लायन्स क्लब मुळे सामाजिक दर्जा वाढतो....
लायन्स क्लब मुळे सामाजिक दर्जा वाढतो प्रांतपाल लायन भोजराज नाईक निंबाळकर लायन्स क्लब ही एक आंतरराष्ट्रीय जगाच्या पाठीवर एकमेव संघटना आहे आणि या संघटनेमध्ये जो काम करतो त्याची समाजामध्ये उंची वाढते एक चांगला दर्जा प्राप्त होतो असे मत प्रांत 32 34 d1 चे नूतन प्रांतपाल लायन भोजराज नाईक निंबाळकर यांनी आपले मत मांडले ते आज फलटण .येथील प्रांताचा शपथविधी व पदग्रहण कार्यक्रम च्या वेळी बोलत होते या शपथविधी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे . लायन डॉक्टर नवल मालू लायनपंकज मेहता तसेच श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकरयांच्या उपस्थितीत झाला यावेळी इन्स्टॉलिंग ऑफिसर . लायन पंकज मेहता इंटरनॅशनल डायरेक्टर यांनी नवीन प्रांतपाल श्री भोजराज नाईक निंबाळकर उपप्रांतपाल एक लायन अँड एम के पाटील उपप्रांतपाल दोन डॉक्टर लायन वीरेंद्र चिखले व इतर सर्व जी ए टी जी एम टी जी इ टी एल सी आय एफ व इतर सर्व संचालक यांना शपथ देण्यात आली व त्यांना आपली काय जबाबदारी आहे हे सर्व डिजिटल च्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले
लायन पंकज मेहता क्लब ची संख्या वाढविणे क्लब मधील सभासदांची संख्या वाढविणे क्लब चा सामाजिक दर्जा वाढविणे सामाजिक उपक्रम राबविणे कायमस्वरूपी प्रकल्प राबविणे इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी या प्रांतातील सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणेधुदुर्ग रत्नागिरी या भागातून सर्व लायन्स क्लबचे अध्यक्ष सचिव खजिनदार व निवडलेले कॅबिनेट ऑफिसर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीप पूजन करून झाली व्यासपीठावरून प्रत्येक कोऑर्डिनेटर मेंबरने आणि विभाग प्रमुखाने याच्या वर्षभरामध्ये कोण कोणत्या कामाची आखणी करणार आहे हे सांगण्यात आले जी एम टी कोऑर्डिनेटर लायन डॉक्टर रवींद्र हत्तळी यांनी या प्रांतामध्ये जवळपास 800 सभासद वाढविण्याचे उद्दिष्ट जाहीर केले हे सभासद वाढविण्यासाठी रीजन तीन चे जी एम टी कोऑर्डीनेटर लायन दिनकर पतंगे यांनी प्रोत्साहन पर सांगली जिल्ह्यातील जो लायन्स क्लब दहा सभासद वाढवेल त्या क्लबला रुपये पाच हजार चे बक्षीस जाहीर केले आहे यावेळी माझी प्रांतपाल लायन अशोक मेहता लायन बाबासाहेब पवार लायन जगदीश पुरोहित व इतर माजी प्रांतपाल यांनी बहुमोल मार्गदर्शन केले .लायन सुभाष शिंदे, अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ जत, लायन राजेंद्र आरळी, उपस्थित होते. शेवटी उत्कृष्ट भोजनाचा सर्वांनी स्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.
Comments
Post a Comment