दि फ्रेंडस् असोसिएशन,जत आणि जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत संयुक्त सुवर्ण महोत्सव समारंभानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..🔴 फ्रेंडस् स्मृती छायाचित्र प्रदर्शन: सादरीकरण: श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक.



🔴🔵🟣🔴🔵🟣🟤🟡🔵🟣🟤🟡🔵🟣जत येथील दि फ्रेंडस असोशिएशन या शैक्षणिक संस्थेसह जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्सच्या संयुक्त सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जत येथील नावाजलेल्या दि फ्रेंडस असोशिएशन संस्थेला आणि जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स या प्रशालेला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संयुक्त सुवर्ण महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. २६ नोव्हेंबर आणि सोमवार दि. २७ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. मदन बोर्गीकर व सचिव डॉ. शंकर तंगडी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
रविवारी पहिल्या सत्रात सकाळी दहा वाजता सुवर्ण महोत्सव समारंभ आणि सुवर्ण मुद्रा स्मरणिका प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप उपस्थित राहणार आहेत. खासदार संजय पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारा आहेत. दुपारच्या सत्रात सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
सोमवारी दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सहकार्यवाह एन. डी. बिरनाळे प्रमुख पाहुणे असणार आहेत. तसेच जात हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए. आर. सरगर अध्यक्षस्थानी असणार आहेत.
या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला जत वासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. मदन बोर्गीकर, सचिव डॉ. शंकर तंगडी यांनी केले. यावेळी डॉ. चंद्रशेखर हिट्टी, देवेंद्र पोतदार, बाळेशा मंगसुळी, डॉ. श्रीशैल कन्नुरे, संभाजी माळी, गुरुनाथ बिज्जरगी, चनबसू तंगडी आणि मुख्याध्यापक अजितकुमार होवाळे उपस्थित होते.
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
🟡 रविवार,दि.२६ नोव्हेंबर २०२३रोजी फ्रेंडस् स्मृती छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
यांचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.सुरेशभाऊ खाडे व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
     शाळेचे कलाशिक्षक श्री.सुभाष शिंदे यांनी यांच्या संकल्पनेतून हे छायाचित्र प्रदर्शन सादरीकरण केले आहे. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत दुर्मिळ फोटो, माहिती दर्शविली आहे.
🟡🟣🔵🟤🔴🟡🟣🔵🟤🔴🟡🟣🔵🟤💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Comments