युवा शाहीर श्री.प्रसाद आदिनाथ विभूते, बुधगाव : झी युवा संगीत पुरस्काराने - (२०२३ )सन्मानित ....!🔵💠🔵💠🔵💠🔵💠🔵💠
🔴शाहीर प्रसाद आदिनाथ विभुते हे झी युवा संगीत सन्मान पुरस्काराचे मानकरी यावर्षीचा झी युवा संगीत सन्मान पुरस्कार -२०२३ युवाशाहीर प्रसाद आदिनाथ विभुते यांना मंगळवार दिनांक -१४ जानेवारी२०२३ रोजी प्रदान करण्यात आला.सांगलीच्या बुधगावचे शाहीर प्रसाद आदिनाथ विभुते हे विभूते घराण्याच्या पाचव्या पिढीचे कलाकार आहेत आणि त्यांचा आजोबांनी रोवलेला शाहिरीचा झेंडा हा अखंड फडकवण्याचे काम कायम ठेवले आहे. शाहीर प्रसाद यांनी संगीत क्षेत्रात, एम ए केले असून शाहीरी क्षेत्रात स्वतः ला झोकून देत पोवाड्याची पारंपरिकता अखंड ठेवली आहे तसेच करडोल या वाद्याचे बोल डफात उतरवून डफाची नवीन शैली निर्माण करणारे त्यांचे आजोबा शाहीर बापुराव विभूते यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आणि वडिल शाहीर आदिनाथ विभुते यांचे अनुकरण करत लहानपापासूनच त्यांना शाहिरीची गोडी लागली होती संपूर्ण महाराष्ट्र, भारतभरच नव्हे तर परदेशातहीप्रसादचे शाहिरीचे कार्यक्रम होतात...त्याचबरोबर त्यांना त्यांच्या या क्षेत्रातल्ययोगदानाबद्दल त्यांना 💠युवा शाहिर महाराष्ट्राचा" पुरस्कार, कळंबोली मुंबई, २०१४ 💠शाहीर साबळे "युवा शाहीर रत्न" पुरस्कार, मुंबई, २०१५ 💠"युवा शाहीर" पुरस्कार शांतीनिकेतन सांगली, २०१७ 💠भीमशक्ती "युवा शाहीर" 💠पुरस्कार, मनमाड नाशिक, २०१८
🔴"युवाशाहीर रत्न", पुरस्कार मॉरीशस२०१९ 💠"सी.सी.आर.टी" नॅशनल पुरस्कार,🔵 भारत सरकार, २०१९💐💠💠💐💐💐💐💠💠🏅 अश्या अनेक पुस्कारांनी गौरविले आहे याची नोंद घेत या अस्सल शाहिरीचा बाज असलेल्या अस्सल शाहिराला झी युवा संगित सन्मान पुरस्कार शाहीर नंदेश उमप यांच्या हस्ते मिळाला. त्यामूळे विभूते घराण्याच्या सन्मानात मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रसादसोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना झी युवा तेजस्वी चेहरा म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच अश्या 12 विविध क्षेत्रातील दिग्गजांना पुरस्कार बहाल करण्यात आला. तसेच हा पुरस्कार यापूर्वी गायिका आर्या आंबेकर, प्रियांका बर्वे, सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, मिळाला होता. या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज सिनेकलाकार उपस्थित होते.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠


💐 हार्दिक अभिनंदन! 💐 शाहीर श्री. प्रसाद आदिनाथ
विभूते, बुधगाव यांना झी युवा संगीत पुरस्कार -२०२३पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्याबद्दल
युवा शाहीर श्री. प्रसाद आदिनाथ विभूते,बुधगाव
यांचे हार्दिक अभिनंदन!
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
हा कार्यक्रम बुधवार,दि.२२मार्च २०२३रोजी झी युवा वरती सायंकाळी -७ .०० वाजता प्रसारित करण्यात येत आहे. पोवाडा हा प्रसादला त्यांच्या आजोबा कै.शाहीर सम्राट बापूराव विभूते व कै. शाहीर आदिनाथ बापूराव विभूते यांच्यापासून शाहीरी कला, पोवाडाचे ज्ञान बालपणापासून सहजपणे मिळत गेले.डफावर थाप ....! आणि शाहीर केलेची पताका सदैव शाहीर प्रसाद विभूते, बुधगाव हा फडकविताना कै.आजोबा, वडील यांच्या स्मृती मनी आल्याशिवाय राहणार नाही. 💠💠झी युवा पुरस्कार -२०२३ हा पुरस्कार मिळविणारा शाहीर श्री. प्रसाद आदिनाथ विभूते, बुधगाव यांना पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम झी युवा चॅनेल वरती कार्यक्रम दाखवला जाणार
आहे. हा कार्यक्रम सर्वांनी बघण्यास विसरू नका.या शाहीरांस प्रेमाची, अभिनंदनाची
साथ देवू या! शाहीर श्री.प्रसाद आदिनाथ विभूते (बुधगाव)यांचे
हार्दिक अभिनंदन!💐💐💐💐
💠शुभेच्छुक:
श्री.सुभाष सदाशिव शिंदे(बुधगाव) अध्यक्ष, साने गुरुजी कथामाला व कला केंद्र जत.ता.जत जि.सांगली
🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵
Comments
Post a Comment