एक मिशन जुनी पेन्शन!या मागणीसाठी सांगली मध्ये विराट मोर्चा...!
💠🔵💠🔵💠🔵💠🔵💠🔵सांगली माध्यमिक शिक्षक संघाचे ( फेडरेशन ) अध्यक्ष हाजीसाहेब मुजावर.सचिव बळीराम कसबे.उपाध्यक्ष अरविंद मेनगुदले. एन. डी. कांबळे.सहसचिव पाटील मॅडम. प्रसिद्ध प्रमुख सुभाष शिंदे सर.व चंद्रकांत ऐवळे. भारत गवंडी.अमिन शेख. बाळासाहेब बारगीर सर. जगताप सर. शिवाजी देसाई.सुदाम वाघमारे.लालासाहेब वाघमारे. इत्यादी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक सांगली च्या
विराट महामोर्चात सहभागी झालो
होतो.
शिक्षक संघ (फेडरेशन) १४ पासूनच्या संपात सहभागी होणार!
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) यांच्या संयुक्त आदेशाने सांगलीतील कर्मचारी १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संपात सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष हाजीसाहेब मुजावर यांनी दिली.मुजावर म्हणाले, संपूर्ण देशात विविध राज्यांमध्ये सरकारी व निम सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. जुनी पेन्शन हा मुद्दाम २००५ पासून चर्चेत आहे. महाराष्ट्रात कोणत्याही सरकारने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही आर्थिक सबब सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे पण देशातील राजस्थान, छत्तीसगड, पंजाब झारखंड, हिमाचल प्रदेश या राज्याने तेथील कर्मचाऱ्यांना जुनी " पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली आहे, परंतु महाराष्ट्र सरकार मात्र जाणीवपूर्वक जुन्या पेन्शन योजनेकडे दुर्लक्ष करीत आहे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संघटनेतील १७ लाख कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत संपातील प्रमुख मागण्याकरिता सांगली माध्यमिक संघ (फेडरेशन) १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत, असेही मुजावर म्हणाले.
🔴 जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी......
राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह कोट्यवधी मध्यमवर्गीयांच्या सेवानिवृत्तीनंतरची जुनी पेंशन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यासाठी १४ मार्च रोजी संपाची तयारी केली आहे. वेतन व निवृत्तीवेतनासंबंधी एकूण होणाऱ्या खर्चाविषयी समाजाची दिशाभूल करण्यासाठी शासकीय निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांचीच एखादी समिती नेमून आंदोलनकर्त्यांची बोळवण करण्याच्या राज्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीविषयी राज्यातील सर्व
कर्मचारी व शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. जुनी पेंशन योजना लागू करण्यास शासनाच्या आर्थिक धोरणातील अपयशाचे खापर कर्मचारी व शिक्षकांच्या वेतन व निवृत्ती वेतन यावर फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याने शिक्षक वर्गात नाराजी आहे. त्यामुळे जुन्या पेन्शनच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी केले आहे. या मागण्या शासनापर्यंत पोचवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
सांगली माध्यमिक शिक्षक संघाचे ( फेडरेशन ) अध्यक्ष हाजीसाहेब मुजावर
🙏🙏✍️✍️👍👍👍👍👍
