सिध्दनाथदेवाची सासनकाठी बुधगावामध्ये एकमेव : गौरवशाली इतिहास!
बुधगाव: गावभागामध्ये शिंदे सुभाष यांच्या घरामध्ये सिध्दनाथ ची सासनकाठी दरवर्षी दसरा व चैत्रामध्ये
मानाने उभारण्यात येते.चला आपण एकमेव असणाऱ्या सासनकाठीचा इतिहास पाहूया!
सुभाष शिंदे यांची पणजी सासरी आली तेंव्हा त्यावेळी माजंर्डे सासनकाठी व देव ,दिवटी आणि नगारा बरोबर घेऊन आली . तेंव्हा पासून बुधगाव मधील शिंदे घराण्यामध्ये श्री सिद्धनाथ देव, सासनकाठी मानाची सुरुवात झाली .कै. बाळा शिंदे ,कै.आनंदा शिंदे ,कै.सदाशिव शिंदे काही यांनी या सासनकाठी चा सन्मान राखला, या सासनकाठीला प्रत्येक वर्षी खरसुंडी सिद्धनाथाच्या सासनकाठी सोहळ्यामध्ये सहभागी होत असत.
दोन मोठे नगारे सासनकाठी पूर्वी बैलगाडीतून देण्यात येई. कालांतराने विविध वाहनाने घेण्यात येते.
बुधगाव मधील सासनकाठीचा इतिहास:
पांढरीच दैवत श्री सिद्धेश्वर पालखी मुख्य प्रवेशद्वारापासून जात असताना ,मारुती मंदिर जवळ आल्यानंतर ढोल वादक धनगर बंधु या सिद्धनाथ च्या शासनकाठीपाशी येऊन ढोल वादन करीत ...असे त्यानंतर पूर्वी या धनगर बंधुना गरम पाणी पाऊलावर घेऊन आत आल्यानंतर त्यांचा योग्य तो सन्मान राखून त्याला आंबील देण्यात येत असे. त्यानंतर परत जाताना सासनकाठीजवळ ढोल वादन होऊन परत श्री सिद्धेश्वर पालखी सोहळ्यामध्ये सामील होत असे .कालांतराने या परंपरेमध्ये आज अखेर खंड पडलेला नाही .फक्त चहापाणी, पान सुपारी देऊन वादक धनगर बंधुना योग्य सन्मान करण्यात येत आहे. या मागील संकल्पना बुधगाव मध्ये शिंदे घराण्यामध्ये खरसुंडी सिद्धनाथाची सासनकाठी एकमेव आहे! श्री सिद्धेश्वर देवाची पालखी सोहळ्यातून जात असताना ते श्री सिद्धनाथ देवाची सासनकाठी रूपाने भेट होते. ते धनगर बांधवांच्या पाऊल रूपाने येतात ...अशी संकल्पना आहे .ही परंपरा अनेक पिढ्यान पिढा सुरू आहे. हे विशेष! वशिष्ठे असे की धनगर बंधु या परंपरांचे पालन करीत आहेत. यामध्ये फक्त एकच संकल्पना आहे की दोन देव श्री.सिध्देश्र्वर देव....श्री सिद्धनाथ देव... एकमेकाला भेटतात ! ही परंपरा श्री शिंदे घराण्यातून अनेक अनो पिढ्यांमध्ये चालत आली आहे बुधगाव मधील एक ही एक परंपरा आहे याची जाणीव व्हावी म्हणून हा लेख मी लिहीत आहे. या सासनकाठी सोहळ्यामध्ये सर्वजण प्रेमाने सहभागी होऊ या....!
सिद्धेश्वरांच्या नावाने चांगभलं...!
सिध्दनाथाच्या नावाने चांगभलं.....!
🔴🟠🔴🟡🔴🟡🟣🔵🟡🟨🟧🟦🟪🟫🟤🔴
Comments
Post a Comment