जागतिक कला दिन! सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
१५ एप्रिल
जागतिक कला दिवस
१५व्या शतकात रेनेसान्स काळात झालेले एक महान चित्रकार आणि संशोधक, इटालियन चित्रकार लिओनार्दो दा विंची यांचा वाढदिवस. यांच्याच स्मरणार्थ २०१२ मध्ये UNESCO च्या जनरल कॉन्फरन्सने १५ एप्रिल हा दिवस जागतिक कला दिन (World Art Day) म्हणून घोषित केला. दरवर्षी या दिवशी कलेचा विकास आणि आनंद घेण्यासाठी, कलाप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कला जगभरातील व्यक्तींसाठी सर्जनशीलता, नवकल्पना आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देते. कलेच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण, कुतूहल आणि चर्चेत ती महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच प्रत्येक कलाप्रेमींचा आपण आदर केला पाहिजे. लिओनार्दो दा विंची हे शांतता, भाषण स्वातंत्र्य, सहिष्णुता आणि बंधुत्वाचे प्रतीक मानले जातात. विंचींचे 'लास्ट सपर' आणि 'मोना लिसा' ही जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावशाली चित्रे आहेत. जागतिक कला दिवस जगभरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कला प्रदर्शने आणि कार्यशाळांचा साक्षीदार म्हणून ओळखला जातो. असं म्हणतात की, कला विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. या कलेचे काही फायदे आहेत ते जाणून घेऊया.
◆ कला शिकण्याची आणि सर्जनशील बनण्याची इच्छा प्रेरित करते.
◆ कला एकाग्रता, हात-डोळा समन्वय आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये वाढवते.
◆ कला भावनिक बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देते आणि गुंतागुंतीच्या भावनांच्या अभिव्यक्तीमध्ये मदत करते.
◆ कला वांशिक रूढी आणि धार्मिक अडथळे तोडून समुदाय स्थापन करण्यास मदत करते.
◆ कला आत्मसन्मान वाढवते, तुम्हाला प्रेरित करते आणि तुमचे एकूण आरोग्य सुधारते.
◆ कला इंद्रियांना उत्तेजित करते आणि नवीन मार्गांनी गोष्टी पाहण्याची परवानगी देते.
◆ कला हा अनेक लोकांचा लोकप्रिय छंद आहे.
काही लोक कलाकार म्हणून उदरनिर्वाह करतात.
Comments
Post a Comment