एक आदर्श कर्तव्यदक्ष व प्रेमळ सर्वच्या आवडता...! सौ.सविता धनंजय भोळे यांना मानाचा मुजरा!!!!
माझी बदली सातारा भारत स्काऊट आणि गाईड येथे झाली असून मी आज सांगलीतून कार्यमुक्त होत आहे.
जून 2015 साली मी सांगली येथे रुजू झाले होते.
तेव्हापासून आजपर्यंत सांगली जिल्ह्यात स्काऊट गाईड चळवळ, उपक्रम राबविताना,आपणा सर्वांसोबत काम करताना अतिशय चांगले अनुभव मला आले.
माझ्याकडून कळत नकळत जर कोणाचे मन दुखावले गेले असेल तर क्षमा असावी.
आपल्या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.आपल्या सर्वांकडून सकारात्मक दृष्टीकोन व प्रेरणा मिळाली. निश्चितच मला भविष्यामध्ये याचा लाभ होईल. आपल्या सर्वांची आठवण येत राहील.आपण सर्वांनी माझ्या सांगली जिल्ह्यातील सेवाकाळात जे सहकार्य केलात त्याबद्दल आपल्या सर्वांना मी मनापासुन धन्यवाद व्यक्त करते. आपल्या सर्वांची आभारी आहे.🙏🙏-----आपली
🔵सौ.सविता धनंजय भोळे, जिल्हा संघटक,सांगली भारत स्काऊट आणि गाईड
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪
मा.सौ.सविता धनंजय भोळे, मॅडम
संघटन आयुक्त,
सांगली जिल्हा भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय, सांगली.
यांना नमस्कार!!!!!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कब बुलबुल, स्काऊट गाईड जिल्हा मेळावा वेळी
मॅडम आणि श्री.संजय मलकुवार आमचा हा जिल्हा मेळावा शेवटचा आहे. असे म्हणत होते. मला वाटलं ते दोघेजण उगाच बोलतं आहेत. आज मॅडमचा वरील मेसेज वाचला आणि ते खरंच आहे! असं वाटलं. मॅडम जून 2015 साली सांगलीमध्ये हजर झाल्या आणि काही दिवसांमध्येच त्यांनी आपल्या कार्याचा ठसा दाखवण्यास सुरुवात केली. स्काऊट ऑफीस मध्ये विविध प्रकारचे विभाग असतात .स्काऊट, गाईड ,कब ,बुलबुल यांची माहिती त्यांना होती. आणि बघता ,बघता सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगल्या अधिकारी म्हणून प्रसिद्ध पावल्या ! त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जे ऍक्टिव्ह शिक्षक आहेत. त्यांची माहिती त्यांना होती.
विविध तालुक्यांमध्ये जाताना त्या नेहमी त्या शिक्षक, शिक्षिका यांच्याशी संवाद साधत त्यामुळे सर्वासी एकरूप झालेल्या सौ .भोळे मॅडम सांगली कार्यालयामध्ये कार्यालय मध्ये सर्वांच्या आवडत्या अधिकारी झाल्या!!!! जिल्हा मेळावा असू दे कब, बुलबुल ,स्काऊट ,गाईड राज्य पुरस्काराचे फॉर्म असू दे त्या बिनचूक फॉर्म भरून देत असत आणि सर्वांशी प्रेमाने ,आपुलकीने वागत असत. जिल्हा कार्यालय मध्ये येणारे शिक्षक, शिक्षिका या सर्वप्रथम सौ.भोळे मॅडम यांच्याकडे जात असत ! त्या पण येणाऱ्या शिक्षकांशी आपुलकीने वागत असत. प्रत्येक गोष्ट करताना त्यांनी जिल्ह्यातील जेष्ठ स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन यांचे मार्गदर्शन सल्ला घेत असत .यामुळे समस्या निर्माण होत नसत. गेल्याबरोबर शिक्षकास लागणारे साहित्य फॉर्म याची माहिती देत असत. एखाद्या वेळी एका शिक्षकाने फोनवरून माहिती मागितली की ते त्या ते पटकन देत असत प्रत्येक ठिकाणी प्रामाणिक काम करणारा अधिकारी सांगली जिल्हा भारत स्काऊट गाईड विभागाला लाभला. त्यामध्ये भोळे मॅडम यांचे नाव सर्वप्रथम गावे लागेल.!
जिल्हा मेळावा नियोजन हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. त्यांनी प्रत्येक विभागाला शिस्त लावली. त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी जिल्हा मेळावा एक आदर्श प्रमाणे साजरा होत आहे. जिल्हा मेळावा सुरू झाल्यापासून आज अखेर मी ऍडव्हान्स पार्टी लिडर काम पाहिले आहे.सौ. भोळे मॅडम मॅडम नियोजना आधी एक महिना आम्हांला सांगत सर पुढल्या महिन्यात जिल्हा मेळावा आहे .तुम्ही नक्की यायचं ! जे अनुभवी स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत .याची माहिती त्यांना नेहमी असत . एखाद्या तालुक्यामध्ये जाणे आधी तेथील वरिष्ठ ज्येष्ठ स्काऊट मास्टर , गाईड कॅप्टन,गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी आणि शिक्षक ते त्यांच्याशी आधीच बोलून घेत असत. त्यामुळे त्या तालुक्यामध्ये गेल्यानंतर स्काऊट ,गाईडचे काम चांगल्या प्रकारे होत असे!!!
सर्वाशी आपुलकीने चौकशी करीत असतं! माझेच
उदाहरण ऑफिस मी आल्यावर सर! तुमच्या आईची तब्येत कशी आहे.हे शब्द कानावर पडले की मला माझी मोठी बहीण मला विचारते असं वाटायचं! मॅडम आमच्या सांगली जिल्ह्यातील आपल्या भगिनी झाल्या होत्या!
प्रत्येक ठिकाणी शिस्त लावली! वरिष्ठ अधिकारी
अधिकारी सुध्दा सौ. भोळे मॅडम यांनी सांगितले की ते आनंदाने ऐकत असे!
सातारा जिल्हा मध्ये तुमची बदली झाली. मला
आमच्या सांगली जिल्ह्याला तुमच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकारी हवा होता!
पण शासकीय कर्मचारी वर्ग बदली जावं लागतं!
तुम्ही आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये आदर्श, सुंदर, छान कामकाज केले आहे! आपल्या कार्याचा ठसा तुम्ही सांगली जिल्ह्याचे नाव राज्यस्तरीय,देशस्तरीय जाण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत.
तुम्हांला स्काऊट शालूट !!!!!!🙏🙏🙏🙏
मॅडम तुमच्या कन्येने सुयश प्राप्त केले आहे.
मी सांगलीला येऊन अभिनंदन!करणार होतो!
तुम्हांला पेढे मागायचे होते...
सौ/ श्री.भोळे कुटुंबामध्ये आनंदाचे क्षण!
यापुढे ही येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
🟣 श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत. जि.सांगली.
सोमवार,दि.१२जून २०२३.
🟧🟪🟡🟧🟪🔵🟧🟪🟤🟧🟪🔴🟧🟪🟣💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
श्री.उध्दव शिंदे,श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर
🟣🔴🟤🔵🟡🟣🔴🟤🔵🟡🟣🔴🟤🟡
मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक मा.मुजावर जि.प.सातारा यांचे कडून हार्दिक स्वागत करण्यात आले.
उपशिक्षणाधिकारी माध्यमिक मा.खंदारे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🔴 मंगळवार,दि.१३ जून २०२३
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Comments
Post a Comment