सन-२०२२-२०२३कब, बुलबुल, स्काऊट, गाईड जिल्हा मेळावा
💠💠💠💠💠💠💠💠💠💠फक्त जिल्हा परिषद शाळांसाठी
जि. प. शेष फंडातून होणारा कब, बुलबुल, स्काऊट, गाईड जिल्हा मेळावा 26,27आणि 28मार्च 2023रोजी होणार आहे. सहभागी होणाऱ्या जि. प. शाळांनी तयारीत रहावे.
मेळावा स्थळ : क्लेरमोंट इंटरनॅशनल स्कूल आष्टा दुधगाव रोड आष्टा तालुका -वाळवा जिल्हा -सांगली.
🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴
प्रति,
मुख्याध्यापक
जन हायस्कुल जत
ता.
जिल्हा. सांगली
विषय :- कब, बुलबुल, स्काऊट गाईड जिल्हा मेळावा परीक्षक / अॅडव्हान्स पार्टी सदस्य म्हणून उपस्थित राहणे बाबत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग सांगली व सांगली भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कब, बुलबुल, स्काऊट गाईड मेळाव्याचे आयोजन दिनांक २६ ते २८ मार्च २०२३ या कालावधीत क्लेरमॉट इंटरनॅशनल स्कूल आष्टा ता. वाळवा जि. सांगली येथे करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या पुर्वतयारीकरीता / अॅडव्हान्स पार्टी सदस्य म्हणून आपल्या शाळेतील स्काऊट मास्तर श्री सुभाष सदाशिव शिंदे याची निवड करण्यात आली. आहे.
सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी मेळावा संयोजकांनी दिलेले कार्य पार पाडावयाचे आहे. केलेल्या कार्याचा अहवाल या कार्यालयास सादर करावयाचा आहे. संबधितांना दिनांक २५/०३/२०२३ ते २८/०३/२०२३ अखेर जिल्हा मेळावा स्थळी उपस्थित राहण्यासाठी कार्यमुक्त करावे. सदरचा
कार्यकाल हा त्यांचा सेवाकाल धरण्यात यावा. सोबत आणावयाचे साहित्य परिपूर्ण गणवेश, वैयक्तिक स्वच्छतासाहित्य, अंथरूण पांघरूण, औषधे, ताट, वाटी, ग्लास, चमचा, लेखन, साहित्य, व स्काऊट गाईड शिक्षणावरील पुस्तके इ.
(मोहन गायकवाड)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद सांगली
आणि सांगली भारत स्काऊट, गाईड कार्यालय, सांगली.
जिल्हा मुख्य आयुक्त
प्रत नाहितीस्तव व कार्यवाहीसाठी १. गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती सत...
२. गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती वाळवा तथा मेळावा प्रमुख ३. श्री.थ सुभाष सदाशिव शिंदे
टिप - जिल्हा मेळावा प्रमुखांच्या परवानगी शिवाय मेळावा कार्यक्षेत्र सोडून जाऊ नये अन्यथा
शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
अंत्यत महत्वाचे
४२०७
प्रति,
प्रशिवी / विश्वास 94 / वाशी/जे. क्र. / 2023 प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा. पं. सांगली दि.93/03/2
सर्व गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती जिल्हा सांगली
विषय:- सन २०२२-२३ कब, बुलबुल, स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात सहभागी होणेबाबत.
प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली व सांगली भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कब बुलबुल, स्काऊट गाईड मेळाव्याचे आयोजन दिनांक २६ ते २८ मार्च २०२३ या कालावधीत क्लेरमोंट इंटरनॅशनल स्कूल आष्टा ता. वाळवा जि. सांगली येथे करण्यात आले आहे. याबाबत आपण आपल्या तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळांना तात्काळ कळवावे. त्याचबरोबर आपल्या विकासगटातून आपण जिल्हा मेळाव्यासाठी प्राथमिक शाळा मधील ३ कब, ३ बुलबुल, ३ स्काऊट, ३ गाईड पथकाना हे परिपत्रक देऊन कब, बुलबुल, स्काऊट गाईड परिपुर्ण गणेशा सह तयारीनिशी पाठविणे अनिवार्य आहे.
