कलेच्या प्रांगणातील कलावैभव ...! श्री.अनिल दबडे
मिरज येथील ज्युबिली कन्या शाळेतील कलाशिक्षक अनिल दबडे आज सेवानिवृत्त होत आहेत. त्याबद्दल त्यांना पुढील जीवनात आनंद,सुख, समृद्धी, वैभव, उत्तम आरोग्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
कलाशिक्षक अनिल दबडे यांना सुंदरता, सौंदर्य ,आकार यातूनच कलाविश्व निर्माण करणारा एक रंगकर्मी! कलाविष्कार सादरीकरण करून आपला ठसा उमटविला! दबडे सरांचा सहवास मला लाभला.सर्वाशी प्रेमाने बोलणे , सर्वांना मदत करणे जिल्हा, राज्य,देश नाहीतर परदेशात कलेचा प्रचार त्यांनी केला आहे.
एक कलाशिक्षक सारांश मासिक १९ वर्ष चालवितो. साहित्य,कला, लेखन क्षेत्रांमध्ये पण आघाडी घेतोहे विशेष!
मला आठवतंय कला उद्बोधक वर्ग असला की सर सारांश मासिकाच्या प्रति वाटताना मी पाहिले आहे. या मासिकात कला विशेषी कलावंतांच्या मुलाखती प्रसिद्धी केल्या. त्यातून कलेची सेवा केली.
सरांनी अनेक विद्यार्थी,विद्यार्थ्यांनी चित्रकला, व्यंगचित्र, शासकीय रेखाकला परीक्षा याविषयी अनेक पुस्तकांची निर्मिती केली.ही पुस्तके मराठी बरोबरच इतर भाषेत प्रकाशित झाली आहेत.
कलाविश्व महाविद्यालय, सांगली येथे कला शिक्षण घेऊन वैभवीशाली कलापरंपरा जपणारा एक कलावारकरी! अनिल दबडे !
कला साहित्य निर्मिती करून थांबला नाही.
प्रत्येक वर्षी एक कलावंतला पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आहे .
माझे मित्र मा.श्रीकांत माळी सरजी आणि श्री.अनिल दबडे यांचे नातं हे खास होत.मी त्यांच्या बरोबर असताना पाहिले आहे.
शाळेमध्ये विद्यार्थी,विद्यार्थ्यांनी साठी विविध उपक्रम राबविले .त्यांच्यामध्ये कलेची आवड निर्माण करण्याचे कार्य सरांनी केले.
या पुढील काळात सौ./श्री.दबडे नवीन सुरुवात करा.परदेशी प्रवास करा.व्यंगचित्रासाठी आता वेळ आहे.आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करा.
पुन्हा एकदा सेवानिवृत्ती च्या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!
-श्री.सुभाष शिंदे,जत
🟪🟧🟨✍️🟪🟧🟨✍️🟪🟧🟨✍️🟪🟧
Comments
Post a Comment