पुज्य साने गुरुजी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

🔵🙏🔵🙏🔵🙏🔵🙏🔵🙏
💮💮💮💮💮💮💮💮💮💮
     💠  विचारांच्या महिमा 💠

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गायलेला दिसतो. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो; परंतु वेद म्हणजे काय ? वेद या शब्दाचा अर्थ 'ज्ञान' असा आहे. ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. ज्ञानावर उभारलेली ही भव्य संस्कृती आहे.

जीवनाला सुंदर करणारा प्रत्येक विचार म्हणजे वेद आहे. आपले आयुष्य आनंदी व उत्साही कसे राहील, हे आयुर्वेद सांगेल. समाजाचे रक्षण कसे करावे, ते धनुर्वेद सांगेल. समाजाची करमणूक कशी करावी, समाजाला दुःखाचा विसर कसा पडावा, ते गांधर्ववेद सांगेल. हे सारे वेदच आहेत.

विचार नवजीवन देतो. आज निर्मळ विचार व शुद्ध दृष्टी यांची नितांत आवश्यकता आहे. येथे अधीरता नको, उतावीळपणा नको; स्वार्थ नको, आळस नको. निर्मळता हवी असेल, तर खोल अभ्यासाची आवश्यकता आहे. प्रयत्न व कष्ट यांची जरूरी आहे. समाजाबद्दल प्रेम व कळकळ यांची जरूरी आहे. समाजाला सुखी कसे करता येईल, ही तळमळ लागली म्हणजे मग तुम्ही विचार करू लागाल. मग जो विचार स्फुरेल, त्याचा आचार सुरू होईल. हाच विचारांचा महिमा आहे.

- साने गुरुजी

💠💠💠💠💠💠💠💠💠💠
 साने गुरुजी जेव्हा शाळा सोडतात....
१९२४ ते १९३० असे ६ वर्ष गुरुजींनी अंमळनेरला शिक्षक म्हणून काम केले. देशात स्वातंत्र्य आंदोलनाने वेग घेतला. गुरुजींचे मन शाळेत रमेना. पण त्या शाळेचे मुख्याध्यापक गांधीवादी कार्यकर्ते होते. त्यांच्या आणि मुलांच्या प्रेमाला सोडून जाणे शक्य नव्हते. पण अखेर स्वातंत्र्यचळवळीत जाण्याची तीव्र भावना ते रोखू शकले नाहीत.. एके दिवशी पहाटे ते उठले. मुख्याध्यापक गोखले गुरुजींच्या व इतर शिक्षकांच्या घराच्या पायरीवर त्यांनी फुले ठेवली व रेल्वे स्टेशनावर गेले.. गोखले गुरुजी उठले. फुले बघताच त्यांना काय घडले असेल याचा अंदाज आला. ते तसेच धावत रेल्वे स्टेशनावर गेले. रेल्वे उभी होती. गोखले गुरुजी प्रत्येक डब्यात धावत हाका मारत होते. इंजिनच्या मागच्या डब्यात डोक्यावर पांघरून घेवून एक व्यक्ती झोपली होती. गोखले गुरुजींनी पांघरून काढले. गुरुजी उभे राहिले. ते म्हणाले मला जाऊ द्या, आता नाही थांबव दोघेही रडू लागले .. गच्च मिठी मारली.. एका मुख्याध्यापकाचे शिक्षकावर किती प्रेम होते हे हलवून टाकते. रेल्वे निघाली.. मुख्याध्यापक शाळेत आले आणि त्यांच्या नावापुढे 'लेफ्ट' अशी नोंद केली .. अंमळनेरच्या शाळेत गेल्यावर ती नोंद मी बघून आलो... डोळे भरून येतात.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
साने गुरुजी यांची आज जयंती आज 
भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक आणि राष्ट्र सेवा दल माझा प्राण आहे असे सांगणारे साने गुरुजी यांची आज जयंती. पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर इ.स. १८९९ झाला. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. 'श्यामची आई', 'नवा प्रयोग', 'सुंदर पत्रे', 'हिमालयाची शिखरे', 'क्रांती', 'समाजधर्म', 'आपण सारे भाऊ' इत्यादी त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.....
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे....
जयाना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अपवि... समस्ता धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे...
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अपवि... कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे, जगाला प्रेम अपवि...
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे...
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अपवि...
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे...
असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अपवि....
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अपवि...
- साने गुरुजी
💐💠💐💠💐💠💐💠💐💠🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
     पुज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
       🔘श्री.सुभाष शिंदे, अध्यक्ष
साने गुरुजी कथामाला व कला केंद्र,जत.ता.जत जि.सांगली.
     🔘 आखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई,मा.सदस्य
       🔘 महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ कोल्हापूर विभागीय सचिव.
        🔘S Art..New.. Jath
             - Subhash Shinde.
💠 डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वर शाखा जत तालुका समन्वयक.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹
🎖️🌺🎖️🌺🌸💮🙋🎖️🎖️
💠🌸💠💐🎉💠💮💠🎂🎉

     ‌‌
‌‌


Comments