लायन्स क्लब ऑफ जत अध्यक्ष मा.ला.डाॅ. रवींद्र आरळी जत तालुक्यातील एक उच्च शिक्षित सुसंस्कृत नेता !
डॉ. आरळी यांना समाजकारणाची आवड पहिल्यापासूनच होती. जत शहरात लायन्स क्लबची स्थापना प्रथम त्यांनीच केली. या लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यात वृक्षारोपण, एडस् विषयावर व्याख्याने, आरोग्यावर व्याख्याने तसेच दुष्काळात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाटप, ब्लँकेट वाटप आदी उपक्रम राबविले. लायन्स क्लबच्या माध्यमातून जत तालुक्यात दुष्काळ काळात बरीच कामे झाली आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यात त्यांचाही हातभार लागला आहे.
डॉ. रवींद्र आरळी
यांनी आहारशास्त्र, आरोग्य, स्त्रियांचे आजार, अंधश्रद्धा, आजाराबाबत व आरोग्याबाबतचे अज्ञान, कॅन्सर अशा अनेक विषयांवर हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. महिलांच्या आरोग्यविषयक शंका व गैरसमज या विषयावर त्यांनी समज-गैरसमज हे अतिशय माहितीपूर्ण व संग्रही ठेवावे असे पुस्तक लिहिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत स्त्रीरोग, वंध्यत्व, नेत्ररोग, दंतरोग, मधुमेह, ज्येष्ठांची तपासणी अशी अनेक मोफत शिबिरे, रक्तदान शिबिरे, मोफत औषध वाटप असे सामाजिक उपक्रम राबविले आहेत, ग्रामीण भागात आरोग्य विषयक व्याख्यानमाला अखंडपणे चालवून राज्यातील अनेक तज्ञांचे मार्गदर्शन जतकरांसाठी उपलब्ध करून दिले आहे. लायन्स क्लब, लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, जीवनरेखा ब्लड बँक, बसवेश्वर शिक्षण संस्था, उमा इन्स्टिट्यूट आफ नर्सिंग एज्युकेशन, उमा इंग्लिश मीडियम स्कूल, धनलक्ष्मी पतसंस्था, उमा चॅरिटेबल ट्रस्ट, शांताबाई शिवशंकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,जत, सिनर्जी सुपर स्पेशलिटी हास्पिटल, मिरज, शांताबाई आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल व कालेज, जत अशा अनेक संस्थांचे ते संस्थापक आहेत. वैद्यकीय व्यवसाय अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळून त्यांनी यशाची अनेक शिखरे सर केली आहेत. एक राजकारणी म्हणून ही त्यांचे काम अतिशय आदर्शवत असे आहे. भाजपचे ते सुरुवातीपासून एकनिष्ठ सभासद आहेत .भाजपचे तालुकाध्यक्ष ,जिल्हा उपाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष, सांगली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. अतिशय व्यस्त असतानाही त्यांनी केलेली समाजसेवा, विविध उपक्रम हे खरेच न उलगडणारे कोडे आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे म्हणून डॉ. रवींद्र आरळी म्हणजे एक किमयागार आहेत.
उच्चशिक्षित होऊन काही जण शहरात जातात.पण डॉ.आरळी साहेब त्यांनी तसे केले नाही.जत मध्ये राहून सर्व क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करावा तेवढा थोडाच आहे.
लायन्स क्लब ऑफ जत ची स्थापना करून त्यामधून त्यांनी राज्यातील तज्ज्ञ व्यक्तींना जत मध्ये आणले. विविध उपक्रमांची
राज्यस्तरीय नोंद घेतली गेली .
त्यांनी नवीन प्रकल्प, उपक्रम घेतला नंबर त्यांच्या अभ्यास करूनच राबविण्यात त्यामुळे त्यांचा फायदा होतो .
Comments
Post a Comment