सांगलीतील विज्ञान व राष्ट्रीय सेवा दल संस्कार शिबिर यशस्वीरित्या संपन्न:
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨
२५ते ३० एप्रिल २०२३, साने गुरुजी प्रतिष्ठान व राष्ट्रसेवा दल सांगली यांच्यावतीने विज्ञान व संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले*
या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी वय वर्ष फक्त १०० माधवराव भुजंगराव माने सांगली यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आले. तसेच शिबिराचे उद्घाटन मा.शिवाजीराव दादा पाटील (शांतिनिकेतन लोक विद्यापीठ) व मा.उमाकांत माळी (यु एस के ऍग्रो) व मा. श्री आकाश गालींदे (आरटीओ अधिकारी सांगली) यांच्या उपस्थितीत उत्सवाच्या वातावरणात झाली. यावेळी स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने हे स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी हुतात्मा पत्करले त्यांची आठवण सांगत होते. माने पुढे म्हणाले, स्वातंत्र्यसंग्रामात कसे स्वातंत्र्य खेचून आणले व धुळ्याचा खजिना कसा लुटला जेल फोडो आंदोलनात कसा सहभाग होता हे आपल्या शैलीत सांगत होते त्यांचा आवाज आजही त्याच जोशामध्ये होता जसे इंग्रजांच्या काळात होता. चले जाव चळवळ कशी चालली होती.. त्यांचे मार्गदर्शन ह्या पिढीला खूप प्रेरणादायी ठरणार आहे. त्यानंतर श्री.मारुती शिरतोडे पलूस यांनी एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनची ओळख सांगीतली. नंतर श्री.रमेश हेगाणे यांनी सानेगुरुजी प्रतिष्ठानची माहीती सांगीतली. शेवटी मा.सदाशिव मगदूम यांनी राष्ट्र सेवा दलाची संस्थात्मक ओळख व त्याचे कार्य मुलांना सांगितले सहा दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावणार आहेत या शिबिरात बौद्धिक विज्ञाना बरोबर मैदानी झांज लेझीम बरची एरोबिक्स व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत तसेच मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी असेच उपयुक्त कार्यक्रमाचे नियोजन आहे...
दुसर्या दिवशी, पुर्ण दिवस विज्ञान वस्तूंची ओळख व त्याची उपयुक्तता या विषयावर मा. विनायक माळी सर सेवांकुर साखर शाळेची फिरती प्रयोगशाळा घेऊन शिबिरासाठी भेट दिली व पूर्ण महाराष्ट्रात आपल्या मारुती व्हॅनने ते प्रबोधन करत असतात. रात्र सत्रात मा.आकाश गालिंदे सर, RTO सांगली यांनी मानवी जीवनात वाहतूक व नियम किती महत्त्वाचे आहेत ते समजावून सांगीतले.
तिसर्या दिवशी सकाळ सत्रात.. मा.गजानन यादव सर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंढरपूर) यांनी विज्ञान म्हणजे काय या विषयावर मुलांशी गप्पा मारल्या व चर्चा केली, याच सत्रात सौ.म्हेत्रे मॅडम यांनी फारच छान पद्दतीने विज्ञान विचार सांगीतले, त्यांना सौ.अश्विनी माळी मॅडमनी मदत केली. तसेच दुपार सत्रात सौर ऊर्जा या विषयावर मा.इंजिनियर मोहन पाटील बिसूर यांनी मार्गदर्शन केले त्यांना सौ.नुतन परीट मॅडमनी मदत केली.
रात्र सत्रात मा.डॉ.बी.डी.पलंगे सर यांनी आरोग्या संदर्भात खान पान, व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.
तसेच चौथ्या दिवशी सकाळ सत्रात मा. सौ.स्नेहा चौंदीकर मॅडम (प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाळा) यांनी ड्रोन या विषयावर चर्चा, प्रात्यक्षिक, मार्गदर्शन व माहिती मुलांना सांगितली त्यांना सौ.माधवी कदम मॅडमनी सहकार्य केले. दुपार सत्रात सौ.विजया जाधव मॅडम यांनी लघुउपग्रह व उपग्रह म्हणजे काय... या विषयावर प्रबोधन व विश्लेषण केले, त्यांच्या जोडीला सौ.सुनिता देवके मॅडम यांनी साथ दिली..
पाचव्या दिवशी,
मा. मिलिंद चौधरी सर (जनरल सेक्रेटरी डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन) यांनी रॉकेट क्षेपणास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले शिवाय मुलांच्या कडून विविध प्रात्यक्षिक करुन घेतली व वेगवेगळे वैज्ञानिक खेळ घेतले.