(प्रत्येक पथकात जास्तीत जास्त ०८ विद्यार्थी व ०२ शिक्षक असे एकूण १० सदस्य सहभागी होऊ शकतील.)
कब पथक
बुलबल पथक
०३
स्काऊट
पथक
प्रत्येक तालुकास्तरावरून
गाईड
पथक
एकूण पथक
एकूण मुले
एकूण शिक्षक
०३
०३
०३
१२
९६
२४
एकूण संख्या
१२०
जिल्हा मेळाव्या मध्ये सहभागी पथकांची निवड करून शाळेची व पथकांची नावे दिनांक २५ मार्च २०२३ अखेर सांगली भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालयाकडे कळवावीत. जिल्हा मेळाव्यात सहभाग नोंदणी केल्याचा अहवाल मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग जि. प. सांगली यांचेकडे सादर करावा.
टीप-
(मोहन गायकवाड)
शिक्षणाधिकारी(प्राथमिक) जिल्हा परिषद सांगली
१. आपल्या तालुक्यातील कब, बुलबुल, स्काऊट गाईड पथक परिपुर्ण गणवेशात उपस्थित राहणे अनिवार्य आहे. २. जिल्हा मेळाव्यात सहभागी होणारे विद्यार्थ्यांची सर्वस्वी जबाबदारी कब मास्तर, फ्लॉक लिडर, स्काऊट मास्तर, गाईड कॅप्टन यांची असेल बुलबुल व गाईडच्या (मुलींच्या) पथका सोबत स्त्री शिक्षिका असणे अनिवार्य राहील.
३. मेळाव्याचे नियम व शिस्त सर्वांना लागू राहील.
४. सन २०२२-२३ या वर्षात कब, बुलबुल, स्काऊट गाईड पथकांची नोंदणी सांगली भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय सांगली यांचेकडे झालेली असणे आवश्यक आहे.
सोबत जिल्हा मेळाव्या बाबत परिपूर्ण माहिती परिपत्रक .
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
सन २०२२-२३ कब, बुलबुल, स्काऊट गाईड जिल्हा मेळावा माहिती. स्थळ :-जिल्हा क्लेरमोंट इंटरनॅशनल स्कूल आष्टा ता. वाळवा जि.सांगली
कालावधी:- २६ ते २८ मार्च २०२३
> आगमन :-
तालुकास्तरावरून निवड झालेल्या कब, बुलबुल, स्काऊट गाईड पथकाचे दुपारी १२.३० वाजे पर्यंत आगमन होईल. आपल्या पथकाची जिल्हा मेळाव्या स्थळी नोंदणी करून आपल्या तंबुच्या जागेची माहिती घ्यावी. तसेच जिल्हा मेळाव्यात मिळालेले उपस्थिती पट दिनांक २७ मार्च २०२३ या दिवशी रात्री ठिक ९.०० पर्यंत जिल्हा मेळावा प्रमुखाकडे सादर करावा. अन्यथा जिल्हा मेळावा सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. यांची नोंद घ्यावी.
> सोबत आणावयाचे साहित्य :-
तंबू व तंबूसाठी लागणारे सर्व साहित्य, तंबू उभारण्यासाठी आवश्कया हत्यारे, प्रत्येक कब, बुलबुल, स्काऊट, गाईड (मुले व मुली ) व युनिट लिडर (शिक्षक/शिक्षिका) यांनी ताट, वाटी, ग्लास, चमचा, प्लेट, २ बादली. १ खराटा, तंबूत अंथरणेसाठी जमखाना / सतरंजी / ताडपत्री व प्रत्यकाचे स्वतः साठी अंथरूण, पांघरूण, बॅटरी, स्वेटर, लागणारी आवश्यक ती औषधे, स्पर्धेसाठी लागणारे गाठीची दोरी, काथ्या, सुतळी, चाकू, सुरी, स्काऊट आणि गाईडचे अभ्यासक्रमावर आधारीत तक्ते तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आवश्यक ती वेशभूषा सीडी कॅसेट गीता सह सोबत आणावे.
> गणेश :-
प्रत्येक पथकाच्या नोंदणी प्रकारानुसार (कब, बुलबुल, स्काऊट गाईड) गणवेश तसेच पथक प्रमुख शिक्षक व सहाय्यक शिक्षक गणवेशात असणे अनिवार्य आहे. त्या शिवाय मेळाव्यात प्रवेश दिला जाणार नाही.
