शाहीर कलेचा कोहिनूर शाहीर सम्राट बापूराव विभूते!
⭐⭐शाहीर कलेचा! कोहिनूर!
शाहीर सम्राट बापूराव विभूते!💫💫
🟫🔴🟡🟫🟠🟡🟫🟣🔵🟫🟣🟠🟫🟣
🔴🔴 शाहीर कलेचा ! कोहिनूर हिरा !🟠🟠🟧🟧शाहिर सम्राट बापूराव विभूते!!🟦🟦
बुधगाव या सिध्देश्वराच्या पांढरीत अनेक रत्ने जन्माला आली,त्यांनी बुधगाव नागरी चे नाव अमर केले आहे.त्यामध्ये शाहीर कलेमध्ये गाव, तालुका, जिल्हा राज्य,देश नव्हे तर जागतिक पातळीवर त्यांनी शाहिरी पताका फडकत ठेवली! त्या गुरूवर्य शाहीर तिलक, कवी विशारद, शाहीर सम्राट बापूराव विरूपाक्ष विभूते यांना मानाचा मुजरा !
प्रतिकुल परिस्थिती मध्ये शाहीर कला व साथीदारांना प्रशिक्षण देणे.त्यांना जपणे .पोवाडा लेखन,पाळणा गीत,भारूड,वग, विविध गाणी, त्यांचा हातखंडा होता. स्वतः चा संसार चालविता ...ना त्यांनी त्यांच्या साथीदारांचा संसाराली पण मदत केली. हे सारे आमचे आप्पा कसे करायचे हे समजणं कठीण!
रूबाबदार व्यक्तिमत्व!, त्यांना पाहताना आपली नजर मानाने मजुरा झुकली पाहिजेल! असं त्यांचं राहणीमान!
आप्पा यांचा पोवाडा च्या कार्यक्रमाचा आधी त्यांचे नियोजन खूपच सुंदर असायचं. साथीदारांचा गणवेश, लागणारे साहित्य, कलाकार, यांच्या वर त्यांचे बारीक लक्ष्य असे.कार्यक्रमात संपूर्ण वेळेचे नियोजन त्यांच्या कडे असे.
ज्यावेळी पोवाडा कार्यक्रम सुरू झाला की डफावर थाप पडली की आवाजाने वीर रसाने रसिक मंत्रमुग्ध होऊन पोडावा ऐकत बसायचे. त्यावेळी वेळेचे भान नसायचे ! आवाजामध्ये चढ ...उतार... शब्दची जागा....! आणि डफावर थाप शाहिरी कला ! अप्रतिम शैली त्यांची होती.
अनेक शाहिरांनी कलेनी रात्रीच्या रात्री त्यांनी सजविलेल्या ......!
शाहीर सम्राट बापूराव विभूते (आप्पा) तुम्ही या
गावाची शान वाढवली ! तुम्हांला कोटी ...कोटी.. प्रणाम !
🟡 बुधगावाचा सिद्धेश्वर यात्रेचा दुसऱ्या दिवस : ही रात्र शाहीरांची.....!
