पुज्य साने गुरुजी यांच्या पुतनी सुधाताई यांची भेट.....!
पुज्य साने गुरुजी यांच्या पुतनी सुधाताई बोडा
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟧
" निर्धार कार्याचा "
सुधाताई बोडा अर्थात आदरणीय साने गुरुजी यांनी स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगात असतांना सुधास पत्रे लिहून पाठवित असे. याच त्या साने गुरुजींची पुतणी. सुधाताई.
मुंद्रा जिल्हा कच्छ गुजरात येथील 5 दिवसीय शिबीर संपल्यावर बडोदा येथे सुधाताई यांची भेट घेतली. सकाळचे स्नान, नाश्ता व दुपारचे भोजन असे नियोजन करण्यात आले होते.
सुधाताई यांचा लंडन येथे रहात असलेला मुलगा श्री सुधांशु हे सकाळ सत्रात सोबत होते.
राष्ट्र सेवा दलाच्या वर्तमान कार्य, साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त होत असलेले कार्यक्रम, साने गुरुजींच्या पुस्तकावरून व साप्ताहिक साधना आदी विषयांवर चर्चा करण्यात आले.
या प्रसंगी सौ. शोभा मगदूम, बाबा नदाफ, शाहिस्ता मुल्ला व राज कांबळे आदी सहभागी झाले होते. सवाद्य "समतेच्या वाटन" या गीताला ताईनीही ठेका धरीत उत्साह वाढविला.
वयाच्या 89 व्या वर्षी सुधाताई ज्या तळमळीने सेवा दल व सामाजिक प्रश्नावर बोलत होत्या त्या ऐकून आपल्याला अजूनही गांभीर्याने परिस्थिती विषयी भान आले नाही असेच वाटुन राहीले. आणि मिळेल त्या साधनांनी अधिक जोमाने ज्या साने गुरुजींनी सेवा "दल माझा श्वास आहे "असे म्हंटले
त्या साने गुरुजींचे नाव घेऊन जन गन मनाला साद घालून. परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करित राहू या. असा निर्धार करून. सुधाताईंचा निरोप घेतला.
Comments
Post a Comment