जत तालुक्यात मतदार जनजागृती साठी विविध कार्यक्रमांचे आयोजन...!

मतदार जनजागृतीसाठी जत तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन...!
एस.आर्टस् न्यूज, प्रतिनिधी:जत तालुका

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी युवकांनी घरोघरी जाऊन प्रयत्न करावे : तहसीलदार जीवन बनसोडे 
मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य सर्व सुजाण नागरिकांनी बजावले पाहिजे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असा संदेश देत मतदार जनजागृतीसाठी जत शहरांसह तालूक्यात संख, जाडरबोबलाद, उमदी, शेगाव आदी ठिकाणी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये जत महसूल, पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी, शिक्षक आणि महाविद्यालयाचे विध्यार्थी मोठ्या
संख्येने सहभागी झाले होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात मतदार जागृतीसाठी मोहिम राबविण्यात येत असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीपच्या (डतएएझ) माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने
जत विधानसभा कार्यक्षेत्रातील मतदारांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी निवडणूक विभाग व जत पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जतसह तालुक्यातील एस
SWEEP दार जनजागृती अभियान
व्ही एम आर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेगाव, गजानन हायस्कूल जाडरबोबलाद, आरबीपी हायस्कूल संख, एम व्ही हायस्कुल उमदीसह जत शहरांत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जतचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी जीवन बनसोडे म्हणाले की, सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी सायकल रॅलीच्या माध्यमातून ७ मे रोजी होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक मतदान करावे, असा संदेश देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचा धागा मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने स्वतः तर पुढे यावेच परंतु आपल्या आजूबाजूला असणारे
कोणताही मतदार मागे राहणार नाही
साक्षरता क्लब
साक्षरता मंच
शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी, नव मतदार यांना सुद्धा मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करीत या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्वजण सहभागी होतील यासाठी महाविद्यालयीन युवकांनी घरा घरात जाऊन जनजागृती करावे असे आवाहन तहसीलदार बनसोडे यांनी यावेळी केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी अन्सार शेख म्हणाले की, जत तालुक्यात ठिकठिकाणी मतदार जनजागृतीसाठी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश मतदानाची टक्केवारी वाढावी असा असून या उपक्रमांतर्गत शाळेत आणि महाविद्यालयात रांगोळी, चित्रकला स्पर्धा, सायकल रॅली, मतदार व महिला मेळावा त्याचबरोबर जनजागृती फफेरी
आदी विविध उपक्रमाचे आयोजन
करण्यात येत आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जत शहरात काढण्यात आलेल्या रॅलीत एस आर व्ही एम हायस्कूल, जत हायस्कूल जत, के एम हायस्कूल, या महाविद्यालयातील अनेक युवकांनी भाग घेतलेला होता.
ही सायकल रॅली एस आर व्ही एम हायस्कूल पासून सुरू झालेली सायकल रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मुख्य बाजारपेठमार्गे एस आर एम हायस्कूल जत या ठिकाणी या रॅलीचे समारोप करण्यात आले.
याप्रसंगी जत तहसीलदार जीवन बनसोडे, पंचायत समिती जतचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, गटशिक्षणाधिकारी अन्सार शेख, नायब तहसीलदार बाळासाहेब सौदे, एस आर व्ही एम हायस्कूलचे मुख्याध्यापक बनसोडे सर, जत हायस्कूलचे मुख्याध्यापक हिवाळे,
के एम हायस्कूलचे मुख्याध्यापक सोलापुरे सर, पंचायत समिती तहसील कार्यालय जतकडील अधिकारी आणि महाविद्यालयाचे विध्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Comments