> जेवणाची व्यवस्था :-
पहिल्या दिवशी दुपारचा भोजनाचा डब्बा प्रत्येकाने सोबत आणावा. तसेच जिल्हा मेळाव्या तर्फे दुसऱ्या दिवसाचा सकाळी चहा, नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा, रात्री जेवण, देण्यात येईल. तसेच समारोपाच्या दिवशी सकाळी चहा, नाष्टा, व दुपारीचे जेवन, देण्यात येईल. पिण्याच्या पाण्यासाठी पथकाने २० लिटरची बाटली सोबत आणावी.
> राहण्याची सोय :-
प्रत्येक पथकाने स्व:चा तंबू सोबत अणावयाचा आहे व निवास व्यवस्था तंबूतच करावयाची आहे. त्यासाठी आवश्यक साहित्य सोबत घेवून यावे.
> मेळावा सहभागी पथक संख्या :-
प्रत्येक तालुक्यातून तालुका स्तरावर निवड झालेले (एका पथकात ८ मुले मुली व २ युनिट लिडर असे ८ + २ एकूण १० ) या प्रमाणे ३ कब, ३ बुलबुल, ३ स्काऊट, ३ गाईड अशी एकूण १२ पथके सहभागी होतील. म्हणजे ९६ विद्यार्थी व २४ शिक्षक / शिक्षिका असे एकूण १२० जण सहभागी होतील. अतिरिक्त शिक्षक व विद्यार्थी जिल्हा मेळाव्याला आले असता शिक्षकांना व विद्यार्थ्याना स्काऊट आणि गाईडसचे स्कार्फ व ओगल परिधान करणे अनिवार्य आहे. अन्यथा जिल्हा मेळाव्यात सहभाग घेता येणार नाही याची नोंद घ्यावी.
> मेळावा समारोप :-
कब, बुलबुल, स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचा समारोप दिनांक २८/ ०३ / २०२३ रोजी होईल.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
जिल्हा मेळाव्यातील विविध स्पर्धा
१. तंबू तपासणी :-
१. तंबू निरीक्षणावेळी कब, बुलबुल, स्काऊट गाईड अभ्यासक्रमानुसार आवश्यक ती स्वागताची पध्दती उदा :- बुलबुल फ्लॉक असल्यास बडी सलामी, पटक गीत बुलबुल रिंग याबाबी पाहिल्या जातील तंबू व परिसर स्वच्छता, शिस्त, दोरीच्या गाठीचे प्रकार व उपयोग, प्रथमोपचार, गॅझेटस् व त्यांचा उपयोग (गॅझेट केवळ स्काऊट आणि गाईड करीता ) यांचे निरीक्षण केले जाईल. या नुसार कब पंक, बुलबुल फ्लॉक, स्काऊट टुप, गाईड कंपनी यांनी अपेक्षित अभ्यासक्रमानुसार तयारी करावी यासाठी कबचा दिपस्तंभ, बुलबुल भरारी, स्काऊट गाईड अभ्यासक्रमाची पुस्तके सांगली भारत स्काऊटस आणि गाईडस जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत.
२. पथकातील सर्व कब बुलबुल, स्काऊट गाईड सदस्य व युनिट लिडर यांनी धारण केलेल्या गणवेशात काटेकोर परीक्षण केले जाईल. तंबू परीक्षणाच्या कालावधीत परीक्षकांनी विचारणा केलेल्या प्रश्नांना कब, बुलबुल, स्काऊट आणि गाईड यांनीच उत्तर देणे अभिप्रेत आहे.
३. तंबू निरीक्षणावेळी पथक परीक्षण केले जाईल यात पथकातील सदस्यांचे गणवेश, स्वच्छता, सजावट, गॅझेटस्. इत्यादीचे परीक्षण केले जाईल. तंबू परीक्षणासाठी आवश्यक साहित्य पथकाने सोबत आणावे. २. शेकोटी कार्यक्रम :-
१. कार्यक्रमात लोकगीत, लोकनृत्य, बोधपरनाटीका सादर करता येतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत सिनेमातील गीत सादर करता येणार नाही. सादरी करणाची वेळ मर्यादा जास्तीत जास्त ५ मिनीट राहील. पथकातील सर्व सदस्यांना यात सहभागी होणे अनिवार्य आहे.