🙏🌈🙏🔴🙏🔵🙏🌈🙏🌷🌸🌷🌸🌷
ही घोषणा शाहीर सम्राट बापूराव विभूते (आप्पा)
ची लहानपणापासून मी दादांच्या(वडील) बरोबर पोवाडा ऐकण्यास जात असे . पोवाडा सादरीकरण च्या आधी गणवेश परिधान व कार्यक्रम तयारी माध्यमिक शिक्षण घेत असताना मी पाहिले आहे. यात्रा कमिटी जी खोली देईल त्यामध्ये सर्व कलाकार व मध्यभागी आप्पा मध्ये बसलेले असतात आणि सर्वांना माहिती सांगत आपली वेशभूषा करताना एखाद्या ऋषी प्रमाणे बसून गणवेश स्वच्छ नीटनेटके परिधान करायचे आणि सर्व सर्व कलाकारांना आपआपली वाद्ये मध्ये व्यवस्थित आहेस का नाही खात्री करत मध्यभागी बसून ते लक्ष ठेवत असत .कार्यक्रमाची आधी वीस मिनिटं शांतपणे संपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण करायचे आहे. त्याचा आढावा मनामध्ये ठेवत असत . कार्यक्रम हा वेळवर सुरू झाला पाहिजे याकडे त्यांचे लक्ष असायचे. जर नैसर्गिक आपत्ती आली तरी त्यामध्ये सुद्धा त्यांनी कार्यक्रमाचा खंड पडू दिला नाही. त्यांचे नियोजन अतिशय महत्त्वाचं होतं ! एका कार्यक्रमांमध्ये त्यांच्या मनात आलं कुणास ठाऊक! त्यांनी यात्रा कमिटीला कार्यक्रमात सांगून टाकलं की मी असेपर्यंत सिद्धेश्वर यात्रेचा दुसरा दिवस हा आमचा म्हणजे शहीरी कला....! पोवाडाचा असेल ! मी असे पर्यंत खंड पडून देणार नाही. माझ्यानंतर माझे चिरंजीव व माझे असंख्य शिष्य आहेत ते सुद्धा माझ्या नियमाचे पालन करतील! १०० वर्षांपेक्षा अधिक वर्षापर्यंत ही परंपरा सुरू राहील ! असं मला वाटतं ही घोषणा केल्याबरोबर त्या कार्यक्रमासाठी आलेले नागरिक होते. त्यांनी टाळ्यांच्या स्वागत केले! पण आज अशी माणसं कुठे मिळतात शाहिरी कला जपताना त्यांनी तन ,मन, धन अर्पण केलं ! एखाद्या कार्यक्रमाची सुपारी घेताना त्यांनी पैसाचा विचार केला नाही. त्यांनी कार्यक्रम नियोजना मध्ये बदल त्यांनी केला नाही.त्यांचा कार्यक्रम हा शाहिरी कला , त्यामध्ये विविध प्रयोग आप्पा (शाहीर) करीत असे . शाहीर कला, सामाजिक, ऐतिहासिक,
जनजागृती विषय प्रभावी पणे मांडण्यासाठी ते रंगीत तालीम घेत होते . त्यावेळी वेगवेगळे प्रयोग करीत असत. आकाशवाणी ला कार्यक्रम असेल त्यावेळी पण त्यांचं नियोजनबद्ध कार्यक्रम वेळेत कसा होईल याचा ते विचार करून मग जर रेकॉर्ड ला जायचे ! दूरदर्शन असू दे त्याची पण रंगीत तालीम झाल्याशिवाय ते कॅमेरा पुढे राहिले नाहीत. माझी कला ही शाहीरी कलाआहे .याचं मूल्य जपलं पाहिजे .माझे साथीदार हे माझे शाहिरी कलेचे शिलेदार आहेत .त्यांची काळजी घेत होते.
पोवाडा,वग,भारूड, प्रेरणा गीते,पाळणा,व ऐतिहासिक क्रांतीकारक,नेते यांचे पोवाडे विविध प्रकारची गीते यांचं लेखन, सादरीकरणात अभ्यासपूर्ण मांडणारे ह्या महान शाहीर तिलक! तपस्वी ! सम्राट बापूराव विभूते हे...! माझ्या बुधगावाचे असावे हे आमचे परम भाग्य आहे...! या शाहीरांचे बुधगावामध्ये ... शाहीर सम्राट बापूराव विभूते यांचे
कला स्मारक ! व्हावे ही इच्छा माझ्या सिध्देश्वरां देवाकडे मागणी करतो !!!!!
🟧🟦🟧🟦🟧🟦🟧🟦🟧🟦🟧🟦🟧🟦
लेखन:
श्री.सुभाष सदाशिव शिंदे, कलाशिक्षक
जत हायस्कूल,जत.ता.जत जि.सांगली.
🟡🔴🟤🔵🟡🟠🔴🔵🟡🔴🔵🟤🟣🔵
Comments
Post a Comment