नतुन वर्षाच्या सुरुवातीला स्वागत करताना मनी दाटला भावना मनी!


भले बुरे जे घडून गेले,
विसरून जाऊ सारे क्षणभर,
जरा विसावू या वळणावर, 
या वळणावर!*
सुधीर मोघेंच्या या ओळी मला नेहमीच विचार करायला भाग पाडतात. आपल्या जीवनप्रवासाशी अगदी निगडीत असलेलं हे गाणं. जीवन जगताना आपल्या आयुष्यात कितीतरी चांगल्या वाईट घटना घडतात, ज्यांना आपण मनाच्या कप्प्यात कैद करून ठेवलेलं असतं. आनंद, दुःख, यश, अपयश अनेक अनुभवांची इथे दाटी असते. त्यात रुसवे-फुगवे, हेवे-दावे, मान-अपमान तर जळू चिकटावी तसे चिकटलेले असतात आणि आत खोलवर ते आपल्याला जखमी देखील करत असतात, आतल्या आत आपण रक्तबंबाळ झालेलो असतो, पण अशा वेळी थोडं थांबून उगाच त्रास देणाऱ्या या आठवणीरुपी अनेक घटना आपण काढून टाकल्या तर हा जीवनप्रवास आणखीन आनंदी करता येईल; नाही का?
         जीवनप्रवासात प्रत्येक वळणावर आपल्याला वेगवेगळ्या  व्यक्ती भेटतात. काही क्षणभर, काही तासभर, काही ठराविक काळासाठी तर काही आयुष्यभरासाठी. मग या सगळ्यात कधी आपल्याला आनंदाचे क्षण मिळतील, तर कधी दुःखाचे, कधी अभिमानाचे तर कधी मानहानीचे. कधी त्रास होईल तर कधी पश्चाताप, कधी कृतज्ञतेच्या भावनेने तुम्हीं भरून जाल. 
         हे मी आज का बोलतेय असा प्रश्न तुम्हांला पडलाय ना?२०२२ संपायला आता फक्त काही तास बाकी आहे. आता नवीन वर्षांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, हो ना. नवीन वर्षांत प्रवेश करण्यापूर्वी थोडं थांबून आत्मपरीक्षण करूयात का?
सुधीर मोघे म्हणतात तसं, या वळणार थोडं विसावूया, थोडं थांबुन आत्मपरीक्षण करूया. जे चांगलं उत्तम झालं त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करूया, पण जे वाईट झालं, ज्याचा त्रास झाला, मनस्ताप झाला ते इथेच सोडून रिते होऊया. आपलं चुकलं असेल तर माफी मागूया, तुमच्या बाबतीत कुणी चुकीचं वागलं असेल तर माफ करूयात आणि पुढे जाऊयात. आता मोकळे रिते होऊन पुढे गेलो तरच पुढचे आनंदाचे क्षण आपण टिपू शकू, होना..?
             'दिस जातील, दिस येतील' या ओळींप्रमाणे दिवस येतील, दिवस जातील..... वर्षांमागून वर्ष सरत जातील. 
पुढच्या आयुष्याच्या बागेचं नंदनवन करायचं असेल तर या वळणावर खरंच थोडं थांबुया आणि विचार करूया, नविन वर्ष २०२३ अतिशय आनंदाने  राहण्याचा.
येणाऱ्या नविन वर्ष २०२३ साठी खूप खूप शुभेच्छा.💐💐💐
 🔵सन-२०२३या स्वागत करताना माझा मित्र श्री.संजीव नलवडे, कलाशिक्षक हा सेवानिवृत्त झाल्यामुळे तो आजच्या दिवशी त्याला निरोप देण्याची वेळ आज माझ्या वर वेळ आली....!,मला खूपच वाईट वाटले. माध्यमिक शाळेपासून आणि नोकरी जत मध्ये एकूण ५० वर्षाचा प्रवास हा आमचा सुरू होता. आनंद,दु:ख प्रसंग अनुभवले , भांडण रूसणे, वेळप्रसंगी एकमेकांना मदतीला धावून जाणे, संजू.. आता भेट केंव्हा होऊन सांगता येत नाही.
  

Comments