जत नगरीत युगपुरुष शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण भव्य सोहळा संपन्न!



 जत नगरीत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
जत नगरीत  छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी भव्य दिव्य दिमाखात झाला. सांगली जिल्हयाचे पालकमंत्री श्री.सुरेश खाडे, खासदार श्री.संजय पाटील, माजी जलसंधारण मंत्री आमदार श्री.जयंत पाटील, माजी आमदार श्री.विलासराव जगताप, आमदार  श्री.विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळा समितीचे पदाधिकारी, हजारो शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत झाला.
गतवर्षी शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी प्रशासन व पुतळा समिती यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. तद्नंतर पुतळा समितीच्या वतीने रितसर सर्व होते. विभागांच्या परवानगी घेण्यातआल्या.
 पुतळा समितीचे अध्यक्ष व माजी आ. विलासराव जगताप यांनी दि. १७ फेब्रुवारीरोजी पुतळ्याचे लोकार्पण करण्याची घोषित केले होते. अखेर लोकार्पण सोहळा झाला. यावेळी जिल्ह्याचे खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आ. विक्रम सावंत, जत राजघराण्याच्या ज्योत्सनाराजे डफळे, सेनेचे संपर्कप्रमुख योगेश जानकर, रिपाईचे संजय कांबळे, डॉ. रवींद्र आरळी राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, उमेश सावंत, संतोष मोटे आदी उपस्थित
प्रास्ताविकात माजी आमदार
विलासराव जगताप म्हणाले की, हा पुतळा बसवण्यासाठी आम्हाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. छत्रपती हे रयतेचे राजे होते. त्यांनी न्याय व निष्ठेला नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये मुस्लिम सरदार व सर्व जाती-धर्मांना त्यांनी सामावून घेतले होते. साडेतीनशे वर्षानंतरही आज छत्रपतींचे होणार आहे. नाव प्रत्येकाच्या ओठात आहे.
यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे म्हणाले की, हा माझा पहिला मतदारसंघ आहे. त्यामुळे मी जत तालुक्याला जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ योजना ही सौरऊर्जेवर राबविण्यासाठी शासनाची परवानगी मिळाली आहे. 

माजी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले की, लवादामुळे कृष्णा आणि कोयना या योजनेत पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे वारणा खोऱ्यातून जतसाठी सहा टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले. दोन-तीन वर्षात या योजनेमुळे जत तालुका हिरवागार करणार!
खा. संजय पाटील म्हणाले, अनेक वर्षापासून शिवरायांचा पुतळा जत शहरातील शिवाजी पेठेत व्हावा, अशी शिवप्रेमींची इच्छा होती. परंतु काही अडचणी येत होत्या. या अडचणी गतवर्षी दर केल्या. त्यानंतर रितसर परवानगी घेऊन आज या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.

Comments