कै.वसंतराव दत्तात्रय पाटील ( गुरुजी) बुधगाव: सामाजिक कार्याचा एक वारकरी!
कै.वसंतराव दत्तात्रय पाटील (गुरुजी )बुधगाव
ज्ञान,सेवेचा वारकरी!
कै.वसंतराव पाटील, गुरुजी!
यांचे शनिवार, दि.२२ मार्च २०२४ रोजी दुःखद निधन झाले होते.
प्राथमिक शिक्षक.....सेवानिवृत्ती शिक्षक ते गावभाग देवस्थान समितीचे सदस्य असा त्यांचा कार्याचा होता.(२०२४)
त्यामुळे सर्वांशी संवाद करणे, सामाजिक, शैक्षणिक कार्य
करताना ते प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या
कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला. त्यावेळी बुधगाव मध्ये आदर्श प्राथमिक शिक्षकांची लाट होती. पाटील गुरुजी, बंडगर गुरुजी, नागे गुरुजी व इतर आदर्श असे गुणवान शिक्षक
होते. त्यांनी त्यावेळी विविध उपक्रम राबविले होते
त्यांची नोंद राज्य, राष्ट्रीय स्तरावर झाली होती. त्यामध्ये कै. पाटील गुरुजी होते. कै. वसंत गुरुजी हे स्काऊट मास्टर होते. सांगली जिल्हा भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा समिती वर सदस्य म्हणून कार्य करीत होते कार्य होते. बुधगाव गावातील स्काऊट, गाईड मुलांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्काऊट , गाईड ची पथके घेऊन जाण्यामध्ये कै. वंसतराव पाटील ,गुरुजी व बंडगर गुरुजी तसेच अनेक शिक्षक त कार्यरत होते .
प्राथमिक शिक्षक असताना त्यांनी उपक्रम राबविले होते.
विद्यार्थी, विद्यार्थिनीला मदत करणे व विविध स्पर्धेमध्ये बुधगाव ची मुले ,मुली सहभागी होताना त्यांना सक्रिय मदत करत असत. त्यांना त्यावेळी पुरस्कार प्राप्त झाले की त्यांचा गौरव करायचे!
शाळेचे बांधकाम असू दे विविध उपक्रम करताना निधी जमा करायला लागायचा त्यावेळी सर्वात पुढे हे गुरुजी असायचे ! ज्ञानज्ञान करताना विविध सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा ते सहभागी व्हायचे. शैक्षणिक कार्य करत असताना आपल्याला पुरस्कार मिळावा... आपला गौरव व्हावा! असं त्यांना सेवा कालखंडामध्ये मनात सुद्धा आल नाही. असा एक आदर्श शिक्षक होता....!
.सेवानिवृत्ती झाल्यानंतर सामाजिक काम व श्री विठ्ठल मंदिर व परिसर यामध्ये त्यांनी भरीव कार्य केले आहे. गावभाग देवस्थान समितीचे सदस्य म्हणून कार्य करीत असताना त्यांनी विठ्ठल मंदिर बांधकाम समिती सदस्य यामध्ये स्वतःला झोकून दिले वर्गणी जमविणे , मंदिराची आखणी करणे, विविध प्रकारची माहिती गोळा करून गावातील बांधकाम सदस्य ,गावातील कलाकार माहिती यांच्याशी चर्चा करून या भव्य मंदिराची निर्मितीमध्ये स्वतःला झुकून दिले वेळप्रसंगी मंदिर बांधकामासाठी देणगीची आवश्यकता लागल्यास
ते विविध सामाजिक संस्था ,आमदार ,खासदार आणि सामान्यतः सामान्य नागरिक ,शिक्षक व्यापारी यांच्याशी ते स्वतः चर्चा करत. आपल्या गावामध्ये एक आदर्श , सुंदर मंदिर असावे अशी त्यांची इच्छा होती. मी ज्यावेळी जत हून बुधगावाला येई त्यावेळी मंदिर बांधकामामध्ये जे जे काही झालं ते मला सांगायचे आणि त्यामध्ये नवीन काय करता येईल का ? असं सांगायचं ...एक प्राथमिक शिक्षक सामाजिक संस्थेमध्ये काम केल्यानंतर एक वास्तू कशी निर्माण तयार होते याचे उदाहरण असेल तर तुम्ही मिरज तालुक्यातील बुधगाव या श्री विठ्ठल मंदिर अवश्य भेट द्या !कै. वसंतराव पाटील गुरुजी हे मितभाषी होते. आपल्या गावातील एखादा विद्यार्थी ,विद्यार्थिनी किंवा एका नागरिकांनी आदर्श काम केले तर ते त्याचे अभिनंदन करायला त्याच्या घरी जात असत. त्यांचा सत्कार करीत असत . गावांमध्ये जे आदर्श असेल त्याचा गौरव झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा असायची. गावातील शिक्षक, खेळाडू किंवा एखादा विद्यार्थी जिल्हा राज्य राष्ट्रीय स्तरावर चमकला की त्यांचा गौरव सिद्धेश्वर यात्रेमध्ये पोवाड्यच्या कार्यक्रमांमध्ये....
त्या व्यक्तीचा सन्मान आणि गौरव करत पण ते स्वतः लांब थांबत कधीही प्रसिद्धीची हाव नसणारा सर्वांशी प्रेमाने वागणारा हा सेवेचा वारकरी निघून गेला. हे मनामध्ये वाईट वाटतं पण गुरुजी तुम्ही केलेला आदर्श कार्याचा वसा आम्ही पुढे नेऊ .. तुमचं सामाजिक शैक्षणिक कार्य यापुढेही आम्ही बुधगावचे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते पुढे नेऊ ! सांगायचे खूप आहे पण आता थांबतो परत एकदा कै. वसंतराव दत्तात्रय पाटील ,गुरुजी बुधगाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या स्वर्गीय आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो . श्री सुभाष शिंदे संपादक एस न्यूज ,जत एस आर न्यूज जत ता.जत जिल्हा -सांगली.
Comments
Post a Comment