स्काऊट चे जनक लाॅर्ड बेडन पाॅवेल यांचा आज यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्त विनम्र अभिवादन!


स्काऊट गाईड चिंतन दिन (Thinking Day)... 
🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧✍️🟧🟧🟪🟨🟧
स्काऊटिंग ही एक आंतरराष्ट्रीय ख्याती असलेली तसेच जगभर पसरलेली गणवेशधारी सामाजिक, शैक्षणिक सेवाभावी चळवळ असून जगभरातील असंख्य आबालवृद्ध या चळवळीत आपले यथायोग्य योगदान देत आहेत. 
स्काऊटिंग ही सर्वधर्मसमभाव, विश्वबंधुत्व, राष्ट्रीय एकात्मता, स्त्रीपुरुष समानता इ. मूल्यांचा अंगीकार  केलेली सर्वसमावेशक, अराजकीय चळवळ असून अनेक समाजोपयोगी व देशहिताच्या कार्यात तिचे उल्लेखनीय योगदान आहे. 
स्काऊटिंग ही चळवळ केवळ शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यापुरतीच सीमित नसून अतिशय व्यापक स्तरावर लोकजागृतीचं काम करणारं ते एक विश्वसंघटन आहे असंही म्हणता येईल. 
स्काऊटिंग चळवळीचे अर्ध्याअधिक जगतात अधिराज्य असून सेवाभावी, हौसी, उत्साही लोक स्वयंप्रेरणेने, निरपेक्षतेने आपला फावला वेळ, शक्ती आणि कौशल्ये पणाला लावून सेवादक्षता, सेवातत्परता, सेवापरायणता इ.ची प्रचिती करवीत जीवनाचा निखळ आनंद घेतात.
सदैव तयार (Be Prepared)  हे या चळवळीचे ब्रीद (Motto)असून 
स्वावलंबन, स्वयंशिस्त, स्वयंसेवा, नेतृत्व निर्माण, आरोग्य ही तिची पंचसूत्री आहे. 
समाज सेवा (social services) आणि समुदाय विकास (community development) या उद्दिष्टांना अनुरूप उपक्रमांद्वारे राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करणारी ही एक जगावेगळी चळवळ आहे.
एकंदरीत स्काऊटिंग ही आचार, विचार आणि कौशल्यांनी संपन्न असा सुजाण, कर्तव्यदक्ष नागरिक/माणूस घडवणारी प्रक्रिया असून ती जीवनोपयोगी संस्कारांची जननी आहे असं म्हणता येईल.
१९०७ साली लंडन शहराजवळील ब्राऊन सी*श या समुद्री बेटावर झालेल्या २० मुलांच्या पहिल्या निसर्ग निवास मेळाव्याद्वारे ही चळवळ अस्तित्वात आली. 
सुरुवातीला ही चळवळ केवळ मुलांसाठीच होती, तिचे नाव होते बॉय स्काऊट.
१९०९ साली मुलींच्या आग्रहाखातर *गर्ल स्काऊट* आणि *गर्ल गाईड* पथकांना हिरवा कंदिल मिळाला. लॉर्ड बेडेन पॉवेल यांची पत्नी लेडी बेडेन पॉवेल जगाची मुख्य गाईड यांनी ही धुरा खांद्यावर घेतली.
लॉर्ड बेडेन पॉवेल यांनी लिहिलेल्या *स्काऊटिंग फॉर बॉईज या पुस्तकांच्या आधारे ही चळवळ कार्य करते. या पुस्तकातील त्यांनी शेकोटीभोवती सांगितलेल्या गोष्टी फारच अद्भुत, प्रेरणादायी आणि पथदर्शी आहेत. तसेच ध्येय (Aims), धोरणे (Policy), नियम (Rules) आणि संघटन Organization) सजजावणारे *एपीआरओ* हे आधारभूत पुस्तक आहे.
बेडेन पॉवेल एक्झरसाईझ हे सहा व्यायाम प्रकार तसेच साहस खेळांचं या चळवळीत फारच महत्व आहे.
स्काऊट गाईड चं वचन आणि नियम (promise n law) हा व्यक्तिमत्व आणि नागरिकत्वाची जडणघडण करणारा जणू काही आम्नाय/संहिता च आहे. स्काऊट सेल्युट आणि *स्काऊट लेफ्ट हेन्ड शेक ची स्काऊटिंगमधली आगळीवेगळी रीत जगाला थक्क करणारी आहे.
लॉर्ड बेडेन पॉवेल हे या चळवळीचे जनक (Founder) असून ते जगाचे मुख्य स्काऊट (Chief Scout of the World) आहेत.
'२२ फेब्रुवारी' हा त्यांचा जन्मदिवस असून 
हा दिवस 'चिंतन दिन' अर्थात Thinking Day किंवा World Scout Day म्हणून जगभर साजरा केला जात़ो.
स्काऊट गाईड एक जीवनाधार सेवाभावी सामाजिक शैक्षणिक आंतरराष्ट्रीय चळवळ असून आपण सारे 
Once a Scout always a Scout मानणारे प्रशिक्षित अप्रशिक्षित सदस्य... आपणासाठी हा 'चिंतन दिवस' एक अपूर्व पर्वणी आहे.
चला तर आपणही आपल्या विद्यालयात, आपल्या स्काऊट गाईड पथकांद्वारे विविध उपक्रमांनी 'चिंतन दिन' उत्साहात साजरा करुया.
फलक लेखन करुया.
स्काऊट गाईड ध्वजारोहण करुया.
प्रतिमा पूजन करुया.
वचन, नियम उद्धरण करुया.
प्रार्थना सभा/सर्व धर्म प्रार्थना (All Faith Prayer) आयोजन करुया.
स्वीट शेअरिंग, स्कार्फ/वॉगल, बॅजेस शेअरिंग करुया.
बेडेन पॉवेल आणि स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास जाणून घेऊया.
BP6 (बेडेन पॉवेल सहा व्यायाम प्रकार) समजावून घेऊया, त्यांचा सराव करुया.
प्रथमोपचार प्रात्यक्षिके, साहस खेळ, स्काऊट खेळ, बौद्धिक खेळांचे आयोजन करुया.
निसर्गनिवास मेळावा, शेकोटी, संघनायक प्रशिक्षण करुया.
खरी कमाई सेवा महोत्सव चे आयोजन करुया... बाजार, खाऊगल्ली इ.
स्काऊट अभ्यासक्रमावर आधारित चित्रे, वस्तू, दोरीच्या गाठी, बंधने, स्कार्फ, वॉगल, बैजेस इ. चे प्रदर्शन भरवू या.
शालेय तथा गावपरिसर स्वच्छ करुया, वृक्षारोपण करुया.
या दिवशी एक तरी सत्कृत्य (Good Turn) नक्की करुया.
🔵🟤🟣🔴🎉🔵🟤🟣🔴🎉🔵🟤🟣🎉
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐चिंतन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
🟪🟨🟧🟧🟪🟨🟧🟧🟪🟨🟧🟪🟨🟧
✍️ श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत.ता.जत. जि.सांगली.
🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨

Comments