क्रांतीकारक
🟣🔴भगतसिंग🔴🔴🟡🔵
पिंजऱ्यात बंद केलेल्या पोपटाकडे पाहून स्वातंत्र्याचा अर्थ उमगू लागतो. खोलीत कोंडलेले मांजर सुटकेसाठी धडपडत असते. साखळदंडांनी जखडलेला सिंह मुक्त होण्यासाठी दरवाज्याला धडका मारतो. बंधनात अडकलेले प्राणीही स्वातंत्र्याचे भुकेले असतात. मुक्या प्राण्यांना जर स्वातंत्र्याचे मोल कळते, तिथे माणूस हा तर बुद्धिवान प्राणी. त्याला बंधनात राहणे कसे रुचेल?
प्रत्येक प्राणिमात्रालाच स्वातंत्र्य अतिप्रिय असते. स्वातंत्र्यासाठी तो जिवाचे रान करतो. प्रसंगी प्राणाची आहुती देतो. बंधन म्हणजे पारतंत्र्य, गुलामगिरी. भारतमाताही अशीच पारतंत्र्यात असताना तिचे सुपुत्र हे कधी तरी सहन करणे शक्य आहे काय? तिच्या अशाच काही सुपुत्रांनी, वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन तिच्या सुटकेचा प्रयत्न केल्याचे आपणास दिसून येते, आणि मग डोळ्यांसमोर दिसतात, ते भगतसिंग.
सरदार भगतसिंग हे अन्यायाविरुद्ध पेटून उठलेले, सळसळत्या रक्ताचे तरुण होते. इंग्रज सरकारच्या राजवटीत आपल्या देशबांधवांवर होत असलेला जुलूम, अत्याचार पाहून इंग्रजांना धडा शिकविण्यासाठी, इंग्रज सत्ता उलथून टाकण्यासाठी सशस्त्र क्रांतिकारी तरुणांच्या मेळाव्यात ते सामील झाले.
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟨🟧🟧
,
🔴🔴🟡🟡मादाम कामा🟣🟣🔴🔴🟡🟡
मादाम कामा यांचे खरे नाव भिकाबाई रुस्तुम कामा. एका सधन पारशी कुटुंबात १८६१ साली मुंबईत त्यांचा जन्म झाला. बॅरिस्टर रुस्तुम कामा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. परंतु आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी त्यांचे मन दुःखी होत होते. इंग्रज सरकार भारतीय लोकांवर हुकमत गाजवून त्यांचे जीवन यातनामय करीत होते; म्हणून मादाम कामा यांना इंग्रजांबद्दल भयंकर तिटकारा वाटत होता. आपल्या गरीब भारतीय बांधवांची सेवा करून त्यांना इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्याच्या कार्यात सामील व्हावे, असे त्यांना वाटत होते. 🟨🟪🟧🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
🟡🟡🔴हुतात्मा शिवराम हरी राजगुरु🔴🟡🟡
भारतमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यात शिवराम हरी राजगुरू हे अग्रस्थानी होते.
राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरूनगर) येथे इ.स. १९०८ साली झाला. गावातच प्राथमिक शिक्षण झाल्यावर ते अमरावती येथे पुढील शिक्षण घेऊ लागले त्याचवेळी बलदंड शरीरसंपदा कमावण्यासाठी व्यायाम करीत असतानाच त्यांच्या मनात देशभक्तीचे बीज रुजले.
🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧
क्रांतिसिंह नाना पाटील
आपल्या कर्तृत्वाने 'पत्री सरकार'ची स्थापना करून ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणारे थोर क्रांतिकारक 'नाना पाटील' देशभर गाजले. नाना पाटील यांचा जन्म इ.स. १९०० मध्ये सांगली जिल्ह्यात झाला. त्यांचे सुरवातीचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झाले. मुलकी परीक्षा पास झाल्यावर नाना तलाठी म्हणून नोकरी करू लागले. त्या काळात महात्मा फुल्यांची 'सत्यशोधक चळवळ' जनजागृतीचे कार्य करीत होती. नानाही या जनजागृतीच्या कार्यात सामील झाले आणि प्रचार करू लागले. अंधश्रद्धा- निर्मूलन, हुंडाबंदी, सर्वधर्मसमभाव असे समाजाचे प्रश्न हाती घेऊन ते समाजसेवा करू लागले.
त्याच वेळी इंग्रजांविरुद्ध महात्मा गांधींनी सुरू केलेल्या 'असहकार आंदोलना'त त्यांनी उडी घेतली. मात्र अशा मार्गाने इंग्रज लोक भारत सोडून जातील, असे त्यांना वाटत नव्हते. मात्र गांधीजींच्या बद्दल मनात पूज्यभाव बाळगून त्यांनी आपली वेगळी वाट धरली. 'चले जाव चळवळी'त नाना आणि त्यांच्या काही साथीदारांनी प्रसंगी हिंसक मार्गाचा अवलंब करून इंग्रज सरकारला जेरीस आणले.
🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟪
🔴🟡🔴वासुदेव बळवंत फडके🟡🔴
'सशस्त्र क्रांती केल्याशिवाय भारतमातेच्या पायांतील गुलामगिरीच्या शृंखला तुटून पडणार नाहीत' असा विचार करणारे वासुदेव बळवंत फडके हे सशस्त्र क्रांतीचे कडवे पुरस्कर्ते होते.
१८४५ साली रायगड जिल्ह्यात वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण केल्यावर मिळणारे सरकारी प्रशस्तीपत्रक केवळ इंग्रज सरकारचे असल्यामुळे ते त्यांनी नाकारले. अशा करारी बाण्याचे फडके अखेर हिशोब खात्यात नोकरी करू लागले.
काम करीत असतानाच त्यांनी आपल्या पुढील कार्यासाठी घोडेस्वारी, तलवार चालविणे, दांडपट्टा फिरविणे, असे शिक्षण घेतले. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेशात मोठा दुष्काळ पडला. त्यात हजारो प्राणी आणि माणसे अन्न/पाण्याविना तडफडून मरू लागली. मात्र जनता अशी नाहक बळी जात असता परके इंग्रज सरकार काहीच हालचाल करित नव्हते. भारतीय जनतेवर अधिकार गाजविण्यातच ते मशगुल होते.🟨🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨
खुदीराम बोस
महाराष्ट्र आणि बंगाल यांनी भारतमातेला अनेक राष्ट्रभक्त आणि क्रांतिकारी सुपुत्र बहाल केले. क्रांतिकारी विचारांचे खुदीर बोस हे त्यांपैकीच एक क्रांतिरत्न. भारतमातेच्या पराधीनतेच्या बेड्या तोडण्याच्या कार्यात त्यांनी फासाचा दोर आपल्या गळ्यात अडकवून घेतला. 'वंदे मातरम्' असा घोष करीत हसत- हसत त्यांनी आपल्या प्राणांची समिधा स्वातंत्र्याच्या होमकुंडात अर्पण केली.
खुदीराम बोस हे फक्त एकोणीस वर्षांचे बंगालचे सुपुत्र जहाल क्रांतिकारी विचारांचे होते. ‘वंदे मातरम्' हा त्या वेळचा क्रांतिकारी तरुणांचा स्फूर्तिदायी मंत्र होता. खुदीराम बोस यांनी हा मंत्र क्रांतिकारकांच्या मेळाव्यात गायला आणि तोच मंत्र युवकांना प्रेरणा देणारा ठरला.
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪
🟡🔴🟡चंद्रशेखर आझाद🟡🔴🔵
भारतमातेचे पाय शृंखलांनी जखडले होते, ते इंग्रजांनी. त्या शृंखला होत्या गुलामगिरीच्या पारतंत्र्याच्या, दास्याच्या. म्हणून त्या तोडण्यासाठी, मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तिचे क्रांतिपुत्र जिवावर उदार होऊन पुढे आले. आपल्या प्राणाचे मोल देऊन त्यांनी भारतमातेला आझाद केले, स्वतंत्र केले. भारतमातेच्या अशाच अनेक क्रांतिपुत्रांपैकी एक होते 'चंद्रशेखर आझाद'! -
लहान वयापासूनच त्यांना इंग्रज भारतीय जनतेवर करीत असलेले अत्याचार दिसत होते. इंग्रज लोकांनी आपला देश बळजबरीने बळकावला असून ते आपल्या लोकांवर हुकमत गाजवून त्यांच्यावर जुलूम करतात, हेही त्यांनी पाहिले होते. अत्याचारी, परकी इंग्रजांना धडा शिकविण्यासाठी, त्यांना आपल्या मायभूमीतून हुसकावून लावण्यासाठी आझादांचे तरुण रक्त सळसळत होते.
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
झाशीची राणी लक्ष्मीबाई
आपल्या असामान्य शौर्याने झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी इ.स. १८५७ च्या भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात इंग्रजांशी रणांगणात दोन हात करून आपल्या प्राणांची आहुती दिली.
लक्ष्मीबाईंचे खरे नाव 'मनू' असे होते. त्यांचे बालपण ब्रह्मावर्त येथे राहणाऱ्या पेशव्यांच्या दरबारात गेले. त्यामुळे पेशव्यांच्या मुलांबरोबर त्यांनीही युद्धशास्त्राचे सर्व शिक्षण घेतले होते. झाशी संस्थानचे राजे गंगाधरराव यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर त्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
पुढे त्यांचा लहान मुलगा व नंतर गंगाधरराव यांचे निधन झाल्यावर लक्ष्मीबाईंनी राज्याला वारस म्हणून एका मुलाला दत्तक घेतले. परंतु इंग्रज सरकारने हे दत्तक विधान नामंजूर करून झाशीचे राज्य खालसा केले. हे समजताच राणी लक्ष्मीबाई कडाडल्या - "मेरी झाँसी नहीं दूँगी!”
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪
Comments
Post a Comment