कै.एस.आर.शिंदे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
💐💐विनम्र अभिवादन! 💐💐
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐 अष्टपैलू ,कर्तव्यदक्ष कला शिक्षक कै.एस आर. शिंदे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त यांना विनम्र अभिवादन!
जत येथील श्री. रामराव विद्यामंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जत ही शाळा जिल्ह्यात नाही, राज्यांमध्ये प्रसिद्ध होती. त्यावेळी आदर्श मुख्याध्यापक के. रा.बा. पाटील सर त्यांचे सर्व सहकारी अष्टपैलू शिक्षक, शिक्षिका कार्यरत होते. त्यामध्येच श्री. एस. आर. शिंदे कलाशिक्षक हे विद्यार्थी, विद्यार्थ्यांना कलेचे शिक्षण देण्याबरोबर कार्यानुभव, स्काऊट- गाईड हे विषय प्रवाहीपणे शिकवत असत. श्री. शिंदे सर स्काऊट- गाईडचे कॅम्प गावामध्ये, जिल्ह्यामध्ये व राज्यस्तरीय स्काऊट- गाईड मेळाव्याला जात असत. शाळेत असताना ते नेहमी विद्यार्थीचा ध्यास घेत असत. एक कर्तव्यदक्ष कलाशिक्षक हा शाळेचा भूषण! असतो. असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. घरी सुद्धा लेखन ,पेंटिंग व कोणती गोष्ट असू दे! ते कधीही नाही हा शब्द त्यांच्याकडे नव्हता. ते शाळेमध्ये असताना सहकारी शिक्षकांना पण मदत करीत असे. घरी गेल्यानंतर सुद्धा शाळेतील कामे पेंटिंग , सजावट साहित्य, वस्तू ते करत असत आणिसर्वांशी प्रेमाने वागत असत आपलं कुटुंब सांभाळून शाळा हे माझं मंदिर आहे .असे समजत असत. त्यांनी श्री. रामराव विद्यामंदिर हायस्कूल जत सेवा केली. अशा या अष्टपैलू कलाशिक्षक कै. एस .आर .शिंदे सर यांना जाऊन आज एक वर्ष झाले. त्यांच्या स्मृती आजही मनात येतात आणि मन भरून येते .के.एस. आर. शिंदे सरांना विनम्र अभिवादन!
🙏🙏🙏🙏
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत.
🔵 स्काऊट -गाईड कॅम्प🔵
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
सरांचा वाढदिवस होता. मी सत्कार करण्याचे साहित्य घेऊन शिंदे सरांच्या घरी गेलो .नमस्कार करून घरी प्रवेश केला आणि सर खुर्चीवर बसलेले होते. कसं काय ! हे शब्द त्यांच्या तोंडून मी ऐकले. नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं सर! तुमचा वाढदिवस आहे, सत्कार करण्यासाठी आलोय. मग सर आत मध्ये गेले गणवेश परिधान केला आणि जितेंद्र सर यांनी सर्व साहित्य ताटामध्ये ठेवून मी शिंदे सरांचा सत्कार करू लागलो .एक कला तपस्वी श्री. शिंदे सर आनंदाने माझा सत्कार स्वीकारत होते. त्यांना पण बरं वाटत होतं !सरांचा सत्कार झाल्यानंतर मी त्यांच्या पायावर साष्टांग नमस्कार केला. त्यांनी माझ्या पाठीवर प्रेमाने हात फिरवून आशीर्वाद दिला .मला पण एक कलाशिक्षक दुसऱ्या कला शिक्षकांच्या भावना न बोलता व्यक्त करतो ! ही भावना मला झाली . चहापान करून मी घरी पटकन निघालो पण माझी टोपी त्यांच्याच घरी राहिली होती. त्यांनी शिंदे सरांची टोपी आपल्या घरी विसरली आहे. त्यांना द्या, असं त्यांनी त्यांचा चिरंजीव जितेंद्र सांगितलं. हे एक उदाहरण आहे. ते शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक गोष्टीची काळजी करत असत. सर !आज खूप आठवण येते. माझा हा सत्कार शेवटचा सत्कार असेल त्यावेळी वाटलं नव्हतं .सर शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी करीत लक्ष असे !असे त्यांचे जीवन होतो!!! कै. एस. आर. शिंदे सर यांच्या प्रथम स्मृतिदिनी ही आठवण माझ्या मनात आली..... सर तुमच्या स्मृतींना कोटी ...कोटी प्रमाण 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनम्र!💐💐 अभिवादन!🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
🔘 श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक
जत हायस्कूल,जत.ता.जत.जि.सांगली.
Comments
Post a Comment