नमस्ते बंधू-भगिनींनो आज बेमुदत संपाचा चौथा दिवस, आपण नेहमीसारखे सकाळी साडे दहा वाजता पंचायत समिती जत च्या दत्त मंदिरासमोर उपस्थित रहावयाचे आहे आणि जो पर्यंत नवीन पेन्शन योजना ( NPS ).रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना ( 0PS ) पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचे ठोस आश्वासन सरकार देत नाही तो पर्यंत बेमुदत संपाचा लढा चालूच ठेवायचा आहे. आणि येताना आपल्या शाळेतील,आपल्या कार्यालया मधील कर्मचारी बंधू- भगिनींना पण सोबत घेऊन यायचे आहे. बेमुदत संपातील इतरही काही मागण्यांचा उल्लेख आपल्या माहिती करता देत आहे २.कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घकाळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित करा. ३. सर्व रिक्त पदे तात्काळ भरा (आरोग्य विभागास अग्रक्रम द्या ) तसेच चतुर्थश्रेणी व वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस केलेला मज्जाव तात्काळ हटवा. ४. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या बिनशर्त करा. तसेच कोरणा काळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वयाधिक झालेल्या पाल्यांना विहित वय मर्यादित सूट द्या. ५. सर्व अनुषंगिक भत्ते केंद्रा समान मंजूर करा. ( वाहतूक, शैक्षणिक व इतर भत्ते ) ६.चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित करू नका. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने मांडलेल्या इतर सर्व प्रलंबित मागण्या सत्वर मंजूर करा. ७. शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न ( सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दहा:वीस:तीस वर्षे व इतर ) तात्काळ सोडवा. ८.निवृत्तीचे वय 60 वर्षे करा. ९. नवीन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सेवा विषयक समस्यांचे तात्काळ निराकरण करा. १०.नर्सेस् आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सेवा विषयक समस्यांचे तात्काळ निराकरण करा. ११. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे सध्या रोखलेले पदोन्नती सत्र तात्काळ सुरू करण्यात यावे. १२.उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाडी देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्वत सुरू करण्यात यावी. यासंदर्भात मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करण्यात यावे. १३. वय वर्ष 80 ते 100 या वयातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाने विहित केल्याप्रमाणे मासिक पेन्शन वाढ करण्यात यावी. १४.कामगार- कर्मचारी-शिक्षकांच्या हक्कांचा संकोच करणारे कामगार कायद्यातील मालक धार्जिने बदल रद्द करा. 15.आदिवासी नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजने व्यतिरिक्त एकस्तर वेतन वाढीचा लाभ कायम ठेवण्यात यावा व संबंधित कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात यावा. 16. शिक्षणसेवक, ग्रामसेवक आदिना मिळणाऱ्या मानधनात, वाढलेल्या महागाईचा विचार करून वृद्धी करण्यात यावी. 17. शासकीय विभागात कोणत्याही स्वरूपाच्या खाजगीकरण /कंत्राटी करण्यास सक्त मज्जाव करण्यात यावा. १८.पाचव्या वेतन आयोगापासूनच्या वेतन त्रुटींचे निराकरण करण्यास बक्षी समितीलाअपयश आले आहे. त्यामुळे याबाबत सखोल पुनर्विचार करून सर्व संबंधित प्रवर्ग कर्मचारी-शिक्षकांना न्याय देण्यात यावा.
@@@@नम्र आवाहन@@@@
जूनी पेन्शन योजना लागु करा या मागणी करीता राज्य शासकिय निमशासकिय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितिच्या वतीने दिनांक १४ मार्चपासुन पुकारलेल्या बेमुदत संपात महाराष्ट्रातील सर्वच कर्मचारी उतरले आहेत
कलेक्टर ऑफिस १००% बंद
जिल्हा परिषद १००% बंद
सर्व SDO ऑफिस १००% बंद
सर्व तहसिल कार्यालय १००% बंद
सर्व पंचायत समित्या १००% बंद
सर्व शासकिय कार्यालये.१००% बंद
आणि आपल्या शिक्षक बंधु भगिनिंचा सहभाग मात्र कमी प्रमाणात आहे ही वस्तुस्तिथी आहे, शिक्षक वगळुन सर्व कर्मचार्यांना आश्वासीत प्रगती योजना लागु झाली , सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हफ्ता शिक्षक सोडुन सर्वांना मिळाला कारण आपली एकजुट कमी पडतेय आपला संघर्ष कमी पडतोय ही वस्तुस्तिथी.
