गुरुवर्य डॉ.श्रीपाद जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

🟡🟣🔵🔵 हार्दिक शुभेच्छा!🔴🟡🟣🔵
साने गुरुजी कथामाला/सेवादल परिवार
डॉ.श्रीपाद जोशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🟡 मा.श्री. हसनभाई देसाई, श्री.सुभाष शिंदे 

जोशी गुरुजींचा वाढदिवस : एक प्रेरक अनुभव. 
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟧🟪🟨🟧🟪🟨  मुळचे येडेनिपाणीचे पण सध्या जत सारख्या दुष्काळी गावात स्थायिक झालेले आम्हा शिक्षकांचे शिक्षक, आचार्य डॉ. श्रीपाद जोशी गुरुजी यांच्यासमवेत एक दिवस व्यतित करण्याची संधी सद्भाग्याने लाभली. डॉ. जोशी म्हणजे हाडाचे शिक्षक जिल्ह्याचे साने गुरुजी डॉ. श्रीपाद जोशी म्हणजे मातृहृदय संवेदनशील, जोशी गुरुजींचा वाढली  प्व्या मनाचे गुरुजी. एक तत्त्वचिंतक लेखक, चितनशील वक्ते अतिशय श्रमपूर्वक जत हायस्कूल जत या शाळेला महाराष्ट्रात एक वेगळी ओळख प्राप्त करून देणारे कुशल प्रशासक शिक्षकांना चैतन्यशील बनवणारे बोलते विद्यापीठ जोशी गुरुजी म्हणजे उत्तम माणूस, मित्र, पालक, लोकशिक्षक. आयुष्याची संध्याकाळ सुद्धा आनंददायी करू पाहणारे महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे आधारस्तंभ ज्येष्ठांचे कुशल संघटक ज्यांच्या चरणावर श्रद्धेने मस्तक टेकवावे असे संस्काराचे नंदादीप मितभाषी निरंजन!
आमच्या डॉ. श्रीपाद जोशी गुरुजींचा ८० वा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. त्यांच्या मुलाने आणि सूनबाईंनी संपन्न केला वाढदिवस कसा साजरा करावा याचा वस्तू पाठ त्यादिवशी अनुभवला. साधेपणातील सौंदर्याची अनुभूती आली विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय अनुभवला.
श्रीक्षेत्र औदुंबर तीर्थक्षेत्री अगदी साधेपणात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाला. प्रसिद्धी नाही की कुठला डामडौल नाही. कुठे जाहिरात नाही आठ तेदहा कुटुंबीय आणि गुरुजींचा श्वास असणारा मराठी अध्यापक संघ अशा २० ते २५ लोकांच्या उपस्थितीत वाढदिवस सोहळा विनोदात विविध गप्पात चांगलाच रंगला.
दत्तगुरूंना अभिषेक झाला. ८०निरंजनाने औक्षण करणेत आले. शाहीर पाटील, विठ्ठल मोहिते, ह. रा जोशी, बेडगे सर असे मराठी अध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. गुरुजींचा सत्कार आम्ही ग्रंथ भेट केला. गुरुजींचेदीर्घायुष्य चिंतीले. शाहीर पाटील यांच्या ६५ चे अभंग या पुस्तकावर आशय संपन्न चर्चासत्र झाले. गुरुजींनी आम्हा सर्वांना पुस्तके भेट दिली. सुंदर रुचकर भोजन झाले.
डॉ. श्रीपाद जोशी गुरुजींचा मुलगा अमोलने आपल्या वडिलांच्या वाढदिवसाचे नियोजन केले होते. आई-वडील दुर्लक्षित राहताहेत. ज्येष्ठ मंडळी अडगळीत जाताहेत... एकमेकांचे पटत नाही
त्यातून वृद्धाश्रम वाढताहेत अशा वातावरणात मुलांनी बाबांना आनंद देणारा हा उपक्रम म्हणजे वाढदिवस करणे याला या काळात महत्त्व आहे. समाजावर केलेला हा संस्कार आहे. मुलांनासुद्धा अशाप्रकारे संस्कारशील
घडविणे हेही महत्त्वाचे आहे. डॉ. श्रीपाद जोशी गुरुजी म्हणजे- हास्याचा निर्मळ झरा. ८० व्या वर्षी सुद्धा तरुणांना लाजवेल असा उत्साह असे चैतन्य प्रकृती ठणठणीत उत्तम निरोगी देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परते या उक्तीची प्रचिती देणारी देहयष्टी आणि तशीच उत्तम दिनचर्या हे भाग्य गुरुजींना कुठून मिळाले प्रामाणिक जगणे नियमितपणा निर्मळ मन सकारात्मक शांत मन गोडवाने या साऱ्या गुणांमुळेच प्रकृती पण उत्तम राहिली आहे. कर भला होगा भला याचे साक्षात प्रत्यंत!.
वाढदिवस म्हणजे केक. वाढदिवस म्हणजे मेणबत्त्या ! गुरुजींच्या वाढदिवसात या गोष्टींना चारा नव्हता वाढदिवसाच्या उपक्रमातून ही संस्काराची पेरणी किती साधेपणा, सात्विकता, निर्मळपणा, जोशीबाईंची उत्तम साथ,
सर्वांचा समन्वय यामुळे गुरुजींचे
जगणे म्हणजे आनंदयात्रा हा
वाढदिवस त्यांचेच प्रत्यंतर गुरुजीच्या सहवासात पाच-सहा तास कसे गेले कळलेच नाही. अगत्य, स्वागत, समारोप, निरोप हे सारे करावे तर. ते आमच्या जोशी गुरुजींनीच. डॉ. श्रीपाद जोशी गुरुजींचा वाढदिवस त्यांच्यासाठी तर आनंददायी झालाच, पण आमच्यासाठी चैतन्यदायी,
चिरस्मरणीय झाला. वाढदिवसाचा अनुभव सर्वांसाठी संस्काराची वाट संस्कारशील मुलं, सुना, नातवंडे दाखवणारा ठरला.
🔵 अनुभव शिल्पे : श्री.सुभाष कवडे
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟧🟧🟪🟧
🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧

Comments