श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले! त्याचा वृत्तांत...

💐🔴 श्री. सुभाष सदाशिव शिंदे जत हायस्कूल, जत.
एबेनेहर आदर्श कला शिक्षक पुरस्कार
प्रति,
श्री. सुभाष सदाशिव शिंदे जत हायस्कूल, जत
आपला आभारी,
समाजासाठी दीपस्तंभ असणारे आपण पूर्णवेळ पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात अधिक काळ कार्यरत आहात ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण वंचित घटकापर्यंत पोहचवून चांगला माणूस व सक्षम नेतृत्व विकसित करावे हे ध्येय उराशी बाळगून आपली वाटचाल सुरु आहे. कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वागीन विकास व्हावा हा उद्देश समोर ठेऊन आपले उपक्रम महत्वपूर्ण आहेत.
कलेच्या विश्वात रममान होऊन साने गुरुजींच्या विचारांचा वारसा आपण जपला आहे. चित्रकलेचे आध्यापक, छायाचित्रकार, स्काऊट मास्टर, उत्कृष्ट कवी व साहित्यिक अशा विविध अंगानी आपले व्यक्तीमत्व सजले आहे. बुधगांव ता. मिरज जि. सांगली येथे १९६८ मध्ये गरीब कुटूंबात आपला जन्म झाला. वडीलांच्या संगीत कलेच्या वारसाने आपले जीवन बहरत गेले. आध्यापना बरोबरच मुलांना गोष्टी सांगणे, गाणी म्हणून दाखविणे, कविता ऐकवणे, त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे, स्पर्धा घेणे, स्काऊट आणि गाईड या शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्वावलंबी बनविणे असे अनेक उपक्रम आपण राबवित आहात.
आपल्या या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे हे अत्यंत स्तुत्य आणि वंदनीय आहे. तुमच्या बाबतीत आम्हाला आवर्जून म्हणावे लागेल की, कर्तृत्वाचा बडेजाव तुम्ही कधीच दाखवला नाही, मेहनत, सचोटी आणि चांगुलपणा या तुमच्या जीवन तत्वाच्या बळावर, तुम्ही पुढे पुढे जात आहात तुमच्या या स्वभावगुणांचा दरवळ आमच्या मनात न राहील तरच नवल! म्हणूनच वाटतं प्रगती आणि यश यांच अतूट नात तुमच्या जीवनाशी सदैव जोडलेले राहो....
आपल्या या कार्याबद्दल आपणास "एबेनेझर फौंडेशन" संचलीत नव कृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालय, मिरज तर्फे "एबेनझर आदर्श कला शिक्षक" पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
आपल्या बहुआयामी व्यक्तित्त्वास आमचा मानाचा मुजरा व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !!!

पॉल कारा ,उपाध्यक्ष/.  मेरी कारा अध्यक्ष
सुर्यकांत होळकर प्राचार्य, सचिव
सुमेध कुलकर्णी सहा. अधिव्याख्याता
पूजा सकटे, व्यवस्थापक 

🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟨🟨🟪🟧🟨🟧🟧
  -श्री.सुभाष शिंदे, संपादक, एस्. आर्टस् न्यूज.

Comments