जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत. जिल्हा -सांगली.💐 सुवर्ण महोत्सवी:माझी शाळा !🟦🟨🟧🟫🟪🟦🟨🟧🟫


शैक्षणिक वर्षाचा कार्यवृत्तांत आपणांसमोर ठेवताना आनंद वाटतो आहे. जून महिन्यात शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाला. या शैक्षणिक वर्षात करावयाच्या कामकाजाची आखणी खातेनिहाय करण्यात आली. शिक्षक-शिक्षकेतर सेवकांच्या सहकार्याने आणि वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीने शैक्षणिक वर्षातील कामकाज संपन्न झा त्याचा आढावा या अहवालातून मांडला गेला आहे. तो पुढील प्रमाणे आहे.

🔴 अभ्यासक्रम नियोजन, मूल्यमापन व परीक्षा विभाग :
या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी ते ८ वी या वर्गांचे पायाभूत व संकलित मूल्यमापन आणि इयत्ता ९ वी व १० वी वर्गांसाठी घटक चाचणी क्र. १ व २, सत्र परीक्षा व सराव परीक्षांचे योग्य नियोजन करण्यात आले.
नियोजनानुसार पायाभूत चाचणी शासकीय वेळापत्रकानुसार घेण्यात आल्या. प्रथम सत्र संकलित मूल्यमापन व द्वितीय सत्र संकलित मूल्यमापनाचे वेळापत्रक निश्चित करून मूल्यमापन काटेकोरपणे घेण्यात आले. अध्यापकांच्या नियोजनानुसार प्रत्येक सत्रात एक÷एक चाचणी घेण्यात आली.
इयत्ता ९ वी चे अंतर्गत मूल्यमापन विषय अध्यापकांमार्फत घेतले तर इयत्ता १० वी साठी पाच सराव परीक्षा सोडवून घेण्यात आल्या. जत तालुका मुख्याध्यापक संघाच्या प्रश्नपत्रिकांचा उपयोग करण्यात आला. दि. १ मे  रोजी निकाल घोषित करण्यात आला.
या विभागाचे कामकाज शिक्षक ,शिक्षिकांनी कौशल्यपूर्वक पार पाडले.                               🟣सांस्कृतिक विभाग : 
प्रत्येक शैक्षणिक वर्षातील विभागांतर्गत विविध कार्यक्रमांचे नियोजन वर्षांरंभी करण्यात आले. या नियोजनानुसार
विभागाचे कामकाज झाले.
🔵जयंती पुण्यतिथींचे कार्यक्रम : अहवाल वर्षात महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या समारंभात विद्यार्थी विद्यार्थिनी व अध्यापकांची मनोगते व्यक्त झाली.
🔴 प्रासंगिक कार्यक्रम : मा. मुख्याध्यापकांच्या सूचनेनुसार काही कार्यक्रम घेण्यात आले. सत्कार समारंभ, निरोप समारंभ, उद्घाटन समारंभ इ. कार्यक्रमांचा समावेश होता. शाळेच्या गुणवत्तेत, लौकिकात वाढ होईल, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असा दृष्टिकोन ठेवून कार्यक्रम घेण्यात आले.
🟣वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ : शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात घेण्यात आला. या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते . विविध उपक्रम, स्पर्धा, खेळ यामध्ये सुयशप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन कौतुक करण्यात आले.
🟧🔴विविध गुणदर्शन कार्यक्रम : प्रशालेमध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आले. इ. ५ वी ते इ. ८ वी मधील कलाकार विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आपली कला सादर केली.
🟧🟧🔴ग. दि. माडगूळकर स्मृति व्याख्यानमाला, शिक्षक दिन, हिंदी दिन, विज्ञान दिन, मराठी भाषा दिन इ. कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या विभागाचे कामकाज शिक्षक, शिक्षिकांनी यांनी पाहिले.       🟤🟤क्रीडा विभाग :🟣🟣
आजवर आपल्या शाळेने तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेच्या व संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे. विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून
