जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत.स्काऊट-गाईड विभागाने खरी कमाई महोत्सव उपक्रम आयोजित केला...!
💠 स्काऊट -गाईड विभागावतीने
खरी कमाई महोत्सव उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
जत: शनिवारी,दि.७ जानेवारी ,२०२३रोजी जत हायस्कूल, जत च्या पटांगणात स्काऊट -गाईड विभागाने खरी कमाई महोत्सव -२०२३आयोजन करण्यात आले होते.स्काऊट-गाईड विभाग प्रमुख श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर यांच्या नेतृत्वाखाली सुयोग्य नियोजन करण्यात आले. कु. हल्याळ बी.बी. गाईड कॅप्टन यांनी स्काऊट -गाईड यांना विविध पदार्थ,स्टाॅल मांडणी,सजावट यांची माहिती दिली. उपक्रमांचे स्टाॅल मांडणी, व्यासपीठ संपूर्ण नियोजन श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर यांनी केली.
स्काऊट -गाईड यांनी २० स्टाॅल ची मांडणी केली. स्वतः बनवलेल्या विविध पदार्थ विक्रीसाठी सज्ज झाले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.बी.होवाळे साहेबांच्या हस्ते लाॅर्ड बेडन पाॅवेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून खरी कमाई महोत्सव -२०२३ यांचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी पर्यवेक्षक श्री.एम.एस.माळी.श्री.चौगुले सर,श्री.स्वामी सर,श्री.तळसंगी सर,श्री.तंगडी सर,श्री.शेख सर,व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांचे स्वागत श्रीसुभाष शिंदे यांनी केले.
या उपक्रमाचे कौतुक मा.श्री.होवाळे ए.बी., मुख्याध्यापक यांनी केले.
हा उपक्रम राबविला म्हणून श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर,हल्याळ बी.बी., गाईड कॅप्टन यांच्या गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
खरी कमाई महोत्सव -२०२३सर्व शिक्षक, शिक्षिका पालक बंधू-भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.
स्काऊट -गाईड यांना खरी कमाई महोत्सव एक विशेष जीवनशैली दिशा देणारा ठरला!
शेवटी हल्याळ बी.बी.गाईड कॅप्टन यांनी सर्वांचे आभार मानले.
अशा तऱ्हेने खरी कमाई महोत्सव -२०२३संपन्न झाला.
श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर हे जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत येथे कार्यरत आहेत.जिल्हा, राज्यस्तरीय स्काऊटस् म्हणून विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांचे स्काऊट मध्ये हिमालय वुड,H.W.B. झाले आहे.स्काऊट राज्य मेळावा, स्काऊट राज्य पुरस्कार मध्ये त्यांचे अनेक स्काऊट हे राज्य पुरस्कार प्राप्त आहेत. राजभवन येथे पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर हे सांगली जिल्ह्यातील स्काऊट, गाईड राज्य पुरस्कार प्राप्त त्यांच्या नेतृत्वाखाली संघ घेऊन राज्यभवन मुंबई येथे त्यांची निवड झाली होती.
सांगली जिल्हा परिषद व सांगली भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय, सांगली आयोजित :कब, बुलबुल, स्काऊट, गाईड जिल्हा मेळावा ते अॅडव्हास पार्टी लिडर म्हणून गेली ९वर्ष कामकाज बघतात. सांगली कार्यालयात ते A.D.C. व अर्थ विभागाचे सदस्य म्हणून कामकाज पाहिले आहे. जिल्हा व राज्य स्काऊट व गाईड विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो.
सांगली जिल्हा मध्ये उजळणी वर्गात त्यांची व्याख्याने झाली आहेत. स्काऊट व गाईड यांची नोंदणी मध्ये वाढीसाठी नेहमीच प्रयत्न करीत असतात.
🔵 श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर यांना जिल्हा, राज्यस्तरीय विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त आहेत.
💠💐💠💐💠💐💠💐💠💐
Comments
Post a Comment