शाहिर सम्राट बापूराव विभूते यांचे पुत्र शाहिर आदिनाथ विभूते यांना भावपूर्ण श्रद्धांजली!🙏🙏💐💐💐🙏🙏
महाराष्ट्रात शाहिरी कलेचे विशेष योगदान !
देणारे ...शाहीर सम्राट आदिनाथ विभूते(बुधगाव) यांची प्राणज्योत मालवली.. महाराष्ट्राच्या अभिजात शाहिरीच्या संगोपन आणि संवर्धनासाठी विभूते परिवाराचे मोलाचे योगदान! आहे..शाहीरसम्राट आदिनाथ विभूते शाहीरीक्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
लहानपणापासून शाहीर सम्राट बापूराव विभूते यांनी शाहीरी कलेच्या ज्ञान- अमृत सर्व पुत्रांना दिले.या शाहीरी कला चा वारसा लहानपणापासून सहजपणे त्यांच्या कडे होता. भारदस्त वडिलांच्या प्रमाणे आवाज ही एक त्यांनां देणगी होती.लहानपणापासून वडिलांच्या कार्यक्रमात साथ देणे.विविध वाद्ये वाजवण्याची जादु त्यामध्ये होती. त्याच कार्यक्रमात आपले काही कार्यक्रम करत असे! शाहीर सम्राट बापूराव विभूते यांनी सर्व शिष्यांना पुत्रा समान मानत आणि शाहिर कलेचे शिक्षण सर्वांना समान दिले म्हणून शिष्य परंपरा मध्ये सर्वजण समान असं!
पुढे ,पुढे शाहीर आदिनाथ विभूते हे स्वतः कार्यक्रम करत असत.त्यांच्या पण नावांच वलय गाव, तालुका, जिल्हा शेवटी राज्यात नव्हे तर परदेशातही नाव होतं!
शाहिर कलेसाठी शिवाजी विद्यापीठ शाहीर सम्राट बापूराव विभूते यांच्या नंतर शाहीर आदिनाथ विभूते यांनी अध्यापन कले.शाहीरी कलेचे शिक्षण देण्याचे कार्य केले आहे.हे विसरता कामा नये. प्राचार्य पी.बी.पाटील यांनी शाहिरी कला प्रशिक्षण अभ्यासक्रम शांतिनिकेतन येथे सुरू केला.तेव्हा शाहीरी कला प्रशिक्षण शाहिर सम्राट बापूराव विभूते यांच्या नंतर शाहिर आदिनाथ विभूते यांनीहे कार्य सहजपणे केले.त्यावेळी मानधनाची अपेक्षा केली.
त्यांनी शाहीरी कलेसाठी केलेलं योगदान महत्त्वाचे आहे ! शाहीर आदिनाथ विभूते हे आपल्या मध्ये नाहीत.पण शाहिरी कलेच्या रूपाने सदैव आपल्या जवळच आहेत. त्यांचा पुत्र शाहीर प्रसाद विभूते हा विभूते घराण्याची शाहिरी कला वैभवाची ध्वज घेऊन आपल्या आजोबा़ंचे कार्य, वडिलांचे कार्य नक्कीच करेल ! तो उच्च शिक्षित शाहीर आहे !
शाहीर आदिनाथ विभूते हा माझा लहानपणापासून मित्र होता.
माझे वडील कै.सदाशिव शिंदे हे शाहिर सम्राट बापूराव विभूते यांचे कडे हामोर्नियम वादक होते.त्यामुळे मी पण त्यांच्या घरी येणे ,जाणे असे.या सर्व आठवणी डोळ्यासमोर येतात.....
शाहिर आदिनाथ विभूते यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
🔘 श्री.सुभाष शिंदे, बुधगाव
कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत
💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏🔴
🔵जत हायस्कूल,जत मध्ये शाहिरी कलेचा कार्यक्रम शाहीर सम्राट आदिनाथ विभूते,पुत्र शाहीर प्रसाद विभूते यांनी केला होता.
🔵जत हायस्कूल,जत मध्ये शाहिरी कलेचा कार्यक्रम शाहीर सम्राट आदिनाथ विभूते,पुत्र शाहीर प्रसाद विभूते यांनी केला होता.
🔵न्यू इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,माडग्याळ चा विद्यार्थी, बालशाहीर शिवतेज महादेव जाधव ला यांनी शाहीरी कलेचे लहानपणी शिक्षण शाहीर आदिनाथ विभूते यांनी दिले होते.
शाहीर आदिनाथ विभूते हे जत तालुक्यातील विविध गावांमध्ये शासनाचे, व्यक्तीगत कार्यक्रम केले होते.
अशा या शाहीरी कलेचा उपासकला मानाचा मुजरा!
त्यांच्या स्वर्गीय आत्म्यास चिरशांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
मुख्याध्यापक,पर्यवेक्षक अध्यापक,अध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग.
जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत
न्यू इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,माडग्याळ या.जत जि.सांगली.
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
🙏💐🙏💐🙏💐🙏💐
Comments
Post a Comment