विद्यालयामार्फत खेळाडूंना विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. व्यायामाची आवड व खेळण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजेपर्यंत सराव घेतला जातो.
🟪🟪🟧🔵🔵 शैक्षणिक वर्षामध्ये शासकीय स्पर्धेमध्ये प्रशालेने सहभाग घेतला होता. मैदानी स्पर्धा, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, फुटबॉल, कुस्ती, कराटे, बुध्दीबळ, योगासने या विविध शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
🔴🟧🔵विविध शासकीय क्रीडा स्पर्धेतील सुयश खालीलप्रमाणे:
🟤कुस्ती :
🔵मैदानी स्पर्धा :
तालुका स्तरावर , जिल्हा स्तरावरील स्पर्धेत सुयश प्राप्त करतात.
🟡4x100 मी. रिल
(तालुका ,जिल्हा व विभागीय पातळीवर सहभाग असतो.)
 🏋️🤾🏃🧑‍🤝‍🧑🏃                                          🟧🟪भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत मनोरंजन खेळ स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये मुलांसाठी फुगे फोडणे, बादलीत चेंडू टाकणे, तीन पायांची शर्यत इत्यादी खेळ घेण्यात आले, तर मुलींसाठी संगीत खुर्ची, दोरी उडी, लिंबू चमचा हे खेळ घेण्यात आले. या मनोरंजन खेळ स्पर्धेत शाळेतील बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सुयशप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. सर्वच स्पर्धा अत्यंत चुरशीने संपन्न झाल्या.
🙏🔴महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी🙏🟡 समारंभाचे औचित्य लक्षात घेऊन वक्तृत्व स्पर्धा, कथकथन स्पर्धा, गायन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, मराठी व इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपले सुप्त गुण व्यक्त करण्याची संधी मिळाली. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग नोंदविलेला होता.
🟡शालाबाह्य स्पर्धांतही, मुला-मुलींचा सहभाग असावा यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
बाह्य  सांधिक वक्तृत्व स्पर्धा, पेट्रोलियम खात्यांतर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धा यासारख्या प्रसंगानुरूप स्पर्धांमध्ये मुला- मुलींनी सहभाग घेऊन सुयश प्राप्त केलेआहे.
🔴🟡वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात सुयश प्राप्त विद्यार्थी- विद्यार्थिनींचे प्रशस्ती पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
🟤🔵विद्यार्थ्यांमध्ये वर्गभावना वाढीस लागावी व वर्ग स्वच्छ, सुशोभित असावेत यासाठी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त वर्ग सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तीन गट करण्यात आले होत
🟪🟧सहल विभाग :🟤🔵🟣🌞👬👭🚶🏃
प्रत्येक शैक्षणिक वर्षात वनभोजन व मोठी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येते. श्रावण मासात श्री क्षेत्र अंबाबाई मंदिर परिसरात वनभोजन सहल अतिशय आनंदात संपन्न झाली. या वनभोजन सहलीत विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनोरंजन कार्यक्रम सादर करून सहलीची मजा लुटली.
मोठ्या शैक्षणिक सहलीचे आयोजन महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, निसर्गरम्य स्थळे, करण्यात येते. आयोजित सहलीत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ऐतिहासिक, नैसर्गिक, अध्यात्मिक अशी प्रसिध्द स्थळे पाहून केल्याने देशाटनचा आनंद घे
🔴🟡 हरवले - सापडले विभाग :🟡🔴