२. सादर होणाऱ्या कार्यक्रमात असभ्य भाषा, हालचाली / कृती, शिक्षक वर्गाची नक्कल, व्यसनाधिन
व्यक्तीची नक्कल, अपंगत्व शारीरिक न्यूनत्वावर नकारात्माक भाष्य / टिपणी केलेली आढळल्यास कार्यक्रम
स्पर्धेतून बाहेर केला जाईल. याची कृपया नोंद घ्यावी. ३. सांस्कृतीक कार्यक्रमात वैयक्तिक गीत, नृत्य, एक पात्री प्रयोग कोणत्याही परीस्थितीत सादर करता येणार नाहीत.
3. शोभा यात्रा :-
भारतीय / प्रादेशिक पांरपारीक सण उत्सव / लोककला/ ज्वलंत समस्या व त्या वरील उपायावर बोधपर संदेश देणारा विषय शोभा यात्रेत सादर करता येईल. शेकोटी कार्यक्रम व शोभा यात्रेसाठी आवश्यक ती सर्व वेशभुषा व रंगभूषा साहित्य पथकाने आपल्या सोबत आणावयाचे आहे.
4. हालचाल :-
संचलनामध्ये पथकाप्रमाणे सहभाग घ्यावा परीपुर्ण गणवेश आवश्यक आहे. परीपुर्ण गणवेश नसेल तर स्पर्धे मध्ये सहभाग घेता येणार नाही.
५. बिन भांडयाचा स्वंयपाक :- (फक्त स्काऊट व गाईड साठी इ ५ वीते ८ वी ) कोणत्याही प्रकारची भांडी उपकरणे न वापरता खादय पदार्थ बनविणे आवश्यक आहे. ठराविक वेळेतच खादय पदार्थ तयार करणे आवश्यक आहे. परीक्षक स्वत: खादय पदार्थाचे परीक्षण करतील.
मोहन गायकवाड
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परीषद सांगली
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
॥ ॐ तेजस्वी नवाधितमस्तु ॥ द फ्रेंड्स असोसिएशन जत्चे, (अल्पसंख्याक समाज)
जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत.
(तांत्रिक शिक्षण विभागासह) स्थापना वर्ष १९६७
तालुका : जत. जिल्हा : सांगली. जटाळ 416404
शाळेची कायमस्वरूपी ओळख क्र. मध्यक 7/86-87/926 G.S. सांगली कनिष्ठ महाविद्यालय मान्यता क्र. उमा-1/ तू. मा/ 199/10987-8
वेतन पथक जे २०७
शाळा कोड क्र. 22.02.006
दूरध्वनी: (०२३४४) २४६२२७
दि.२५/३/१९९६
दि.23/9/1986 A. महाविद्यालय जे- 22.02.010
U-DISE कोड-27350210712
ईमेल-jhjath@yahoo.com
जावक क्र. -195/2023-24.
दिनांक 24.03.2025
प्रति,
मा. शिक्षणाधिकारी,
(खाजगी विभाग)
जिल्हा. पं. सांगली
आणि
जिल्हा मुख्य आयुक्त
सांगली B.Sc.G. जिल्हा. कार्ये. सांगितले.
विषय :- कब, बुलबुल, स्काऊट गाईड जिल्हा मेळावासाठी कार्यमुक्तबाबत. महोदय.
वरील विषयानुसार आमच्या प्रशालेतील स्काऊट मास्टर श्री. सुभाष सदाशिव शिंदे यांची कब बुलबुल, स्काऊट गाईड जिल्हा मेळावासाठी अॅडव्हान्स पार्टी सदस्य म्हणून निवड झाले आहे सदर दि.२४.०३.२०२३ रोजी कार्यायीलन वेळेनंतर कार्यमुक्त केले आहे.
कळावे
आपला विश्वासू
मुख्याध्यापक, जत हायस्कूल आणि ज्यु. Collen off Autha & Saanee, Jath Jaith, Dist. सेन 2.
Comments
Post a Comment