जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत मध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

🌼शिवजयंती समारंभ🌼
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जत मध्ये आज  रविवार,दि.१९ फेब्रुवारी ३०२३ रोजी सकाळी ठीक ०७:३0 वाजता महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती समारंभपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इ. ६वी अ च्या, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी नियोजन व सादरीकरण केले. 
या प्रसंगी प्रशालेतील काही विद्यार्थी विद्यार्थिनींना आपली मनोगते व्यक्त केली.विशेष कु.वैष्णवी शिंदे हीने (वेशभूषा सह) शिवजयंती निमित्त मनोगत व्यक्त केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक: श्री.होवाळे ए. बी. , पर्यवेक्षक श्री.माळी एम.एस., ज्येष्ठ अध्यापक  श्री.चौगुले सर,श्री. कांबळे सर, सौ. कोळसे मॅडम उपस्थित होत्या. 
तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
शिवरायांच्या जयघोषात कार्यक्रम  संपन्न झाला.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏💠💠🙏🙏💠💠🙏🙏

Comments