पंढरीची वाट...... -श्री.सुभाष शिंदे,जत.

पंढरीची वाट....
       -श्री.सुभाष शिंदे,जत.
पुन्हा पुन्हा धरावी पंढरीची वाट !
डोळे भरून पाहु पांडुरंग llधृ  ll
 संसाराचा गाडा,थांबू क्षण भरी...
नात्यांच्या हा सुखावा , जीवन धन्य करी! Ii१ll
सुखासाठी आता रमलो आता,
नात्यासाठी आता धाव रे आता! II २lI
भेटतील मित्रगंण सिथ त्याची घेऊ,
सुखाचा हि मेळा ह्रदयी ठेऊ ! II३lI
दु: खाचा हा टाहो फोडता आता,
धाव पांडुरंगा ये गा जीवना ! II ४lI
टाळ मृदंगाच्या संगे ,अवघी पंढरी नाचली,
भक्तीचा सोहळा चालता, चालता! II ५lI
चंद्रभागेच्या काठी स्थानाची दाटी,
देह शुध्द होई ,पाऊले चालली ! II६lI
जन्म मरणाच्या फेरा चुकला,
तुझ्या चरणाशी सेवा घडो सदा! II ७lI
                 - कलाश्री सुभाष 





Comments