सेवानिवृत्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


दि फ्रेंडस् असोसिएशन जत चे खजिनदार 
मा.श्री.डी.व्ही. पोतदार साहेब,मा.श्री.ए.बी. होवाळे, साहेब यांनी सेवानिवृत्ती निमित्त पर्यवेक्षक: श्री.एम.एस.माळी सर, तांत्रिक विभाग प्रमुख:
श्री.एन.ए.सौदत्ती सर यांचा सत्कार केला.
💐🎉💐🎉💐🎉💐🎉💐🎉💐🎉


सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा!
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨
आज  दिनांक 31 मे 2023 रोजी न्यू इंग्लिश स्कूल  माडग्याळ मधील क्लर्क श्री अदाटे एम. आर.सर तसेच जत हायस्कूल जत चे पर्यवेक्षक  श्री एम .एस .माळी सर, तांत्रिक विभागाचे अधिव्याख्याता श्री सौंदत्ती एन. ए.सर, हे  नियत वयोमानानुसार आपल्या प्रदीर्घ  सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत .त्या निमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा! सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे जीवन आरोग्यदायी व समाधानी जावो हि ईश्वरचरणी प्रार्थना.या सर्वांना त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा!🔵🟣🔴🟡🟤🔵🟣🔴🟡🟤🔵🟣🔴🟡🟤🔵🟣🔴🟡🟤🔴
🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨
🟪🟨🟧🟨🟨🟧🟪🟨🟪🟨🟧🟪🟨🟧
🔴🟤🟡🟣🔵🔴🟤🟡🟣🔵🔴🟤🟡🟣🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🔴🟪🟧
💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
निवृत्ती ? छे! जगण्याची नवी आवृत्ती !!

घटका गेली, पळे गेली अखेर आली निवृत्ती आता थोडी चैन करू या, बदला आपली वृत्ती!

लवकर उठणे विसरा आता, खुशाल ताणून द्या 'बेड टी'ची लज्जत न्यारी, एकदा चाखून घ्या चवीचवीने वाचा पेपर वर वर फिरवून दृष्टी मापे काढा ओबामांची, अन् बुशची खरडपट्टी!

टीव्ही पाहत चाखा नाष्टा, रोज नवीन रतीब खिल्ली उडवा भल्याभल्यांची, सैल सोडुनी जीभ ऑफिसची ना घाई आता, रोजरोजची सुटी निवांत आंघोळ, निवांत पूजा, करील मनाची तुष्टी!

सावकाशीने करा भोजन, मारा आडवा हात पुरणपोळी कधी बिर्याणी वा कधी साखरभात तांबूल सेवन नित्य असावे, कधी मसाला पट्टी वामकुक्षीला नका अंतरू, करा तिच्याशी गट्टी!

सायंकाळी निवांत वेळी, आळस झटकुनी टाका पाणीपुरीच्या वा मिसळीच्या, दुर्लक्षू नका त्या हाका चक्कर मारा बाईकवर वा करा मोकळे पाय बागेत रंगवा गप्पाष्टकं वा केवळ हॅलोऽऽऽ हाय!

नंतर येईल रात्र सुखाची, तब्येतीने जेवा भानगडींच्या सीरियल्स पाहून, करा स्वतःचा हेवा सौ. चे कौतुक करता जोड़ा स्तुतिसुमनांची पुस्ती आणि नंतर बघा जमती का थोडी चावट मस्ती !

चित्र असे हे असेल आपुल्या संध्या-संसाराचे
 निवृत्ती मग रंगत जाईल, येता दिवस सुखाचे!
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟧🟨🟪






Comments