दि फ्रेंडस् असोसिएशन जत: संविधानाचा खरा सन्मान करणारी शिक्षण संस्था

दि फ्रेंड्स असोसिएशन जत:संविधानाचा खरा सन्मान करणारी शिक्षण संस्था.. 
 संस्थेस महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार द्यावा.!

संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यातील माजी विद्यार्थी मेळाव्यात शैक्षणिक विचारवंत व्याख्याता प्रा. एन.डी.बिरनाळे यांचे प्रतिपादन...
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟪🟧
जत दि. ३०: दि फ्रेंड्स असोसिएशन जत ही जत तालुक्यातील दुष्काळी भागातील गोरगरीब बहुजन समाजातील लेकरांना शिकवून त्यांना स्वाभिमानी व स्वावलंबी  बनवणारी आणि कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणारी संस्था आहे. या संस्थेच्या जत, माडग्याळ, कुंभारी व मुचंडी येथील शाळांमधून हजारो विद्यार्थी घडले.. ते आज देशाच्या व महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या प्रगतीमध्ये जनसेवारत आहेत. दहा हजार विद्यार्थी व सुमारे २५० हून अधिक शिक्षक व शिक्षकेतर सेवक असलेल्या या संस्थेने हजारो विद्यार्थ्यांना भाकर दिली आहे. हे काम छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे सुराज्य करणारे आहे. या संस्थेने साक्षर व शहाणी कर्तबगार माणसं घडवली आहेत. मानवतावाद जपणाऱ्या अनेक पिढ्या घडवणाऱ्या या संस्थेच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र व कर्नाटक शासनाने संस्थेला 'आदर्श शिक्षण संस्था' पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे असे प्रतिपादन वाणीभूषण प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले.
दि फ्रेंड्स असोसिएशन व संस्थेच्या जत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जत यांच्या संयुक्त सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी विद्यार्थी व जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आप्पासाहेब सरगर होते.
प्रारंभी क्रांतीमाता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत प्रास्ताविकात संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. मदनभाऊ बोर्गीकर यांनी संस्थेच्या गेल्या सत्तावन्न वर्षाचा आढावा घेतला. त्यामध्ये संस्थेचा गुणात्मक व संख्यात्मक विकासाचा चढता आलेख मांडताना संस्थापक मित्रांनी कलापथकाच्या प्रयोगातून जमलेल्या पैशातून संस्था उभी केली आहे. संस्थापक व विद्यमान पदाधिकारी, विश्वस्त, सदस्य,शाखांच्या स्कूल कमिट्यांचे पदाधिकारी व सदस्य, सर्व शाखांचे आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कष्टांचा गौरवपूर्ण उल्लेख करताना संस्था म्हणजे एक परिवार असून आजतागायत संस्था - कर्मचारी, संस्था - विद्यार्थी - पालक यांच्यामध्ये कधीच कोर्ट कचेरी झाली नाही. सर्वामध्ये समन्वय व संवाद ठेवून संस्थेचा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार होत आहे, त्यामुळे समाजातील सर्व थरातील लोक संस्थेला मदत करतात. सन २००३-०४ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला जलशुद्धीकरण यंत्र भेट दिले आहे.जत हायस्कूलचे नूतनीकरण केले आहे. 
मुख्याध्यापक अजित कुमार होवाळे यांनी शाळेच्या कार्याचा अहवाल मांडताना उज्ज्वल निकालाची परंपरा.. क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रातील यश, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य इ. बाबींचा उल्लेख केला व शाळेचे असंख्य माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात काम करत आहेत हे शाळेचे यश आहे असे नमूद केले.
यावेळी माजी विद्यार्थी श्री शामराव माळी,  श्री हेमंत चौगुले व संस्थेचे शिक्षक श्री  चंद्रकांत कोळी सर यांनी संस्था व शाळेमुळे कसे घडलो याविषयी मनोगते व्यक्त केली.
प्रा. बिरनाळे पुढे म्हणाले, 'खासगी शिक्षण संस्थांमुळे महाराष्ट्र चालतो, बोलतो व प्रगती करतो. संस्था चालक हे छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, मी. जोतिबा आणि क्रांतीमाता सावित्रीमाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांच्या विचारांचा गौरव करतात. संविधानाचा खरा सन्मान करणारी संस्था म्हणजे दि फ्रेंड्स असोसिएशन जत होय. 
