कलारत्न! डॉ.श्री. राजेंद्र भगवान ठोके..!
🔴 कलारत्न पुरस्कार-२०२३ प्रदान! 🔴
⭐मा. डॉ.श्री.राजेंद्र भगवान ठोके
चित्रकार,कलाशिक्षक
विटा जिल्हा -सांगली.
🔴🟣🔵🔴🟣🔴🟣🔵🔴🟣🔵🔴🟣
उत्सव 2021-22मी फीनिक्स
रेललक्ष्मी
मा. डॉ.श्री.राजेंद्र भगवान ठोके (सर)
आपुलकीने अभिवादन!
'कलाकार हा जन्मावा लागतो' आणि 'कला जगावी लागते' असे आपल्याकडे पाहिल्यावर वाटते. लहानपणापासून कलाविषयक कार्यक्रमांना उपस्थित राहणे आणि विविध स्पर्धेतला सहभाग, सुयश यामुळे कलेची • पाळेमुळे घट्ट रोवली गेली. चित्रकला, रांगोळी, निसर्गचित्र, पोस्टर प्रदर्शन, अप्रतिम हस्ताक्षर याद्वारे मेहनत, सचोटी व जिद्दीने कलाकौशल्य संवर्धन केले. हस्ताक्षर कसे सुधारावे ? हे पुस्तक प्रकाशित करीत आहात. याचा अनेकांना निश्चीत लाभ होईल. आई-वडिल, गुरु, मार्गदर्शक यांच्याप्रती आपण जपलेला आदरभाव आपण 'मनाचा राजा' असल्याचे द्योतक आहे. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी येथे १० वर्षे व सांगली शिक्षण संस्थेत २२ वर्षे आपण कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहात. या ३२ वर्षात कलेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उच्च स्तरापर्यंत विद्यार्थी पोहोचवण्यासाठी आपण अथक, यशस्वी प्रयत्न केलेत. वडिलांच्या स्मरणार्थ भव्य किल्ला स्पर्धा घेवून गड, किल्ले, इतिहासाची आवड वाढविण्याचे प्रयत्न केलेत. घरचा गणपती सजावट स्पर्धा घेवून समाजप्रबोधन करण्याचा व कलाकार निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न केला.
कलारत्न बक्षीस
'कला माणसाचे जीवन बदलते' याची प्रचिती आपणाकडे पाहून येते. आपल्या घरात आल्यावर कला रसिकांना जे समाधान मिळते ते अभावानेच इतरत्र मिळत असेल. दुष्काळग्रस्त, पुरग्रस्त अशा आपत्तीग्रस्तांना मदत, वृध्दाश्रमात सहाय्य, गरजू होतकरु कलावंतांना सहकार्य, कोरोना काळात गरजूंना यथायोग्य मदत देवून आपण सामाजिक बांधिलकी जपली. एक कलाशिक्षक समाजासाठी काय करु शकतो ? याचे मूर्तीमंत उदाहरण आहात.
ओंकार, मन्मथ, ओम गणेशोत्सव मंडळ, कला अकादमीचे संचालक आणि एक कलासाधक म्हणून आयुष्यभर कला व कलाकारांचा विकास आणि कलारसिकांची सेवा करीत आहात. वडिलांच्या स्मरणार्थ आदर्श कलाशिक्षक पुरस्कार देवून आदर्श कलाशिक्षक घडवण्यासाठी धडपडत आहात. अशा अमोघ कार्यातून 'कलेचा सम्राट म्हणजे राजा ठोके सर' अशी बिरुदावली निर्माण केलीत. भविष्यातील कलाविषयक संकल्प, योजना पूर्ण व्हाव्यात आणि अनेक वर्षे अखंडीत कलासेवा घडत रहावी हीच कला रसिकांकडून शुभकामना.
🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪
🟫🟧🟫🟧🟫🟧🟫🟧🟫🟧🟫🟧🟫🟧💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫🟤🟡🟤🟡🟤🟡🟤🟡🟤🟡🟤🟡🟤🟡
👌 कलेचा राजा! कलारत्न पुरस्कार -२०२३ विजेता:माझा मित्र!
🟧 माझा मित्र मा.डाॅ. श्री.राजेंद्र भगवान ठोके,कलाशिक्षक, चित्रकार यांना कलारत्न पुरस्कार -२०२३प्रदान करण्यात आला.तुम्हांला अनेक अनेक पुरस्कार मिळाले आहेत.कलेची सेवा, अनेक उपक्रम,अक्षर लेखनात विविध प्रयोग करून अनेक विद्यार्थी,विद्यार्थिनी व पालक बंधू, भगिनींना अक्षर लेखनाची आवड निर्माण करणारे माझे मित्र ठोके सर!
वॉटर कलर मध्ये विविध निसर्गा चित्र रेखाटन करणारे
श्री.ठोके सर!
सामाजिक काम, संघटनेचे काम आणि विद्यार्थ्यांचे कलाप्रेमी, सदैव हसतमुख काम करणारे सर म्हणजे ठोके सर!
आपल्या वडिलांचे नावे पुरस्कार देणारे कलाशिक्षक म्हणजे श्री. ठोके सर!
स्वतःच्या घरामध्ये आर्ट कॅलरी उभा करणे व कलाकृती चे प्रदर्शन भरविणे करणारे श्री.ठोके सर!
गणपती उत्सवामध्ये गणपती मंडळाची सजावट करणारे कलाकुसर करणारे माझे मित्र श्री राजेंद्र भगवान ठोके सरजी तुम्हांला हार्दिक ,हार्दिक अभिनंदन !!!!आणि तुम्हाला यापुढेही अनेक मानाची सन्मानाचे पुरस्कार प्राप्त होवो !हीच श्री.गणेश चरणी
प्रार्थना.....!!!!!
🟪🟧🟪🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪🟧🟪
👌 मित्र
. श्री.सुभाष शिंदे ,कलाशिक्षक
जत हायस्कूल,जत.दि.१९एप्रिल २०२३
🟣🔴🟡🟣🔴🟡🟣🔴🟡🟣🔴🟡🔴🟡💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟨
माझा मित्र डॉ.झाला...!
डॉ.राजेद्र भगवान ठोके..!
🟣🟤🟡🔴🟣🟤🟡🔴🟣🟤🟡🌞🟤🟡
🔴 हार्दिक अभिनंदन! 🔴
माझा मित्र तथा सर्वांचे आवडते कलाशिक्षक आदरणीय राजेंद्र ठोके सर यांना इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ने " डि. लीट,," पदवी देऊन त्यांनी आजपर्यंत कला व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचा गौरव केल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक
जत हायस्कूल,जत.ता.जत जि.सांगली.
🟨🟧🟪🟧🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟪
,
Comments
Post a Comment