विद्यार्थ्यांच्या नजरचुकीने विद्यालयात कांही वस्तू हरवल्या जातात व विद्यार्थी हाती लागलेल्या वस्तू प्रामाणिकपणे जमाही करतात. असे वातावरण शाळेत असल्याने 'हरवले-सापडले' या विभागाचीच निर्मिती झाली आहे. प्रामाणिकपणा दाखविणाऱ्याविद्यार्थ्यांचे परिपाठाप्रमाणे अभिनंदन करण्यात येते. या विभागाचे कामकाज शिक्षक,शिक्षिका पाहतात.
🔴🟧 🌲वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन विभाग :🌳🌲🌳🌴🌵🌲🌳🌲🌴🌵🌲🌲🌴🌵🪴🌵
अहवाल वर्षात या विभागाच्या वतीने शालेय परिसरात वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन करण्यासाठी हरित सेनेची निर्मिती करण्यात आली.
विद्यार्थी, विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लागवड केली आहे. यामध्ये गुलमोहोर, बदाम, आवळा, पिंपळ, जांभूळ यांचा समावेश आहे. वर्षभर या वृक्षांचे संगोपन करण्यात आले.
याबरोबरच जागतिक पर्यावरण दिन, वटपौर्णिमा, वनमहोत्सव, नागपंचमी निमित्त वृक्षसंवर्धनाचे महत्व सांगण्यात आले.
या विभागाचे कामकाज शिक्षक, शिक्षिकांनी पाहिले.
🟪🟧 एन.टी.एस. व एन.एम.एम.एस. परीक्षा विभाग : अहवाल वर्षात या परीक्षेस विद्यार्थ्यांनी प्रविष्ठ व्हावे यासाठी वर्षारंभी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. परीक्षेचे महत्व बिंबवण्यात आले. यामुळे विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रविष्ठ होतात. त्यांना शिक्षक, शिक्षिका जादा तास घेऊन मार्गदर्शन करतात 
🟡🔴पालक संघटना:🟦🟫🟧
अहवाल वर्षात माता-पालक संघाची स्थापना करण्यात आली व प्रसंगानुसार या संघाच्या सभांचे आयोजन करण्यात आले. माता-पालक यांनी विद्यार्थिनींच्या अडीअडचणी व प्रगती यावर चर्चा केली. कांही ठरावही संमत करण्यात आले. ठरावानुसार शाळेत कार्यवाही करण्यात आली. यामुळे शालेय वातावरण निकोप राहण्यास मदत झाली. या विभागाचे कामकाज शिक्षक शिक्षिका पाहतात.
🟨🟫🟦🟪ग्रंथालय विभाग :🟡🟤🔵🟣🔵
अहवाल वर्षात या विभागाच्या वतीने सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वी वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस पाठ्यपुस्तके देण्यात आली. वर्गवार विद्यार्थी वाचनालयासाठी अवांतर वाचनाची पुस्तके देण्यात आली. वाचन प्रेरणा दिन प्रसंगी वाचन प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. उच्च माध्यमिक कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनाही पुस्तक पेढीतून क्रमिक पाठ्यपुस्तके
देण्यात आली. वर्षभर पुस्तकांची देवाण घेवाण होत राहिली. या विभागाचे कामकाज ग्रंथपाल श्री. आर. ए. दुगाणी यांनी पाहिले.                   🔴🟡फलक लेखन :🟨🟧🟨🟧🟨🟧🟨🟧
शाळेच्या मध्यवर्ती फलकावर दररोज वार्ता, विशेष नोंदी, चिंतन, सुविचार, सामान्यज्ञान या सदरात लेखन केले जाते. सुंदर हस्ताक्षरांचा संस्कार सहजच विद्यार्थ्यांमध्ये होण्यास मदत झाली.
या विभागाचे कामकाज श्री. एस. एस. शिंदे यांनी पाहिले.
🔴🟣 शासकीय रेखाकला परीक्षा:🟨🟧🟦🟡
एलिमेंटरी ग्रेंड परीक्षा
इंटरमिजीएट ग्रेंड परीक्षा
प्रशालेतील विद्यार्थी , विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होतात.
कलाशिक्षक श्री.सुभाष शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. निकाल ८०% ते १०० %टक्के ची परंपरा
ही आहे.
🟤🟣🟤🟣🟤🟣🟤🟣🟤🟣🟤🟣🟤🟣कला विविध स्पर्धा - सन २०१७-१८
१) बालमित्र चित्रकला स्पर्धा
 विद्यार्थी / विद्यार्थ्यांनी सहभागी होतात या स्पर्धेत तालुका, जिल्हा पारितोषिक प्राप्त झाले
आहेत.

