माझ्या जीवनातील मनातील एक प्रसंग: माझा गणवेश..!
माझ्या मनातील एक प्रसंग : :माझा गणवेश
-श्री.सुभाष शिंदे,जत
🔵✍️🟤✍️🔴✍️🟣✍️🔵✍️🟣✍️🔵✍️
मी ज्यावेळी जत हायस्कूल, जत ला सेवेला प्रारंभ केला. त्यावेळी माझी परीस्थिती अत्यंत गरिबीची होती. जेवण, कपड्यांसाठी पैसे नसल्यामुळे मी डाॅ.श्रीपाद जोशी, साहेबांना सांगितले मी नोकरी करण्यास तयार आहे.पण.....डाॅ.जोशी साहेब म्हणाले पण काय...?
पगार येईपर्यंत माझ्याकडे फक्त ८०/-रूपये आहेत. मी कुठे राहु? खानावळ साठी पैसे नाहीत? शिवाय जत मध्ये माझं तुमच्या शिवाय ओळखीचे कोणीही नाही. साहेब ...मी पैसाचे काय करू! मी सांगत होतो.साहेब माझ्या कडे बघत होते.ते खुर्चीवरून माझ्याजवळ आले आणि माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले सुभाषराव! तुम्ही काळजी करू नका .मी आहे ना....! त्यावेळी माझ्या मनात देव भेटल्याचा आनंद झाला! उद्यापासून सेवेत हजर व्हा! मी तुम्हांला महिन्याला तीनशे रुपये देतो. मला इतका आनंद झाला! माझे घरचे लोक मदत करणार नाही पण एक आदर्श मुख्याध्यापक माझी मदत करत आहे .हा माझ्या सेवेचा सुरूवातीचा एक चांगला अनुभव आला. त्या दिवशीपासून आज अखेर त्यांचं स्थान माझ्या मनात नेहमी स्थान प्रेरणादायी, गुरु समान आहे! मी अध्यापन करीत होतो .प्रत्येक महिन्याला सर मला ठरलेली रक्कम मला देत होते. पण त्या तीनशे रुपयात गावी आल्यानंतर आई-वडिलांना शंभर रुपये दावे लागत असे .मी अध्यापन करीत असताना त्यावेळी माझ्याकडे दोनच गणवेश होते .माझ्या मनात आलं की आपल्यालाही गणवेश घेतला पाहिजेल पण पैशाची बेरीज घरची परिस्थिती काय करावे असा काय प्रश्न पडला मला पडला. गावी जात असताना एसटी तून जात असताना एक रस्त्याच्या कडेला असलेले एक जुन्या कपड्यांचे दुकान मला दिसलं ! मी सांगली मध्ये उतरल्यानंतर जुन्या कपड्यांच्या दुकानातील पन्नास रुपयाचा एक गणवेश विकत घेतला. मी तसंच घरी आलो .
तो गणवेश परिधान करून मी शाळेत गेलो पण तो सदरा मॉडर्न होता . एक ,दोन दिवस तो गणवेश घातला मा. मुख्याध्यापकांनी मला बोलावलं हा गणवेश शाळेत चालणार नाही ? तुम्ही तो बदला. पण त्यांना मी जुन्या बाजारातील गणवेश आणला आहे सांगितलं नव्हतं .परत दोन दिवस झाले परत गणवेश माझ्या अंगावर होता त्यावेळी मा. मुख्याध्यापक माझ्यावर चिडले आणि शाळा सुटल्यानंतर थांबा ! तुम्हांला काही सांगायचं आहे .शेवटचा तास संपल्यानंतर मी ऑफिसच्या बाहेरच्या बाकावर मी बसलो होतो. त्यावेळी त्या बाकावर सेवक गुरव मामा माझ्यावर बघत होते .काय हो सर ,काय झालं ,काय चुक केली आहे.काय साहेबांनी कशाला भेटायला सांगितले आहे. तेव्हा मी म्हणालो काही नाही ...फक्त एकच आहे ....माझा गणवेश ! हा माझा गणवेश असं म्हटल्यानंतर तो नाईक गुरव सेवक माझ्याकडे बघू लागला .सर चांगले कपडे शिवून टाका .असा सल्ला त्यांने मला दिला .पण गणवेश घेण्यासाठी पैसे कोण देणार ? हा प्रश्न माझ्या मनात आला.. तेव्हा आतून बेल वाजली नाईक ..श्री.शिंदे सरांना आत पाठवा .मी परवानगी घेऊन ,आत गेलो नमस्कार केला साहेबांनी मला बसा म्हणून सांगितले .मी नाही बसलो ,बसा सांगतो ना ....बसा पहिल्यांदा मग मी खुर्चीवर बसलो . तुम्हांला दोन दिवस मी काय सांगतोय ....होय साहेब !गणवेश बदला मी गप्प राहिलो .ते म्हणाले काय ते मला पहिल्यांदा सांगा सर माझ्याकडे दोनच गणवेश आहेत. त्यातला एक गणवेश फाटला आहे. माझ्याकडे नवीन कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत . तुम्ही राहण्यासाठी व जेवणासाठी तीनशे रुपये देता त्यात कसा तरी मी दिनक्रम कसा तरी चालवितो.मी त्यातले शिल्लक पन्नास रुपये घेऊन मी जुन्या बाजारातून एक गणवेश खरेदी केला आहे. मी तोच हा गणवेश! घालतोय... माझ्याकडे साहेब गणवेश घेण्यासाठी पैसे नाहीत .ज्यावेळी मला पैसे मिळतील योग्य असा गणवेश घेणार आहे. असं मी सांगितलं डॉ. जोशी सरांना काय वाटलं आणणार साहेब नि:शब्द झाले. शिंदे सर घरी जावा . मी साहेबांचा निरोप घेतला ... शैक्षणिक कार्याची सुरुवात करीत असताना जीवनात येणारे अनेक प्रसंग येऊन जातात .ज्यावेळी गणवेश हा शब्द येतो त्यावेळी मला वरील गोष्टीची आठवण होते आणि गणवेश आणि गणवेश ! ही भावना मनात कायमस्वरूपी मनात राहते .वरील प्रसंगातून मला एक जाणवलं की आपण कार्य करत असताना आपल्याला मनापासून साहाय्य करणारी मंडळी भेटतात . मंडळी भेटतात जर ती भेटली नसती तर मी जत हायस्कूल जत मध्ये मी कलाशिक्षक म्हणून 35 वर्षे सेवा करू शकलो नसतो .आज समाजामध्ये अशा आश्रयदाते माणसं असली तर समाजामध्ये काही प्रश्न, काही समस्या सुटू लागतील असं मला वाटतं!
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨
Comments
Post a Comment