दि फ्रेंडस् असोसिएशन, जत.🔵 ५७वा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐💐💐💐💐💐🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟧🟪🟨
दि फ्रेंडस् असोसिएशन, जत.
विद्यमान संचालक मंडळ
सेक्रेटरी
जाॅ.सेक्रेटरी
खजिनदार
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟪🟨🟧🟪🟨🟧
दि फ्रेंडस् असोसिएशन, जत.
ता. जत जि.सांगली.
🔴(स्थापना: दि.१० जुलै १९६६)
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪
५७ व्या वर्धापनदिन प्रसंगी हार्दिक शुभेच्छा💐🟧🟪💐💐🟨💐💐🟪💐💐🟧💐💐💐
आज आपण आपल्या संस्थेचा ५७ वा वर्धापन दिन आहे. संस्थेचे अध्यक्ष सर्व संचालक, सभासद, हितचिंतक, उदात्त देणगीदार, शिक्षक-शिक्षकेतर सेवक , विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक या सर्वांचे हार्दिक स्वागत !
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
संस्थेला आणि शाळांना खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त करुन देणारे सुयशप्राप्त विद्यार्थी- विद्यार्थिनी, उत्कृष्ट खेळाडू आणि त्यांची सर्वांगीण जडण-घडण करणारे प्रिय अध्यापक-अध्यापिका यांचे मनस्वी अभिनंदन ! संस्थेच्या ५७ व्या त्यांचे मी विशेष कौतुक !
संस्थेच्या इतिहासातील ५७ वर्षांचा कालखंड हा तसा पाहिला तर बराच मोठा कालखंडात ग्रामीण भागातील, प्रतिकूल परिस्थितीतील, कितीतरी विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेऊन सुस्थितीत जीवन व्यतीत करीत आहेत. याचे आम्हांस सात्विक समाधान वाटते. संस्थेच्या व शाखांच्या वाटचालीत आणि उत्तुंग प्रगतीत संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक यांची सेवावृत्ती अत्यंत मोलाची असून त्याचा आम्हांला अभिमान आहे !
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
🟣🟡 हार्दिक शुभेच्छा!🟣🟡
इवलेसे रोपटे लाविलीयाद्वारे तयाचा वेलू गेला गगनावरी!
महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत मानाचा तुरा खवणारी आपल्या सर्वांची दि फ्रेंडस् असोसिएशन संस्था जत हिचा आज वर्धापन दिन आहे. अकरा मित्रांनी एकत्र येऊन जत सारख्या दुष्काळी भागात हे शैक्षणिक रोपट लावलं व त्याला प्रयत्नांचं खत पाणी घालून हा शैक्षणिक वृक्ष मोठा केला आहे. संस्थेच्या जडणघडणीत चेअरमन, व्हाईस चेअरमन ,सेक्रेटरी, जॉ. सेक्रेटरी ,खजिनदार व सर्व संचालक, सभासद मंडळी यांचा सिंहाचा वाटा आहे. या संस्थेच्या विविध विद्याशाखांमधून पवित्र ज्ञानदानाचे कार्य अनेक माझी गुरुवर्यांनी केले आहे व तोच पवित्र वारसा घेऊन आताचे सर्व गुरुवर्य संस्थेचा हा अमूल्य ज्ञानदानरूपी ठेवा वृद्धिंगत करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहत आहेत. खरोखरच आम्हा सर्व गुरुवर्यांचं परमभाग्य की आम्ही सर्वजण या पवित्र , निकोप व पारदर्शी कारभार असणाऱ्या शैक्षणिक दालनाचे एक भाग आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शैक्षणिक संस्थेचा नावलौकिक ज्ञात आहे.त्यांचे संपूर्ण श्रेय गतकालीन सर्व मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, अध्यापक, अध्यापिका व सेवक वर्ग यांना जाते. संस्थेचे एकूणच कार्य प्रशंसनीय असे आहे. येथे कार्य करणारे सर्वजणच आनंदाने, एकीने आपले पवित्र शैक्षणिक कार्य बजावत आहेत. संस्थेचे सर्वच पदाधिकारी येथे कार्य करणाऱ्या गुरुवर्यांचं मनोधैर्य वाढवण्याच, योग्य प्रबलन देऊन सर्वांच्या कार्याचे उत्तम कौतुक करतात.
म्हणूनच आज दि फ्रेंड्स असोसिएशन संस्था जत हीचे नाव सुवर्ण अक्षराने कोरले गेले आहे. संस्थेचा हा अमूल्य ठेवा आपण असाच जपून ठेवू आणि हा ज्ञानदीप आपणा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या जीवनात नव्या प्रगतीच्या वाटा शोधण्याचा कामी प्रज्वलित करूयात.
आपण आपले काम निष्ठेने मनापासून करून संस्थेचा नवलौकिक असाच शैक्षणिक क्षेत्रात वाढवत राहू हेच आजच्या वर्धापनदिनी मला सांगावेसे वाटते.
आजच्या दि फ्रेंडस् असोसिएशन संस्था जत च्या वर्धापन दिनी संस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी यांना तसेच जत हायस्कूल जुनियर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स माडग्याळ, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, कुंभारी, न्यू इंग्लिश स्कूल, मुचंडी व कै. सुरेश बिज्जरगी शिशुविहार, जत, गिरेव्वाबाई ऐनापुरे बाल विद्यामंदिर ,जत या सर्व शाखांचे सन्माननीय मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्राध्यापक, प्राध्यापिका, अध्यापक ,अध्यापिका व शिक्षकेतर सेवक वृंद यांना संस्था वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!.
आपणा सर्वांच्या हातून संस्थेच्या प्रगतीसाठी उत्तम कार्य घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
धन्यवाद!
सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी!
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत.ता.जत जि.सांगली.
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
🟣 संपादक: श्री.सुभाष शिंदे
Subhash Shinde
S Art News...Jath.
🟣🟡🔴🟣🟡🔴🟣🟡🔴🔵🟣🟡🔴🔵
.
Comments
Post a Comment