२) राष्ट्रीय चित्रकला / न विद्यार्थी

चित्रकला स्पर्धा


३) नवनीत चित्रकला स्पर्धा

पुरस्कार विजेते विद्यार्थी

प्राथमिक

1) वारे PM 5V A

२) कोळी आर. एम. ५ वी अ

3) चौरे के. एन. 6 व्ही

दुय्यम

1) सौ. कामडे एस. D. 8 V B

२) सौ. ज्योर एस. D.9 V A

३) कु. अनंतपूर एस. एम. ८ वी ब

४) विविध दैनिकांमध्ये दैनिक केसरी, सकाळ, पुढारी यामध्ये बालचित्रकारांची चित्रे प्रसिद्ध झाली आहेत.

५) लायन्स क्लब जत चित्रकला स्पर्धा - २०१७-२०१८ सुयश

प्राथमिक

१. कु. P.S. I.S. किटल 6 वी B2 कु. एस.एस. जे.एस. भोसले 5वी अ

3. कु. एस. D. सोलापूर 5 V A

दुय्यम

मी,

नाही

१. कु. एस. उत्पन्न. Kittd 9 V B

2. कु. एन. एस. लोहार 9 V B 3. कु. डी.के. सुधल 9 वी बी

6) वन्यजीव सप्ताह 2018 निमित्त चित्रकला स्पर्धा -

गट अ : १. कु. कामडे एस. डी. ८ वी ब

2. कु. कोळेकर ए. D.9V B

3. कु. मुल्ला वाय. एम.एस्सी. 8वी बी

गट ब कु. किट्ट पी. I.S. 6 वी बी

2. कु. वेअर P.S. 6 V A

3. कु. सुतार ए. आर. 7 व्ही डी

७) भव्य चित्रकला स्पर्धा दि. २६ जानेवारी २०१८

शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ मधील कलाकृतीचे (३०५

कलाकृती) प्रदर्शन भरविण्यात आले होते...

संकल्पना :

शाळेचे कलाशिक्षक श्री. एस. एस. शिंदे यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. श्री. जी. बी. ऐनापुरेसाहेब, चेअरमन, दि फ्रेंडस् असोसिएशन, जत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मा. डॉ. एम. व्ही.

बोर्गीकर व् हा. चेअरमन सेक्रेटरी मा. डॉ. एस. वाय. तंगडी, संचालक, मा. श्री. जी. एस. बिज्जरगीसाहेब उपस्थित होते. या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी/विद्यार्थिनी, शिक्षकवृंद यांनी घेतला. यशस्वी कलाकृतींना बक्षीसे प्रदान करण्यात आली. स्काउट गाईड विभाग

-
🟨🔵🟣 स्काऊट गाईड विभाग 🟣🔵🟨
 सन २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षाची पथक नोंदणी/प्रवेश शुल्क जिल्हा संस्थेकडे जमा केले.

नियोजनानुसार सर्व उपक्रमांचे नियोजन व कार्यवाही करण्यात आली.
 'माझी शाळा-स्वच्छ शाळा' या राष्ट्रीय पातळीवरील उपक्रमामध्ये
सहभाग.
 खरी कमाई निधी संकलन मध्ये सहभाग घेतला. स्काउट/गाईड
यांनी १३८९/- रुपये जिल्हा संस्थेकडे जमा केला.
खरी कमाई महोत्सव आयोजन करण्यात आले. विविध पदार्थ तयार करून गाईडनी त्यांची विक्री करण्यात आली. यातून विविध गुणां संवर्धन होऊन त्यांना खरी कमाई आनंद घेण्यात आला. मा. मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांनी सहभाग घेतला.
 गाईड कु. सोनम महादेव जाधव (इ. १२ वी सायन्स) गाईड राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबिर दि. १८/१२/२०१७ ते २२/१२/२०१७ या कालावधीत राज्य प्रशिक्षण केंद्र, रामटेक, नागपूर येथे उपस्थित राहून तिने यशस्वीपणे पूर्ण केले.
उच्च माध्यमिक कला शाखा:
१. परीक्षा विभाग:
परीक्षा विभागामार्फत वर्षभरामध्ये विविध परीक्षांचे आयोजन करण्यात आले. संयुक्त घटक चाचणी १/२ व ३/४, प्रथम सत्र परीक्षा, इयत्ता १२ वी पूर्व परीक्षा तसेच जादा दोन सराव परीक्षांचे आयोजन इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले. या विभागाचे काम श्री. कुलकर्णी व्ही. पी. यांनी केले. २. क्रीडा विभाग :
या विभागामार्फत वर्षभरामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कृषी दिनाच्या निमित्ताने वृक्षा रोपण, स्वच्छता अभियान, शालेय शिस्त विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न झाला. या विभागाचे कार्य श्री. गुरव एन. आर. यांनी पाहिले.
३. सहल या विभागामार्फत दोन सहलींचे आयोजन करण्यात आले. छोटी सहल अर्थात वनभोजन श्री. गविसिध्देश्वर मंदिर येथे तर मोठी . यामध्ये सहल जत-सांगली-कोल्हापूर-शिवाजी विद्यापीठ-रंकाळा तलाव- - गगनगिरी - कुणकेश्वर - मालवण सिंधुदुर्ग येथे यशस्वीरित्या जाऊन आली. या विभागाचे कामकाज गगनबावडा श्री. एस. जी. वाघमारे यांनी पाहिले. - विजयदुर्गं
४. सांस्कृतिक विभाग :                                      या विभागामार्फत वर्षभरामध्ये विविध स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये थोर महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यात आल्या. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, सावित्रीबाई फुले जयंती, कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांची जयंती (मराठी भाषा दिन), लोकमान्य टिळक जयंती, मतदार जागृती अभियानांतर्गत विविध स्पर्धा, जत दिवाणी व फौजदारी न्यायालय यांच्या वतीने परिसंवाद जत येथील पोलीस ठाणे यांच्या वतीने निर्भया पथक - विद्यार्थी परिसंवाद, शिक्षक दिन यासारखे अनेक उपक्रम घेण्यात आले. या विभागाचे कामकाज श्री. कुलकर्णी व्ही. पी., श्री. बाबर एस. एस., श्री. माळी ए. सी. व श्री. आलदर डी. ए. यांनी पाहिले.
वरील प्रमाणे वर्षभराचे शालेय कामकाज संपन्न झाले.
🔴🟧🟣 विशेष कामगिरी!🟣🟧🔴
🔵🟡श्री.सुभाष सदाशिव शिंदे 🟣🟡
(सहशिक्षक / कलाशिक्षक / स्काऊट मास्टर) विविध पदावर कार्यरत

