महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ सांगलीच्या पदाधिकारांशी मा.श्री.राजशेखर लोंढे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सांगली यांच्याशी विविध विषयांवर चर्चा उत्साहात संपन्न!!!!

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ सांगलीच्या पदाधिकांरी यांनी मा. श्री.राजशेखर लोंढे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली, यांच्याशी चर्चा उत्साहात  संपन्न !!!!
सांगली:(प्रतिनिधी) दि.२३मे २०२३.
महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ सांगलीच्या वतीने मा. श्री. राजशेखर लोंढे साहेब शिक्षणाधिकारी , जि. प. सांगली यांची आज सदिच्छा भेट घेतली . कलाशिक्षक  बंधू ,भगिनींना ए.एम. झाल्यानंतर ए.एम .वेतन श्रेणी संदर्भात चर्चा करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील कला शिक्षकांना ए .एम .स्केल त्वरित मिळावे. त्यासाठी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. राज्य प्रदेश कोषाध्यक्ष श्री. सुहास पाटील यांनी कलाशिक्षकांना येणाऱ्या विविध अडचणींची माहिती सांगितली. सांगली जिल्ह्यातील काही शिक्षकांना ए.एम.स्केच मिळाले आहे .काही मोजक्या  कलाशिक्षकांना ए.एम.  स्केच पासून वंचित आहेत .त्यांना ए.एम .स्केल मिळावे यासाठी जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष शिंदे यांनी मागणी केली .या मागणीला राज्य उपाध्यक्ष श्री. मोहन जाधव यांनी येणाऱ्या अडचणीवर  न्यायालयीन प्रकरणे, जी.आर .दाखवले ही चर्चा चालू असताना माध्यमिक शिक्षणाधिकारी  श्री. लोंढे साहेबांनी ए .एम वेतनश्रेणी कलाशिक्षकांना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे !                 सांगली जिल्ह्यामध्ये ए. एम कलाशिक्षकांना योग्य न्याय मिळेल .असे त्यांनी  सांगितले .                         मा.श्री.राजशेखर लोंढे, शिक्षणाधिकारी, (माध्यमिक विभाग)जि.प.सांगली. यांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून सांगली जिल्ह्यामध्ये विविध विषयावर म्हणजे कला , क्रार्यानभुव , स्काऊट ,गाईड,एस. आर.पी. अशा विषयावर तज्ज्ञ शिक्षकांची बैठक घेऊन , तज्ज्ञ शिक्षक विषय समिती व्दारे सांगली जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या संदर्भात मीटिंग लवकरच लावली जाणार आहे .येत्या शैक्षणिक वर्षापासून सांगली जिल्ह्यामध्ये विशेष कार्यक्रम राबवला जाणार आहे.  त्यासाठी कलाशिक्षक विविध संघटनांनी  व इतर संघटनांनी  प्रयत्न करायचे आहेत .असे आव्हान ! माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री.  लोंढे साहेबांनी  चर्चा करताना आपली भूमिका व्यक्त केली .त्यानंतर महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ सर्व पदाधिकारी यांनी या निर्णयाला सहमती दाखवली .येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामकाज करण्याची गरज  आहे.    या  चर्चेत राज्य प्रदेश श्री .सुहास पाटील ,राज्य उपाध्यक्ष श्री.मोहन जाधव ,सांगली जिल्हा अध्यक्ष श्री. सुभाष शिंदे ,उपाध्यक्ष श्री.सतीश  गाडे, मिरज तालुका अध्यक्ष श्री. हेमंत लोंढे व माननीय श्री मधुकर (आप्पा ) पाटील उपस्थित होते.
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨
🔴🟣🔵🟤🟡🟣🟣🔵🟤🟡🔴🟣🔵🟤
🔴 महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष श्री.सुभाष शिंदे यांचा सत्कार!
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐 महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी श्री.सुभाष शिंदे यांची निवड झाल्याबद्दल राज्य प्रदेश कोषाध्यक्ष श्री.सुहास पाटील, राज्य उपाध्यक्ष श्री.मोहन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष श्री.सतिश गाडे, मिरज तालुका अध्यक्ष श्री.हेमंत मोहिते व मा.श्री. मधुकर (आप्पा) पाटील उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟤🔵🟣🔴🟡🟤🔵🔴🟡🟤🔵🟣🟡🔴

Comments