कै.वैजयंता विष्णू बंडगर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

कै. वैजयंता विष्णू बंडगर,(वय-६९) बुधगाव यांचे
गुरुवार,दि.२८मार्च २०२४ रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे.
कै.पै. विष्णू बंडगर गुरुजी यांचे २४ वर्षांपूर्वी सन-१९९९ रोजी दु:खद निधनानंतर त्यांनी कुटुंबातील सर्वांना आधार दिला.वैभव गुरुजी यांचे शैक्षणिक, सामाजिक जडणघडणीत त्यांचा
सिंहाचा वाटा होता. वैभव गुरुजी हे आई, वडील यांनी आदर्श पाऊलवाट जाणारा एक आदर्श मुलगा आहे! 
 गुरुजींचे आदर्श कार्य! आईची माया ! हे तुमच्या बरोबर नक्कीच आहेत. त्यांच्या कार्याचा वसा वैभव गुरुजी तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे.
 कोण म्हणतं आई मला भेटायला येशील का..
ती माऊली तुमच्या मध्ये आहे. धीर  धरा हा फेरा सर्वांना आहे.
वैभव परवाच तुमच्या आई विशेषी चर्चा झाली होती.तुम्ही मला आईच्या उपचाराचे फोटो दाखविले होते. ईश्वराच्या मनात काय आहे हे कळत नाही.
  माऊली वैजयंता यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
स्वर्गीय आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

शोकाकुल:
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत.
ता.जत जि.सांगली‌

Comments