हार्दिक अभिनंदन!
डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वर शाखा जत.सांगली जिल्ह्यातील २२ विद्यार्थ्यांमध्ये जत हायस्कूल,जतच्या हा एक विद्यार्थी:
अमेय सारंग कापरे, इयत्ता -९वी तु.अ याची डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट प्रक्षेपण वाहन प्रशिक्षण वर्ग, पुणे येथे निवड झाली आहे.
तसेच डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वर शाखा -जत तालुका समन्वयक श्री.सुभाष शिंदे यांची निवड झाली आहे .
⏰📅⚒️🔩📅⏰🛠️🔧⏰📅
Dr .APJ Abdul Kalam Satellite Launch Vehicle Mission 2023
लोकमत
सांगली
सांगली जिल्ह्यातील 22 मुलांसाठी तयार होणार लहान उपग्रह
महापालिका, जि. प.च्या विद्यार्थ्यांना संधी; तामिळनाडूतून प्रक्षेपण
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका व जिल्हा परिषद शाळांतील २२ शालेय विद्यार्थी लघुउपग्रह तयार करणार आहेत. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सैटेलाईट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३ अंतर्गत हा उपक्रम राबविला जाईल.
१९ फेब्रुवारीरोजी तामिळनाडूतील पत्तीपूरम येथून देशभरातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले १५० लघु उपग्रह अवकाशात सोडले जातील. हे रॉकेट एकदा वापरून झाल्यावर त्याच क्षमतेने पुन्हा वापरता येणारे आहेत. यासाठी देशभरातील ५००० विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. एकदिवसीय
किटच्या साहाय्याने
हे विद्यार्थी बनविणार लघु उपग्रह
महापालिका शाळांतील माहेश्वरी नंदगावी, पुष्पा हिरेमठ, स्फूर्ती पोतकुळे, श्लोक गोरे, प्रेम हरिजन, सूरज पुकळे, आरती चौधरी, स्वाती कांबळे, स्वरांजली वांडरे, यश दुधाळ हे विद्यार्थी उपक्रमात सहभागी आहेत. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी असे सोहम हुळळे, रोहित तायगुडे, वेदांत जाधव, सिध्दांत गुरव, नेत्रा मगदूम, अमेय सारंग खापरे(जत हायस्कूल,जत), हर्ष मोरे, रेहान फरीद, मृगांक अहीर, यश संकपाळ, शार्थी कोरे व निब्बाण लव्हटे,
कार्यशाळेत उपग्रह बनवून घेतला जाईल. या स्पर्धेत क्षमता सिद्ध केलेल्या १०० मुलांची निवड चेन्नई येथील कार्यशाळेत रॉकेटच्या निर्मितीसाठी जाणार आहे. केली जाईल.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड व केल्याने एकेआयएफ अशा
जागतिक
पातळीवरील संस्था या वैश्विक प्रकल्पाची नोंद घेणार आहेत. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्र दिले
मोहिमेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला १५ हजार रुपये शुल्क आहे, पण चेन्नई येथील एका संस्थेने स्पर्धा पुरस्कृत नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद,
शासकीय अनुदानित शाळांतील आर्थिक मागास मुलांना विनाशुल्क सहभागाची संधी मिळाली आहे. महापालिका शाळांतील १० व जिल्हा परिषदेच्या शाळांतील १२ मुले-मुली सहभागी झाले आहेत.
प्रकल्पासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, उपशिक्षणाधिकारी माधुरी गुरव यांच्यासह महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार, प्रशासनाधिकारी गीता शेंडगे, गजानन बुचडे, दिनकर अदाटे, सतीश कांबळे, नीतेश लव्हटे, विजय मगदूम, मारुती शिरतोडे, सुभाष शिंदे ,जत, दिलीपकुमार कांबळे, नूतन परीट, आदी परिश्रम घेत आहेत.
💠 जत तालुका समन्वयक,
डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वर शाखा, जत ,
Comments
Post a Comment