🟨 सहाय्यक आयुक्त (ADC)
सांगली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय, सांगली.                        🔵अॅडव्हान्स पार्टी लीडर सांगली भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग
कब, बुलबुल, स्काऊट गाईड जिल्हा मेळावा. स्थळ - श्री गजानन हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, जाडर बोबलाद                              🔴सहकार्यवाह, सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली

🟣 साने गुरुजी कथामाला संघटक                   🟤समालोचक अधिकारी
शासकीय रेखाकला परीक्षा - २०१७ विभागीय मूल्यमापन केंद्र, सांगली

🟪🟨🟪🟨विशेष प्रशिक्षण -🟨🟡🟨🟡🟨
हिमालय वुड बॅज/एच.डब्ल्यू.बी.सी. (एस.)
राय प्रशिक्षण केंद्र, रामबाग भोर येथे दि. २४/११/२०१७ ते ३०/११/२०१७ प्रशिक्षण पूर्ण. एच. डब्ल्यू.बी.सी. (एस.) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

💐💐💐💐विविध पुरस्कार:🟧🔴🟧🔴🟧
१) जिल्हा मेळावा सन २०१७/२०१८ मध्ये अॅडव्हॉस पार्टी म्हणून यशस्वी कामकाज केल्याबद्दल 'गौरवचिन्ह' प्रमाणपत्र देऊन सत्कार.
2) लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार
३) श्री. रामराव विद्यामंदिर हायस्कूल, जत यांच्या वतीने 'कलागौरव' सन २०१७ स्मृतिदिन देऊन सत्कार करण्यात आला
४) लायन्स क्लब, जत भव्य चित्रकला स्पर्धा संयोजन, मूल्यमापन केल्याबद्दल स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
५) जत हायस्कूल, जतचे कलाशिक्षक व बुधगाव गावचे सुपुत्र श्री. एस. एस. शिंदे यांचा श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटी बुधगावच्या वतीने त्यांनी केलेल्या शैक्षणिक-सामाजिक कार्याच्या गौरवार्थ सत्कार करण्यात आला.                                   🟡 श्री.एम. एक.निटवे
       (लिपिक)
१) सांगली जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.
२) नाशिक जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना यांच्या वतीने सन्मानपत्र बहाल.
अशा रितीने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चे शालेय कामकाज
झाले.
🟦🟪🟫🟦🟪🟫🟦🟪🟫🟦🟪🟫🟦🟪
श्री.ए.टी.धायगोंडे, पर्यवेक्षक
श्री.यु.जी.अंगडी, मुख्याध्यापक 
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत. जि.सांगली.
🟤🟣🔵🟡🔴🟤🟣🔵🟡🔴🟤🟣🔵🟡


Comments