ग्रामीण व दुष्काळी भागातील बहुजन समाजातील लेकरांना शिकवणे हे खरे शिक्षण कार्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार जपणारी ही संस्था आहे. महाराष्ट्रात २००५ मध्ये पहिल्यांदा सेमी इंग्रजीचे वर्ग याच शाळेत सुरू झाले,एकही कोर्ट केस नाही. मार्च २०२३ पर्यंतच्या हिशोबाचे ऑडिट झाले आहे, विश्वस्त मंडळ झोकून देऊन काम करते.. सर्व पदाधिकारी व विश्वस्त एकमताने टीम वर्क करतात ही आदर्श शैक्षणिक संस्था कार्यप्रणाली लक्षवेधी आहे.संस्थेने कुंभारी येथे वरिष्ठ महाविद्यालय सुरु करुन ग्रामीण भागातील मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय केली आहे. हा आदर्श राज्यातील इतर शिक्षण संस्थांना मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.'शाळेला पाच एकर जमीन अल्प मोबदल्यात दिलेले डफळे सरकार, संस्थेचे संस्थापक चेअरमन बन्याबापू जोग, सेक्रेटरी जी. आर. कुलकर्णी, ४९ वर्षे सलग *चेअरमन म्हणून काम केलेले जी. बी. ऐनापुरे, विश्वस्त येगाप्पा तंगडी, अण्णया स्वामी, दत्तात्रय जाधव, शामराव मोटगी व जी. डी. मुल्ला,बाळासाहेब कोळी तसेच  श्री  ए .पी.कोळी यांचे योगदान संस्मरणीय आहे. संस्थेचे माजी सेक्रेटरी व विद्यमान व्हा. चेअरमन  *सर्वश्री डॉ. मदनभाऊ बोर्गीकर, सेक्रेटरी डॉ. शंकर तंगडी, जाँईट सेक्रेटरी डॉ. सी.बी.हिट्टी, खजिनदार देवेंद्र पोतदार, सी. एल. तंगडी, बी. एस. मंगसुळी , डॉ. श्रीशैल कन्नूरे व संभाजी माळी*  यांच्या टीम वर्कमुळे संस्थेची भरभराट होत आहे.
 संस्थेच्या विकासात *सर्वश्री  पी. डी. कटरे, खुप मोठे योगदान राहिलेले  श्रीपाद जोशी, म्हेत्री सर, सय्यद, माळी, समंत मॅडम, अंगडी, जुवेकर, हल्याळ, इनामदार, हिरगोंड व होवाळे सर आदींचे   योगदान महत्त्वाचे आहे.'संस्थेच्या गेल्या पंच्चावन वर्षातील इतिहासाला उजाळा देणारे सुभाष शिंदे यांच्या परिश्रमातून तयार झालेले छायाचित्र प्रदर्शन लक्षवेधी ठरले. सुवर्ण महोत्सवी सोहळ्यातील  श्री शिंदे सरांची सेवा प्रशंसनीय आहे. 
 श्री होवाळे सरांचे नेतृत्व अफलातून आहे. दुगाणी सर आणि संस्था प्रशासनातील सेवक  वृंद यांचे योगदान मोठे आहे. 
यावेळी अध्यक्षीय भाषणात  श्री आप्पासाहेब सरगर यांनी मी आज गटविकास अधिकारी म्हणून जे काम करतो त्याचे सारे श्रेय संस्थेला व शाळेला आहे. जत तालुक्यातील विकासाची शासकीय कामे करण्यासाठी मला संस्थेने घडवले त्यामुळे दि फ्रेंड्स असोसिएशन जत व जत हायस्कूल जत या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून मला अभिमान वाटतो. 
यावेळी संस्थेचे माजी मुख्याध्यापक, शाळेला जलशुद्धीकरण यंत्र देणगी दिलेले व इतर पाच माजी विद्यार्थी, रामपूर चे सरपंच  श्री पवार, देणगीदार,जत हायस्कूल,जत चे मुख्याध्यापक  श्री. होवाळे सर, माडग्याळ शाखा मुख्याध्यापक श्री. हिरगोंड  एस.आय.सर, मुचंडी चे मुख्याध्यापक श्री जमदाडे सर, कुंभारी हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ सूर्यवंशी एम.एम.मॅडम , बाल विद्यामंदिर व शिशुविहार जत च्या मुख्याध्यापिका सौ कणसे मॅडम,श्रीमती आलबाळ मॅडम,श्री श्री श्रीशैल कोरे सर,श्री एन. डी. कांबळे सर ,तसेच जत हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, श्री  शिंदे व दुगाणे सर,शाळेचे  माजी विद्यार्थी  डॉ.विवेक महाजन देणगीदार , संस्था सभासद श्री बाबुराव ऐनापुरे,श्री हुजरे, आदींचा सत्कार करण्यात आला.
आभार मुख्याध्यापक  श्री अजितकुमार होवाळे यांनी मानले. सूत्रसंचालन श्री अमोल जोशी सर, सौ.सूर्यवंशी मॅडम व सौ. हल्याळ मॅडम यांनी केले. 
या माजी विद्यार्थी मेळाव्यात पन्नास वर्षापूर्वी  व संस्थेच्या व शाळेच्या सुवर्ण महोत्सवी कालखंडात शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी झालेले अनेक माजी विद्यार्थी शाळा व संस्थेच्या आवारात आल्यानंतर भावूक झाले होते. जुन्या आठवणीत रममाण होऊन संस्था व शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिसत होते. 
दुष्काळ आणि नापीक जमिन पाचवीला पूजलेल्या पाण्याची कायम टंचाई जाणवत असलेल्या जत भागातील दि फ्रेंड्स असोसिएशन आणि तिच्या सर्व शाखांचे शैक्षणिक कार्य मात्र पाणीदार आहे.
ही संस्था अशीच मोठी होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो....
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪

Comments