आपला संपातील सक्रिय सहभाग पाहिला तर शिक्षक संघटीत नाहीत हा संदेश जाऊ शकतो बाकी सर्वंगाचे १००% कर्मचारी संपात असतांना आपण कमी पडतोय
आजपर्यंतच्या संपात कोणावरही कार्यवाही झाली नाही
कारणे दाखवा नोटीस आपल्याला घरपोच आली तर घ्या , कुणीही उत्तर देण्याची आवश्यकता नाही
IAS अधिकारी सोडुन सर्वच अधिकारी कर्मचारी संपात आपल्या सोबत आहेत
ज्या कार्यालयातील कामकाजाचा शासनावर परिणाम होतो अशी कार्यालये संपामुळे १००,% बंद आणि आपल्या शाळा मात्र सुरु हे योग्य नाही यातुन आपण संघटीत नाही हा संदेश जाऊ शकतो
१९७८ च्या संपात आपले जेष्ठ बांधव निकराने लढले म्हणुन महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वेतन व महागाई भत्ता आणि पेन्शन मिळाली
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
आज जर आपण लढलो तर आपल्यासह सर्व लहान बांधवांना पेन्शन मिळेल आणि आपल्या लढाईची नोंद इतिहसात नक्कीच होईल
शासन कर्त्यावर धाक असणाऱ्या राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या माध्यमातुन आपण लढत आहोत त्यामुळे कशाचीही भिती नाही
डर के आगे जित है........
इतिहास हा फक्त लढणाऱ्यांचाच लिहला जातो त्यामुळे निर्भयतेने आतापासुन संपात सहभागी व्हा
अभी नही तो कभी नही
एकच मिशन- जूनी पेन्शन
🙏🙏🙏🙏🙏🙏
हाजीसाहेब मुजावर सांगली माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन
राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कामगार कर्मचारी समन्वय समितीच्या बेमुदत संपाचा आज पाचवा दिवशी जत तालुक्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी
सकाळी १०वाजता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी जुनी पेन्शन न्याय मागणी आहे. ती लागू होण्यासाठी आम्ही जोरात पाठपुरावा करू असे सांगितले. मोर्चा कर्मवीर पुतळा -जिल्हा परिषद- राममंदीर चौक – कॉंग्रेसभवन - स्टेशन चौक ते राजवाडा या मार्गे संपन्न झाला. मोर्चाचे पहिले टोक राजवाडा चौक व शेवटचे टोक कर्मवीर पुतळ्याजवळ एवढ्या प्रदिर्घ अंतरावर रस्त्यात मोर्चेक-यांची तुडुंब गर्दी होती. कर्मचाऱ्यांचा जनसागर पाहून सांगलीकर अवाक झाले होते. सांगली शहरात असा विराट मोर्चा अद्याप झाला नव्हता. असे जुने जाणकार मंडळी बोलत होते.
गेली महिनाभर पृथ्वीराज पाटील यांच्या यशोधन सेवा व संपर्क कार्यालयातुन पृथ्वीराजबाबा हे नियोजन सुत्रे हलवत होते. मोर्चात एकच मिशन - जुनी पेन्शन मजकुराच्या हजारो टोप्या घातलेले कर्मचारी भर ऊन्हात जुनी पेन्शन संदर्भात असंख्य घोषवाक्यांचे फलक घेऊन शासनास इशारे देत होते. सभास्थानी स्टेज व बैठक व्यवस्था, पाण्याची उपलब्धी व्यवस्था चोख होती. प्राथमिक उपचार सेवेसाठी दोन व्हॅन सज्ज होत्या.
हा अभुतपुर्व मोर्चा यशस्वी व दखलपात्र झाला. यामध्ये विविध शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या संघटनांचे राज्य विभाग, जिल्हा व स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीचे निवेदन निमंत्रक पृथ्वीराज पाटील, आ. विक्रम सावंत, अमोल शिंदे, प्रा. एन. डी. बिरनाळे, राजेंद्र नागरगोजे, अरविंद जैनापुरे यांनी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांच्याकडे दिले.सांगलीत एवढा भव्य मोर्चा पहिल्यांदाच निघाला आणि जुन्या पेन्शनचा मुद्दा ऐरणीवर आला आहे
💠🔴💠🔴💠🔴💠🔴💠🔴
सांगली माध्यमिक शिक्षक संघाचे ( फेडरेशन ) अध्यक्ष हाजीसाहेब मुजावर.सचिव बळीराम कसबे.उपाध्यक्ष अरविंद मेनगुदले. एन. डी. कांबळे.सहसचिव पाटील मॅडम. प्रसिद्ध प्रमुख सुभाष शिंदे सर.व चंद्रकांत ऐवळे. भारत गवंडी.अमिन शेख. बाळासाहेब बारगीर सर. जगताप सर. शिवाजी देसाई.सुदाम वाघमारे.लालासाहेब वाघमारे. इत्यादी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.
Comments
Post a Comment