शिक्षक दिनी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला!


   
  जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत मध्ये नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न!!!!!💐💐
💐💐💐🟪🟨🟧🟪🟨🟧🟨🟧🟧🟨🟨
*शिक्षक दिनी!जत हायस्कूल जत मध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला*!   
      ५ सप्टेंबर.२०२३ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून जत हायस्कूल अँड ज्युनिअर काँलेज आँफ आर्ट्स अँड सायन्स, जत च्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्या निमित्ताने संस्थेचे व्हा.चेअरमन मा.डॉ. एम.व्ही. बोर्गीकर साहेब, सेक्रेटरी मा. डॉ. एस.वाय. तंगडी साहेब, संस्था संचालक खजिनदार तथा शाळा समिती चेअरमन मा. श्री. डी.व्ही. पोतदार साहेब , संचालक मा.डॉ. एस.एम.कन्नूरे साहेब , जेष्ट संचालक मा. श्री. सी. एल.तंगडी साहेब ,संचालक मा.श्री.जी.एस. बिज्जरगी साहेब , मा.श्री. एस.व्ही.माळी साहेब ,संस्था सदस्य मा.डॉ. व्ही.एस.तंगडी मँडम , मा. डॉ. एन. एस. बिज्जरगी मँडम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यालयाचे उद्घाटन मा.डॉ. एम.व्ही.बोर्गीकर साहेब यांनी श्रीफळ वाढवून केले. मुख्याध्यापक कक्षाचे फित कापून मा. डॉ. व्ही. एस. तंगडी मँडम प्रवेशारंभ केला. लेखनिक कक्षाचे फित कापून मा. डॉ. एन.एस. बिज्जरगी मँडम यांनी प्रवेशारंभ केला. शिक्षक खोल्यांचे फित कापून मा. संचालक महोदयांनी  उद्घाटन केले . मा. डॉ.एम.व्ही. बोर्गीकर साहेब , मा.डॉ. एस.वाय्. तंगडी साहेब व सर्व संचालक यांनी मुख्याध्यापक श्री. ए. बी. होवाळे यांना खुर्चीवर सन्मान पूर्वक बसवले . 

Comments