मा.श्री.माळी एम.एस . पर्यवेक्षक यांचा सेवानिवृत्त जत निमित्त सत्कार समारंभ....! 🔵जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत

जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत चे पर्यवेक्षक श्री.माळी एम.एस यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ!!!!
🟪🟧🟨🟪🟨🟧🟪
जत:जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत चे पर्यवेक्षक श्री.माळी एम .एस.यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.या सत्कार समारंभास दि फ्रेंडस् असोसिएशन जत चे खजिनदार श्री.डी.व्ही.पोतदार, संचालक श्री.बिज्जरगी जी. एस. साहेब ,श्री.तंगडी सी. एल. साहेब, शाळेचे मुख्याध्यापक श्री.होवाळे ए.बी‌.साहेब, विविध शाळेचे मुख्याध्यापक श्री.हिरगोड सर,श्री.जमदाडे सर, श्री.नदाफ सर,सत्कारमूर्ती श्री.माळी एम.एस.यांचे पाहुणे मंडळी, मित्र परिवार व सहकारी शिक्षक, शिक्षिका वृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत सौ./श्री.माळी एम.एस, पर्यवेक्षक यांचा सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार करण्यात आला.
शाळेच्या वतीने शाल श्रीफळ भेटवस्तू,हार सौ./श्री.माळी सरांचा सत्कार मुख्याध्यापक श्री.होवाळे सर,सौ.कोळसे मॅडम यांनी केला.संस्थेचा सत्कार मा.श्री.सोनार साहेब,श्री.तंगडी,श्री.बिज्जरगी साहेबांनी केला.विविध शाळांचे मुख्याध्यापक, मित्रमंडळी, पाहुणे मंडळी यांनी यांनी सत्कार करण्यात आले.
    सत्कारमूर्ती श्री.माळी एम.एस.पर्यवेक्षक यांनी संस्थेच्या विविध शाखांमध्ये अध्यापक करताना आठवणींना उजाळा दिला.त्यांनी संस्था, शाळा, पालक बंधू भगिनींचे आभार मानले.माडग्याळ गावातील उपस्थित ग्रामस्थ, मित्रमंडळी, पाहुणे मंडळी यांची उपस्थिती ही या समारंभाची शोभा वाढली.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमोल जोशी सरांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.होवाळे ए.बी., ज्येष्ठ शिक्षक श्री.चौगुले एस.डी.यांचे मार्गदर्शन, श्री.उजनीकर सर,श्री.तंगडीसर,श्री.स्वामी सर,श्री.पंडीत कांबळे सर,श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक व सर्व अध्यापक, अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.
🟧🟨🟪🟧🟨🟧🟨
https://youtu.be/I5k9wxnoDWs

Comments