महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघावर कोल्हापूर 🟨विभागीय सचिव श्री.सागर दिक्षित 🟧 सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून श्री.सुभाष शिंदेंची निवड...
हार्दिक अभिनंदन!
कोल्हापूर विभागीय सचिव
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ
सांगली जिल्हा अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ
🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟧
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघावर कोल्हापुर विभागीय सचिव म्हणून सागर दिक्षीत व सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून सुभाष शिंदेंची निवड.....
प्रतिनिधी,/S.Art News.. Jatt /सांगली - महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ या राज्यव्यापी कलाशिक्षकासाठी व कलाविषया साठी सातत्याने शासन दरबारी खंबीर पणे पाठपुरावे करणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या कोल्हापुर विभागीय सचिव पदी श्री. सागर अरविंद दिक्षीत सर यांची नियुक्ती झाली आहे. श्री. सागर दिक्षीत सर हे श्री. भवानी विद्यालय आटपाडी ता.जि. सांगली येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत असून त्याना एकुण 22 वर्षे डि.सी. एम. शासकीय चित्रकला परीक्षांचा अनुभव आहे. तर महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून श्री. सुभाष सदाशिव शिंदे सर यांची नियुक्ती झाली आहे. श्री. सुभाष शिंदे सर हे जत हायस्कुल अॅण्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट अॅण्ड सायन्स जत ता. जत जि.सांगली येथे कलाशिक्षक म्हणून ३२ वर्षे कार्यरत ,डी.सी.एम . शासकीय चित्रकला परीक्षेचा अनुभव आहे.असुन त्यांनी कलाशिक्षकांसाठी व कलाविषयासाठी भरीव योगदानाचे कार्य केलेले असल्याने व विविध कला विषयाच्या विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा, चित्ररंगभरण स्पर्धा राबवण्याचा त्यांचा हातखंडा आहे. या त्यांच्या कामाने महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष मा. सुहास पाटील सांगली यांनी महासंघाच्या प्रदेश कार्यकारणी पुढे या दोघा कलाशिक्षकांच्या पदाधिकारी म्हणून निवड करण्याची शिफारस केली होती. त्या शिफारशीने या दोघांच्या नियुक्ता महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष मा. प्रल्हाद साळुंके, प्रदेश सरचिटणीस मा. प्रल्हाद शिंदे यांनी लेखी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती घोषीत केली आहे. या नियुक्तीस शुभेच्छा मा. प्रदेश उपाध्यक्ष राजेश निर्बेकर, प्रदेश उपाध्यक्ष मा. रामचंद्र इकारे, प्रदेश उपाध्यक्ष मा. महेंद्र निकुंभ, प्रदेश कोषाध्यक्ष मा. सुहास पाटील, प्रदेश सहचिटणीस मा. मोहन माने, प्रदेश महिला आघाडी प्रमुख मा. निता राऊत (मुंबई), प्रदेश सदस्य मा. विवेक महाजन, नवाब शहा, रमेश तुंगार, विनोद इंगोले प्रदेश सल्लागार मा. सुनिल महाले, कोल्हापुर विभागीय अध्यक्ष मा. धनाजी कराडे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील कलाशिक्षकांच्या विविध शासन दरबारी प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ सांगली जिल्हा कार्यकारणी कटीबध्द आहे असे. नुतन सांगली जिल्हा अध्यक्ष मा. श्री. सुभाष शिंदे यांनी या त्यांच्या नियुक्ती वेळी प्रतिक्रीया दिलेली आहे. सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी जि.प. सांगली यांचे कार्यालयाकडे प्रलंबित ए.एम. वेतन श्रेणी प्रस्ताव फाईल तात्काळ मार्गी लावण्यासाठी देखील प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. विविध चित्रकला स्पर्धा, चित्ररंगभरण स्पर्धा व विविध सामाजिक उपक्रम महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ सांगली जिल्हा कार्यकारणी या पुढे सक्रीयतेने राबवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. प्रत्येक प्राथमिक, माध्यमिक, खाजगी व शासकीय आश्रम शाळांमध्ये एक कलाशिक्षक कायम स्वरुपी पदभरती व्हावी या साठी वेळोवेळी संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात येतील. व न्याय मिळेपर्यंत महासंघाच्या वतीने सांगली जिल्हा कार्यकारणी अग्रेसर राहील असे सांगितले आहे.
🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟧🟧
Comments
Post a Comment