एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षा-२०२३🟧सराव करू या!🟣श्री.सुभाष शिंदे कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत.
🟨वस्तुचित्र(object )
एलिमेंट्ररी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेला पहिला पेपर वस्तूचित्र(object ) असतो.
समोर दोन वस्तू व नैसर्गिक घटक नारळ किंवा टोमॅटो असे पदार्थ ठेवले जातात. आपल्या जागेवरून जसे रेखाटन दिसते तसे रेखाटन करायचे असते. प्रमाणबद्ध रेखाटन, मांडणी सुयोग्य व रंगकाम जसे दिसते तसे करायचे असते. वस्तू वरील छाया, प्रकाश, पोत दाखवायचे असतात.
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
एलिमेंट्ररी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेला स्मरणचित्र दुसरा पेपर असतो. एकूण तीन ते चार विषय दिले जातात आपल्याला आवडणारा एकच विषय निवडायचा व रेखाटन विषयानुसार करायचे असते .कमीत कमी तीन पेक्षा जास्त व्यक्ती रेखाटन करायचं असते. चित्र मोठे आकाराचे विषयानुसार असावे .रंगकाम पूर्ण अन असावे.
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪
🟪 संकल्पचित्र व नक्षीकाम (Design)
एलिमेंट्ररी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेला हा तिसरा पेपर संकल्प चित्र व नक्षीकाम असतो.
यामध्ये भूमिती घटक व अलंकारिक आकार याचा वापर करायचा असतो. मुख्य घटक याचे माप दिले जाते व आतील घटक सांगितल्याप्रमाणे रेखाटन आपल्या कल्पनेने करायचे असते .मांडणी सुरेख ,सुंदर हवी! रंगकाम करताना विविध छटा रंगसंगतीचा वापर करावा.स्वच्छता टापटीप याकडे लक्ष द्यावे.
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
🟧 कर्तव्य भूमिती व अक्षर लेखन.
( Geometry and Letring)
एलिमेंट्ररी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेला हा चवथा पेपर असतो.
एकूण पाच भूमिती कृती देण्यात येतात त्यामधील चार भूमिती सोडवायची असतात.
अक्षर लेखन मध्ये एक शब्द दिला जातो उदाहरण चित्रनगरी बाल क्रीडा ,बालकला असे शब्द देतात. यावरून विषय अनुसरून आपण अक्षरलेखन व पार्श्वभूमी मध्ये आपल्या कल्पनेनुसार आकर्षक मांडणी करायची असते.
🟨🟪🟧🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧
🔴🟣🟡 एलिमेंट्ररी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेसाठी
Comments
Post a Comment