पहाटे पासून मुंबई ते सांगली कार चालवत पोहोचलेले डॉ.सागर देशपांडे सर, सौ गौरी देशपांडे मॅडम व छोटा शास्त्रज्ञ सुमेध देशपांडे प्रवास करुन पोहोचल्यावर लगेचच १२ वर्ष वयाच्या सुमेधने स्पेस स्टेशन म्हणजे काय या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. सुमेधचे विषेश म्हणजे त्यांने पॅरिस येथे अंतरिक्ष, राॅकेट या विषयावर प्रबंध सादर केला आहे व तो नासा ने स्विकारला आहे.
३०/४/ २०२३ या रोजी सकाळी ११ वाजता मा.महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ.अर्चना सुर्यवंशी, मा. मिलिंद चौधरी, डॉ. एपीजे अब्दुलकलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी, डॉ.सागर देशपांडे, मा.गौरी देशपांडे, सुमेध देशपांडे, मा.शेख मॅडम यांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला. सुरवातीला पाच दिवसात मुलांनी काय काय आत्मसात केले त्या लेझीम, झांज, ॲरोबिक्स, पथनाट्य, नृत्य या कला गुणांचे प्रदर्शन केले. पुढे
कार्यक्रमात, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवून उप जिल्हाधिकारी हे पद मिळविल्या बद्दल सौ.अर्चना सुर्यवंशी मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ कला शिक्षक श्री.सुभाष शिंदे सर जत यांचा सन्मान त्यांनी केलेल्या प्रामाणिक कष्टाचे चिज म्हणून महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल करण्यात आला. सेवानिवृत्त झाल्याबद्दल सौ.शेख मॅडम यांचा सन्मान करण्यात आला, सामाजिक कार्यकर्ते श्री.स्वानंद कुलकर्णी हे मिरजेत विविध माध्यमातून करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात बोलतांना अर्चना मॅडम यांनी आपल्या काही आठवणी ताज्याकेल्या व अशी विज्ञान व संस्कार शिबीरे वारंवार व्हावीत अशी आशा व्यक्त केली. मा.मिलिंद चौधरीसरांनी मार्गदर्शनात येत्या काही दिवसात सांगली जिह्यात २०० विज्ञाननिष्ठ मुलांचे जंबो शिबीर आयोजित करावे त्याचा खाण्यापिण्याचा खर्च स्वत करणार अशी ग्वाही दिली. शिबीर प्रशिक्षकांची मनभरून स्तुतीकेली. देशपांडे परिवाराने पुढल्या शिबीरात पाचही दिवस उपस्थितीत राहणार असल्याचा विश्वास दाखविला. प्रशिक्षक व मान्यवरांची मनोगत झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नुतन परीट मॅडम व श्रेया परीट यांनी केले, प्रस्ताविक विजय मगदूम यांनी केले. शिबीरार्थी मधून यश संकपाळ, स्वाती कांबळे यांनी व पालकांच्या तर्फे श्री.रमेश मगदूम सर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन श्री.रमेश हेगाणे सर यांनी केले. शेवटी डॉ.देशपांडे यांच्या हस्ते ध्वजावरोहण करण्यात आले व राष्ट्र गीत होऊन शिबीर संपल्याची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमास जिल्हाभरातून अनेक गुरुजन, विद्यार्थ्यी, पालक उपस्थितीत होते.
शिबिराचे संयोजन- दिनकर आदाटे, सदाशिव मगदूम, रमेश हेगाणे, गजानन यादव, सतिश लव्हटे, विजय मगदूम, आकाश गालींदे, डॉ.बी.डी.पलंगे, शीला मनोरकर, सौ.अनुपमा हेगाणे यांनी केले.
शिबिर शिक्षक- शाहिस्ता मुल्ला शिवकुमार हेगाणे, पार्थ हेगाणे, ओंकार कोळी, वियज तुपे, किरण कांबळेसर यांनी काम पाहीले, तसेच
भोजन विभाग- सतीश शरबंदे, संतोष शेरबंदे, शिवानंद हिप्परगी, सौ.अनुपमा हेगाणे, शीला मनोरकर यांनी सांभाळा.
शासकीय प्रशासकीय कामकाजात मा. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, मा.गीता शेंडगे मॅडम, शिक्षण प्रशासनाधिकारी मनपा., मा.गजानन बुचडे सर, शिक्षण मंडळ मनपा, मा.सौ.माधुरी गुरव मॅडम उपशिक्षणाधिकारी जि.प.सांगली. यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे....
🟤🔴🟣🔵🟡🟤🔴🟣🔵🟡🟤🔴🟣🟡💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
Comments
Post a Comment