्व उभे राहून गुड मॉर्निंग..! मी अशी उडी मारली ... आनंदाने!!!! पण सरांनी मला उभे केले. त्यांना वाटलं हा खोडकर मुलगा आहे.
मला माझ्या हातावर छडीने मारलं. मला खूपच वाईट वाटलं ह्या सरांची किती प्रेमाने वाट बघत होतो.त्या स्वामी सरांनी मला शिक्षा केली. सरांचे फलक रेखाटन सुंदरच होते. मला आनंद व्यक्त करताना भिती वाटायची .ते परत मला मारतील. चित्रकला तास संपल्यानंतर वाईट वाटलं तो तास दिवसभर असावा असं मला वाटला. छोटी सुट्टी झाली. सेवक भाई मामा माझ्याकडे आले . सुभाष तुला शिक्षक खोली जायचे आहे. मी म्हणालो का ? तुला ओळख करून देतो.... चित्रकला शिक्षक श्री. स्वामी सरांची .. मी नाही म्हणालो? चल सर चांगले आहेत. माझी सेवक मामांनी ओळख दिली. ते सर म्हणाले या शिंदे ओळख झाली आहे. मला त्यांनी काही प्रश्न विचारले... अरे च्या! मला वाटलं तू मुद्दाम असं केलं! त्यांनी मला जवळ घेतले . तुला चित्रकलेची आवड आहे ना. मी तुला छान शिकविणार! मला खूपच आनंद झाला.मी त्यांच्या पाया पडलो.
दुसऱ्या दिवशी स्वामी सर वर्गात आले. आणि म्हणाले मी एका विद्यार्थ्याला समोर बोलाविणार आहे. सगळे जण एकमेकांकडे बघुन गप्प बसले!
सर म्हणाले सुभाष शिंदे तू समोर ये! मुलांना वाटले काल मार खाल्ला आहे. आणि आज पण मार मिळणार ...हसु लागले. माझा गणवेश जुन्या होता. मी पुढे गेलो स्वामी सर म्हणाले मी रेषा मारणार तू त्यातून काही तरी रेखाटन कर ! नाही केला तर छडी मिळेल..... मी तयार आहे असे सरांना म्हणालो. मुलं शांत झाली.त्यांना वाटलं आज पण मार मिळणार? सरांनी रेषा मारल्या मी त्या रेषेच्या पासून चित्रे रेखाटली.हे पासून मुले टाळ्या वाजवून माझं अभिनंदन करीत होती...! सरांनी मला जवळ बोलावले सुभाष तू कलाकार होणार! माझ्या पाठीवर चित्रकला शिक्षकांची थाप पडली !
सरांची आणि माझी मैत्री जमली. माध्यमिक शिक्षण घेत असताना चित्रकलेचा सुवर्ण अक्षरांत प्रवास सुरू होता.अडचण होती. घरच्या गरिबीमुळे मला कलेसाठी साहित्यासाठी पैसे मिळत नव्हते. आमची शाळा बाजारपेठ मध्ये होती. मी माध्यमिक शिक्षण घेत असताना माझ्या दोघी बहिणी पण माध्यमिक शिक्षण घेत होत्या.
मला माझ्या बहिणीना एक कल्पना सुचवली. मी फुग्या पासून पक्षी तयार करतो.तुम्ही बाजारात विक्री करायची. त्यांना पण पैशाची गरज होती. मी वडीलांना न सांगता आम्ही बहीण,भाऊ यांनी फुगा पासून खेळणी तयार केली.आणि विक्री केली. आम्ही लागणारे सर्व साहित्य आणले. सायंकाळी माझे वडील घरी आले. हे घ्या पैसे बहिणीला वह्या आणा व सुभाष तुला पुढल्या आठवड्यात चित्रकला वही आणून देतो.
तेवढ्यात बहिण म्हणाली पैसे नकोत! आमच्या भावाने आम्हाला पैसे दिले आहेत. त्यांना आम्ही बहीण ,भाऊ यांनी स्व: कामातुन पैसे मिळविले . हा प्रसंग पाहून वडिलांच्या डोळ्यात पाणी आले!
माध्यमिक शिक्षण सुरू होते. चित्रकला स्पर्धेत इयत्ता -६ वी असताना सामाजिक वनीकरण विभागाच्या चित्रकला स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक पटकावला. बक्षीस वितरण समारंभ दिनांक यांची मला माहिती नव्हती.
शनिवारी , बक्षीस समारंभ होणार होता. कार्यक्रमाची तयारी झाली.समारंभ मध्ये माझे नाव घेतले.पण बक्षीस घेण्यासाठी मी गेलो नाही. तेंव्हा त्या समारंभात माझ्या दोन्ही बहिणी ओरडत होता भाऊ बक्षीस घेण्यासाठी जा रे.... ! मी उठलो नाही म्हणून सरांनी माझ्या पाठीवर थाप मारली .
बक्षीस घेण्यास का जात नाहीस? सर माझा गणवेश फाडका आहे. पॅटला ढिगळ आहे.मी पुढे गेलो तर मुले हासतील सर! तरी पण तू बक्षीस घेण्यास जा! मी बक्षीस घेण्यास स्टेज वरती गेलो.एक हात पुढे... एक हात मागे..!
त्यावेळी माझ्या कृतीने सर्वांना समजले! माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं!
घरी आल्यावर माझ्या बक्षिसांचे पैसे आणि वडिलांनी काही पैसे यातून मला नवीन गणवेश आणला!
माझ्या जीवनातील चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक!
पण स्वागत मात्र माराने!
Comments
Post a Comment