मारठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
💠💐💠💐💠💐💠💐💠💐
दि.२७ फेब्रुवारी २०२३
🔵कविवर्य कुसुमाग्रज जयंती 🔵
मराठी राजभाषा दिन
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स जत मध्ये कवी कुसुमाग्रज यांची जयंती (मराठी राजभाषा दिन) आज दिनांक २७/०२/२०२३ वार सोमवार रोजी समारंभपूर्वक साजरी करण्यात आली.
पर्यवेक्षक श्री.माळी एम.एस. व आजच्या अध्यक्ष कु.अदिती कदम, प्रमुख वक्ता कु.साक्षी चौगुले व ज्येष्ठ शिक्षक श्री.चौगुले सरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले .यावेळी विद्यार्थी,विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले व कुसुमाग्रज यांची कविता तालासुरात गायली.प्रशालेचे पर्यवेक्षक श्री .माळी सरांनी सर यांनी सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या समारंभाचे संयोजन इयत्ता -८वी तु.अ व वर्गशिक्षिका: सौ.काळे मॅडम यांनी केले. या समारंभाचे पाहुणे कु. साक्षी चौगुले ,अध्यक्ष कु. अदिती कदम व सूत्रसंचालन कु. विक्षालाक्षी कोळी हीने केले . मराठी विभाग प्रमुख श्री.अमोल जोशी,श्री.पंडित कांबळे, मराठी विषय अध्यापक : सौ.कोळसे मॅडम,सौ.सुर्यवंशी मॅडम,की.हल्याळ मॅडम,श्री.बहिरम सर,श्री.सुभाष शिंदे यांनी सक्रीय सहभाग घेतला.
याप्रसंगी सर्व स्टाफ ,विद्यार्थी - विद्यार्थिनी आदी उपस्थित होते .सर्वांचे
आभार की.चैत्राली परीट हीने मानले.अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.
💠जन्म - २७ फेब्रुवारी १९१२ (पुणे)
💠स्मृती - १० मार्च १९९९ (नाशिक)
विनम्र आदरांजली!
'अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला' असे स्पष्टपणे सांगणारी अजरामर कविता लिहिणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म पुण्यात झाला. वि.वा. शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करत. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्नवं असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्या नंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणाऱ्या आणि आपला ठसा उमटविणाऱ्या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रज यांचे वडील शेतकरी होते. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.
कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि ’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तीचे परखड बोलही त्यांचेच. या महान साहित्यिकाचा काव्यव्यासंग अथांग असला तरीही कुसुमाग्रजांचे नाव घेताच डोळ्यापुढे उभा राहतो तो एक ओजस्वी क्रांतिकवी आणि कानी ऐकू येतो गगनभेदी जयघोष, ’गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’. कवी कुसुमाग्रज हे खऱ्या अर्थाने ’क्रांतिकवी’. वयाच्या अवघ्या विशीत कुसुमाग्रजांनी अनेक तेजस्वी क्रांतिकाव्ये लिहिली.
अशा या कुसुमाग्रजांना विनम्र आदरांजली!
💠💐💠💐💠💐💠💐💠💐
✨️मराठी राजभाषा दिन ✨️
२७ फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आज जत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स जत या विद्यालयातही हा कार्यक्रम समारंभपूर्वक साजरा करण्यात आला.ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, मराठी साहित्यिक, कवी, नाट्यलेखक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष,श्री.ए. बी.होवाळे व मराठी विषयाचे अध्यापक श्री. व्ही पी. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले . या कार्यक्रमाचे स्वागत श्री. ए.सी. माळी यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस.एस बाबर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व अध्यापक, शिक्षककेतर सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment