माझी कलेची पहिली प्रेरणा बुधगावातील श्री हनुमान मंदीरातील फळा!
- श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत.
मुळ गाव: बुधगाव ता.मिरज जि.सांगली
इयत्ता १ ली पासून चित्रकलेचा छंद मला होता.तेंव्हापासून रेखाटन, रंगकाम यांचा दररोज सराव नेहमीचा असायचा ...!
एकवेळ अभ्यास कमी पण चित्रकला सराव जास्त करायचा..!
घरातील माझ्या बहिणी मला रागावत सारखी चित्रे काढतोस अभ्यास कधी करणार? ते कागद, रंगत साहित्य लपून ठेवत असतं आणि माझ्या वडिलांना सांगयच थोडा त्रास होता पण ते माझ्या चित्रांना त्यांना अभिनंदन करायला विसरले नाहीत!
माझ्या घरांतील पाचजण शिक्षण घेत होते.घरातील परिस्थिती गरिबीची होती.त्यामुळे कला विकास करण्यासाठी साहित्य कमतरता मला भासु लागली.तेंव्हा एक कल्पना सुचली.माझ्या घराजवळ श्री हनुमान मंदिर आहे.तेथे फळा होता. तेथे पुजारी गुरव मामा होता.त्यांची मैत्री केली.त्याला मी विचारले पुजारी मामा मंदिरात फळांवर फक्त शनिवारी हनुमानाचे चित्र काढू का? तो माझ्या कडे बघून म्हणाला खरच तुला चित्र काढता येतात.... मी म्हणालो हो! चित्र काढायला परवानगी मिळाली पण खंडू ला पैसे शाळेत गेल्यावर श्रीमती दातार मॅडमना एक खंडू मागितला मॅडमनी विचारले कशाला पाहिजेल...?
मी त्यांना सांगितले शनिवारी मी मंदीरात फळ्यावर श्री हनुमान चे रेखाटन करणार आहे. त्यांना माझी संकल्पना आवडली. त्यांनी मला एक नाही चार खंडू दिले. मला खूपच आनंद झाला! शनिवारी सकाळी शाळा सुटल्यावर मी दप्तर घरात ठेवून. पळत मंदिर गेलो.फळा स्वच्छ केला. तेवढ्यात पुजारी मामा आले आणि म्हणाले सुभाष .... काय करतोय....? त्यांना परत एकदा सांगितले श्री हनुमानाचे चित्र रेखाटन करतोय...! हो का अरे तू सांगितलेलं विसरुन गेलो बुवा! तू चित्र काढ... चित्र छान तर बरं! नाहीतर तुला फळा स्वच्छ करायला पाहिजेल.. मी म्हणालो ठीक आहे.
मी मंदिरातील मूर्ती ला नमस्कार केला.चित्र काढायला सुरुवात केली.माझे रेखाटन सुरू झालं... तसं पुजारी मामा म्हणू लागले.वा वा..... छान छान पोरा ! प्रत्येक शनिवारी चित्र काढायला येत जा ...!
मला खूपच आनंद झाला. माझ्या कलेला ईश्वरकृपा झाली. त्यादिवशी आमच्या श्रीमती दातार मॅडम यांनी गुपचूप मंदिरात येऊन चित्र बघून गेल्या. हे मी दूर उभे राहुन पाहिले! दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मॅडम यांनी मला जवळ बोलावले आणि माझं अभिनंदन केले!
आणि चित्रकलेची वही व तेलकट रंगीत खंडूची
पेटी दिली. माझ्या कलेला दिलेली ही दाद होती!
मॅडम यांनी सांगितले की दररोज सुविचार व चित्रे शाळेत काढायची बरं का? माझ्या मित्रांनी घरात जाऊन सांगितले मग काय .... घराची मॅडमना सांगतले.... अभ्यास करायला सांगा.
मग प्रत्येक शनिवारी श्री हनुमान मंदिरातील फळांवर काढत होतो. मला साहित्यासाठी पैशाची
गरज होती. मला एक कल्पना सुचली मंदिरातील फळांवर चित्र काढुन त्याखाली मला मदत करा
असं लिहिलं! चित्र बघण्यासाठी आलेल्या लोकांनी मदत करायला सुरुवात झाली.मला प्रत्येक शनिवारी पाच ते दहा रुपये मिळायला
लागले. मग घरातील कुणाही न सांगता कलेचा
विकास करण्यासाठी संधी मिळाली!
तेव्हा पासून आज अखेर बुधगाव मध्ये श्री.सिध्देश्वर व जोर्तिलिंग.यात्रा व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा वेळी बुधगावाच्या श्री हनुमान मंदिरातील फळांवर आज अखेर श्री हनुमानाचे चित्र काढतो....! या चित्र काढायला आज रोजी ५६ वर्ष होत आहेत. माझ्या कलेची प्ररेणा मी विसरलो नाही!
आजसुद्धा बघा ,! श्री.हनुमानाचे चित्र काढले आहे. याला आज चित्र फलक लेखन ला ही माझ्या बुधगावाचा श्री हनुमानाचे मंदिरातील फळा ! मी आज अखेर मी विसरलो नाही नोकरी निमित्त तीसपेक्षा परगावी गेला.
यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. जर प्रयत्न केला तर आपल्याला कोणतंही गोष्ट शक्य होऊ शकते.
Comments
Post a Comment