आणि दिवाळी साजरी झाली!
आणि दिवाळी साजरी झाली ! आणि दिवाळी साजरी झाली !
- श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत ता.जत जि.सांगली. _____________________________________
प्रथम सत्र परीक्षा संपली आणि दि फ्रेंडस् असोसिएशन, जत आणि जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत यांचा संयुक्त सुवर्ण महोत्सव समारंभ सोहळ्याची लगबग सुरूच होती.काही समित्या गेले वर्षभर कामकाजात मग्न होत्या.
मा.मुख्याध्यापक श्री होवाळे साहेबांनी संस्था संचालक , शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांची मिंटीग ठेवली. त्यामध्ये मा .मुख्याध्यापक श्री.होवाळे साहेब,मा.डाॅ.मदन बोर्गीकर,व्हा.चेअरमन यांनी सुवर्ण महोत्सव समारंभ सर्व माहिती,त्यांचे नियोजन यांची सविस्तर माहिती दिली .श्री अमोल जोशी सरांनी विविध खाती त्याचे सदस्य व प्रमुखांनी काय काम करायचं आहे हे सांगितलं. त्यानंतर माननीय संस्था चालक यांनी विचारले की तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या कोणत्या कल्पना, समस्या असतील तर तुम्ही सांगा .मी सर्व बघत होतो मी पटकन उठलो आणि मीटिंगमध्ये मी सांगितले यावर्षी मी दिवाळी सुट्टी घेणार नाही. संस्थेचं, शाळेचे काम करणार आहे .असे म्हटल्यानंतर संस्था संचालक,काही शिक्षकांनी टाळ्या वाजवून माझ्या या संकल्पनेचे कौतुक व स्वागत केले. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच मी सुवर्ण महोत्सवाच्या कामाला लागलो .त्यामध्ये स्मृती फ्रेंड्स छायाचित्र प्रदर्शन, फ्रेंड्स स्मृती व्हिडिओ क्लिप , मोनोग्राम (स्मृती चिन्ह)हे सर्व बनवण्याची कामेही माझ्याकडेच होती .त्याचं नियोजन तयार करत होतो .नियोजनाप्रमाणे, न थकता काम करीत गेलो . कामकाज करीत असताना अडचणी निर्माण होत होत्या .त्यावेळी मुख्याध्यापक, संस्था चालक यांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन काम करीत गेलो. या सर्व गोष्टी घडत असताना माझ्या गावाकडे दिवाळीला मी गावी येणार नाही असे सांगितले होते .त्यामुळे गावाकडील माझी आई, बहीण थोडसं नाराज होते. मी त्यांना सांगितलं फक्त या वेळेला मला माफ करा !मी संस्थेचे काम करणार आहे .अशी माझी मनापासून इच्छा आहे. मी काही झालं तरी येणार नाही. आणि मी मनापासून कामाला लागलो. जतच्या घरी पण मी सांगून ठेवलं होतं .मला घरातील कोणतीही कामे सांगायची नाहीत .मी फक्त सुवर्ण महोत्सव समारंभासाठी विविध कामकाजाचे नियोजन कार्य करणार आहे . त्यामुळे त्यांनी पण कोणतेही काम मला सांगितले नाही. माझ्या इच्छेप्रमाणे मी काम करीत होतो .त्यासाठी सर्व काही नियमानुसार घडत होतं .त्याचा आनंद मला होत होता. दोन वर्षांनी मी या शाळेतून सेवानिवृत्त होईन तेव्हा मला असे क्षण पुन्हा जीवनात मिळणार नाहीत .ज्या संस्थेत मी गेली अनेक वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे. माझ्या ज्ञानमातेचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना माझ्या मनात एक वेगळीच संकल्पना होती .येथील संस्था ,शाळा येथील शिक्षक हे सर्वजण प्रेमळ माणसं आहेत .आपण सेवानिवृत्त होऊन जाताना गोड आठवणींची ही स्मृतीरूपी शिदोरी असावी ! अशी संकल्पना होती .दोन दिवस आधीच माझी सर्व कामे पूर्ण झाली. मला खूप आनंद झाला. मी इतर जी खाती होती त्यांच्या मदतीला जात होतो . कोणतेही काम करण्यास मला कमीपणा कधीच वाटला नाही .शाळा ही आपली आईच आहे. तिची सेवा करताना मलाच आनंद होतो ! ह्या विचारानं नेहमी कार्य करीत असतो.
दि. 26 नोव्हेंबर ,2023 ,दिनांक 27 नोव्हेंबर ,2023 असे दोन दिवस ,दि फ्रेंडस् असोसिएशन, जत आणि जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत.
या संयुक्त सुवर्ण महोत्सव समारंभ सोहळ्यानिमित्त सक्रिय सहभाग घेतला. फ्रेंडस् स्मृती छायाचित्र प्रदर्शन:
मा.ना.डाॅ.सुरेश भाऊ खाडे, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री, सांगली जिल्हा यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी मा.ना.श्री.खाडे साहेबांनी विविध छायाचित्र पाहून ते त्या स्मृती मध्ये रममाण झाले. मागील काही वर्षात त्यांनी शाळांना भेटी दिल्या होत्या.त्या प्रसंगांची काही छायाचित्रे मांडण्यात आली होती. मागील प्रसंगांच्या त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या!
प्रदर्शन पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.*त्यांनी माझे अभिनंदन केले
हा क्षण हा भाग्याचा*!
व्हिडिओ क्लिप: फ्रेंडस् स्मृती !
३०मिनिटांची फ्रेंडस् स्मृती! संस्था, शाळा गेल्या ५०वर्षाच्या स्मृती फोटो, व्हिडिओ यातून ही फिल्म तयार केली. ते Subhash Shinde jath या यूट्यूब चॅनल वरती प्रसारित करण्यात आली आहे.
दोन्हीही दिवसांचे व्हिडिओ चित्रण करून विविध प्रसारमाध्यमातून ते प्रसारित करण्यात आले आहे.
मोनोग्राफ (स्मृतिचिन्ह)
संस्थेचा मोनोग्राफ डिझाईन व निर्मिती करण्याचे काम मला देण्यात आलं होतं. सांगलीमध्ये श्री. आदाटे यांच्याकडे जाऊन डिझाईन व विविध प्रकारचे मोनोग्राम तयार करण्याचे काम मी करीत होतो. मला जत ते सांगलीला चार वेळा जावे लागले. त्यानंतर सर्व मोनोग्रामाचे पॅकिंग श्री. आदाटे यांनी जत ला आणून दिले.
अशाप्रकारे संपूर्ण कामकाज पूर्ण करून सुवर्ण महोत्सव कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी केल्यानंतर मी बुधगावला आलो.
माझी आई, बहिण माझी वाट बघत होते. त्यांच्या मनात होते की दिवाळीचा फराळ माझ्या मुलानं करावा ...मी पण बुधगावालाआलो . दिवाळीचा फराळ केला.....!
आणि दिवाळी साजरी झाली!
धन्य झालो मी... धन्य माझी संस्था अन् धन्य माझी शाळा .....
-श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत.
मंगळवार,दि.२८ नोव्हेंबर २०२३
स्थळ: बुधगाव (ता.मिरज जि.सांगली)
वेळ:५.१७वाजता)
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🟣🔴🟤🔵🟡🟣🔴🟤🔵🟡🟣🟤🔵🟡
Comments
Post a Comment