कविता मुळे जीवन फुलते आणि जीवन सजते! -डाॅ. श्रीपाद जोशी ज्येष्ठ साहित्यिक
कविता मुळे मनाचे अंतरंग सजते आणि जीवन फुलते :डॉ. श्रीपाद जोशी,जत.
जत : जतमध्ये शब्दगंधर्व खुले कवी संमेलन व नवकवयित्री उज्ज्वला कांबळे हिच्या 'उज्ज्वलचंद्र' काव्यसंग्रहाचे प्रकाशन
जत (एस.आर्टस् न्यूज) प्रतिनिधी:
कवी आपल्या भावना कल्पनांचा आधारे व काल्पनिक गोष्टी वास्तव रूपाने वाचकांपुढे मांडतो. माणसाच्या भावना अभिव्यक्त करणारे माध्यम हे कविता आहे. कवी हा ईश्वररूप असुन स्व-रूप लिहितो. म्हणूनच कविता ही कवीच्या मनाची प्रेरणा असते, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले.
ते श्री. अंबिका नवरात्र उत्सव मंडळ, शब्दगंधर्व साहित्य परिवार, मराठी साहित्य सेवा मंच, शेगांव व राजे रामराव महाविद्यालय, जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिले शब्दगंधर्व खुले कवी संमेलन व उज्वला कांबळे लिखित 'उज्वल चंद्र' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कवी व गझलकार सुधाकर इनामदार, कवी लवकुमार मुळे, आनंदहरी, नवकवयित्री उज्ज्वला कांबळे, श्री. अंबिका नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष शहाजी भोसले, प्रभाकर जाधव, विनायक
नवकवयित्री उज्वला कांबळे यांच्या उज्ज्वल चंद्र या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना सुधाकर इनामदार, डॉ. श्रीपाद जोशी, लवकुमार मुळे, विनायक कुलकर्णी, प्रभाकर जाधव, शहाजी भोसले व प्रा. तुकाराम सन्नके
कुलकर्णी, डॉ. सरिता पट्टणशेट्टी, अनिल देशपांडे ,श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक व प्रा. तुकाराम सन्नके उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष लवकुमार मुळे यावेळी बोलताना म्हणाले की, कविता हा साहित्याचा सर्वात जुना प्रकार असून तो कमी शब्दांमध्ये जास्त आशय देतो. मनामध्ये चाललेला भावनांचा खेळ कवी शब्दरूपी गोष्टीतून व्यक्त करतो. उज्ज्वला कांबळे यांनी आपल्या आयुष्यात घडलेले वास्तविकितेचे प्रतिबिंब काव्यसंग्रहातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. उज्वल चंद्र हा काव्यसंग्रह माती, नाती, भीम, बुद्धाचे गोडवे गाणारा उज्वल संग्रह आहे. आपल्या भावना व्यक्त करताना उज्वला
कांबळे म्हणाल्या की, लहानपणापासूनच
कविता वाचनाचा व लिहिण्याचा छंद होता. कविता लिहीत गेले व आज त्याचा संग्रह झाला.
राजे रामराव महाविद्यालयातील प्रा. तुकाराम सन्नके व डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, प्रसिद्ध साहित्यिक दयासागर बन्ने, मच्छिंद्र ऐनापुरे, लवकुमार मुळे व प्रकाशक इंद्रजीत घुले यांनी
या काव्यसंग्रहास मूर्त रूप दिले.
त्यांनी वेळोवेळी केलेल्या
मार्गदर्शनामुळे हा काव्यसंग्रह प्रकाशित करता आला. तसेच हा काव्यसंग्रह प्रकाशित होण्यास माझे आई-वडील, भाऊ, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी व राजे रामराव महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
शब्दगंधर्व खुले कवी संमेलनात जत, श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत यांनी कविता सादर केली.
सांगोला, मंगळवेढा, इस्लामपूर, कवठेमहकाळ, आटपाडी, वारणा-कोडोली, शिराळा व तासगाव तालुक्यातील २५ पेक्षा जास्त कींनी आपला सहभाग नोंदवला व विविध विषयावर कविता सादर केल्या.
कवी संमेलन व काव्यसंग्रह प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विनायक कुलकर्णी यांनी केले.
सुत्रसंचलन वैष्णवी जाधव यांनी तर आभार अनिल देशपांडे यांनी केले.
यावेळी जत शहर व जत पंचक्रोशीतील साहित्यप्रेमी व श्री. अंबिका देवी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟨🟧🟪🟨🟧🟪🟧🟣🟡🟤🔴🔵🟤🟡
-श्री. सुभाष शिंदे, संपादक, एस.आर्टस् न्यूज
Comments
Post a Comment