श्यामची आई ही मराठी साहित्यातील साने गुरुजींची अजरामर व सर्वश्रेष्ठ साहित्यिकृती...

श्यामची आई ही मराठी साहित्यातील साने गुरुजींची अजरामर व सर्वश्रेष्ठ साहित्यकृती
साने गुरुजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने..
अहिंसक.. निर्मळ मनाची आई आणि मानवतेचे महात्म्य सांगणारे श्यामची आई ही मराठी साहित्यातील साने गुरुजींची अजरामर व सर्वश्रेष्ठ साहित्यकृती आहे. ती मी दोनवेळा वाचली.. हमसून रडलो.. आज गुरुजींच्या जन्मदिनी लिहिताना डोळे भरून आले. माणसाचे हृदय परिवर्तन करण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे. श्यामची आई हा ग्रंथ अहिंसेचा.. संवेदनशील अंतःकरणाचा सर्वोत्कृष्ट अविष्कार आहे. गुरुजींचे आजोबा गर्भश्रीमंत महसूल गोळा करणारे खोत. परंतु वडील सदाशिव यांच्या पाचवीला दारिद्र्य पूजलेले. आई यशोदा मात्र धीरोदात्त, कणखर मनाच्या. यशोदा माईच्या सुसंस्कारामुळे महाराष्ट्राला साने गुरूजी लाभले. मराठी भाषा वैभव वाढविणारा श्रेष्ठ, संवेदनशील साहित्यिक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक आणि शिक्षक मिळाला. घरदार जप्त झाले. बडिलांवर प्राणघातक हल्ला झाला, भाऊबंदकीचा त्रास झाला. अंगावरील कपड्यानिशी घराबाहेर काढण्यात आले. यशोदामाईने झोपडीत प्रपंच थाटला. पांडुरंगाच्या शिक्षणासाठी माऊलीने अनंत खस्ता खाल्ल्या. पांडुरंग इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाला. अमळनेरला सहा वर्षे शिक्षक म्हणून काम केले. १९३० मध्ये म. गांधी यांनी कायदेभंग चळवळ उभी केली. नोकरीचा राजीनामा देऊन पांडुरंगाने भारत मातेच्या सेवेसाठी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. शिक्षा झाली. नाशिकच्या तुरुंगात रवानगी झाली आणि तेथेच ४२ रात्रीचे सर्वश्रेष्ठ श्यामची आई या गेली ८६ वर्षे महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील असंख्य सुसंस्कार व शिक्षणप्रेमी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या कादंबरीचा जन्म झाला. जे जे ही कादंबरी मनापासून वाचतील ते तुरुंगात कधीच जाणार आई वडील यांना कधीच अंतर देणार नाहीत असा माझा ठाम विश्वास आहे. साने गुरुजींनी ७३ पुस्तके लिहिली, बहुतांश पुस्तके त्यांनी तुरुंगातच लिहिली
आहेत. १९३२ मध्ये धुळ्याच्या तुरुंगात
असताना आचार्य विनोबा भावे यांनी.                  गीता प्रवचने सांगितली ती गुरुजींनी लिहीली.. गुरुजी १५ महिने धुळ्याच्या तुरुंगात होते. बंगलोरच्या तुरुंगात असताना कुरल या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. फ्रेंच भाषेतील या कादंबरीचे दुःखी या नावाने मराठी भाषांतर केले. च्या या ग्रंथाचे मानव जातीचा इतिहास या नावाने मराठीत भाषांतर केले. भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. मोरी गाय हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. आई वडील प्रेमावर त्यांनी मोलकरीण नावाची अप्रतिम कादंबरी त्याच्यावर चित्रपट प्रदर्शित श्यामची आई या कादंबरीवर प्रदर्शित झाला त्याचे दिग्दर्शन यांनी केले होते. भारतातील सर्व राज्यातील एकमेकांची भाषा, संस्कृती परस्पर स्नेह, मैत्र भावना जपून भारतीय बांधव या भावनेने ऐक्य जोपासली पाहिजे याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आंतरभारती केली. यासाठी त्यांनी स्वतः बंगाली भाषा शिकली. तत्वज्ञान तत्वज्ञान विषयाचा अभ्यास मध्ये विद्यार्थी हे मासिक व साधना साप्ताहिक सुरू करून प्रबोधन केले. अनेक कथा, लेख, निबंध, चरित्रे, कविता मानवतावादी, संवेदनशील म्हणून त्यांनी मराठी भाषेची श्रीमंती वाढविली. मनोरंजनातून सुसंस्कार खरा तो एकची धर्म जगाला प्रेम हे ठासून सांगितले. बलसागर करण्याचे त्यांचे स्वप्न होते.. नाहीत,अस्पृश्यता याविरुद्ध त्यांनी आवाज
उठविला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्रभर दौरा करून शेवटी उपोषण सुरू केले आणि हरिजनांसाठी विठ्ठल मंदिर खुले झाले.. एका पांडुरंगाने दुसर्या पांडुरंगाला मुक्त करुन मानवतावादी धर्माची शिकवण दिली. त्यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना करून महाराष्ट्र भर सेवाभावी, देशभक्त नेते व कार्यकर्ते तयार केले.. साथी एस.एम. जोशी, ग.प्र.प्रधान, दादा गुजर, ना. ग. गोरे, मधु दंडवते, यदुनाथ थत्ते, राजा मंगळवेढेकर अशी दिग्गज मंडळी ही साने गुरुजी यांनी देशाला दिली आहेत. काँग्रेस नावाचे साप्ताहिकही त्यांनी काढले होते. काँग्रेसचे फैजपूर अधिवेशनात त्यांनी लक्षवेधी काम केले. १९४२ च्या चलेजाव चळवळीत ते कांही काळ भूमिगत होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात काँग्रेसचे संघटन केले. गिरणी कामगार व शेतकऱ्यांची संघटना बांधली. लावून जेवायची पाळी या महामानवावर आली. प्लेगमुळे औंध सोडण्याचा प्रसंग वाचताना काळीज तुटतं. केवळ विद्यार्थ्यांना नव्हे तर सर्वांना स्वावलंबन, देशभक्ती व त्यांनी वार गुरुजींनी देशातील स्वावलंबनाचे धडे दिले. लिहीली आहे, झाला आहे. मराठी चित्रपट आचार्य अत्रे लोकांनी समजून घेऊन आपण सारे भावना व प्रचार स्थापन तामिळ व संस्थेत केला. १९२८ १९४८ ला लोकांचे कादंबर्या, लिहिणारा साहित्यिक करीत अर्पावे भारत निर्माण जातीभेद, सदाशिव,व्यवसायात, पर्यावरणात आणू या.. त्यांना मुक्तपणे चराचरात वावरण्याची व्यवस्था करु या..!!
साने गुरुजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन प्रा.एन.डी.बिरनाळे, सांगली. दि. २४ डिसेंबर
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪
sUBHASH SHINDE
S.ARTS NEWS....... Jath 
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
पूज्य साने गुरुजी यांचा आज  स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


Comments