भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६वा महानिर्वाण दिनानिमित्त जत हायस्कूल,जत मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जत हायस्कूल जत येथे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संपन्न.
दि.फ्रेंड्स असोसिएशन जत संचलित, जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत येथे, ६ डिसेंबर २०२२ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन,समारंभ पूर्वक संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, मा. श्री. ए.बी. होवाळे तसेच उच्च माध्यमिक कला विभागाचे प्रमुख मा. श्री नंदकुमार गुरव यांनी केले. इयत्ता अकरावी कला शाखेत शिकणारी कु. लक्ष्मी शिंदे या विद्यार्थिनीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, माननीय श्री. ए.बी होवाळे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व्यक्त केले. तसेच आजच्या तरुण पिढीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येयाप्रत वाटचाल करावी,असा संदेश आपल्या मनोगतातून दिला. त्याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून उच्च माध्यमिक कला विभागातील विद्यार्थ्यांनी वर्ग स्वच्छता,हा उपक्रम आज राबविला त्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा. श्री नंदकुमार गुरव यांनी आपले बहुमोल विचार व्यक्त केले. व परिश्रमाने आपल्याला यश मिळवता येते असे ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी श्री सुभाष शिंदे सर यांनी सुंदर फलक लेखन करून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, कलाध्यापक श्री. सुभाष शिंदे,उच्च माध्यमिक कला शाखेचे सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर सेवक बंधू, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. श्री. व्ही.पी. कुलकर्णी यांनी केले,तर आभार श्री एस. एस.बाबर यांनी मानले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर महा निर्वाण दिनानिमित्त उच्च माध्यमिक कला शाखेतील विद्यार्थ्यांनी शालेय वर्ग खोल्यांची सफाई करून कार्यक्रम साजरा केला. या सर्व विद्यार्थी विद्यार्थीनीं व मार्गदर्शन करणाऱ्या अध्यापकांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
🔵 वृत्त: 💠श्री.व्ही. पी. कुलकर्णी 💠श्री. सुभाष शिंदे
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘
Comments
Post a Comment