गुगवाड येथे भव्य बुध्द विहार!

"
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵💠💠💠💠💠💠💠💠💠💠
नमो बुद्धाय ! जय भीम"
समस्त बौद्ध अनुयायांना विनंती महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेलगत सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 'गुगवाड 'या गावी आयुष्यमान चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर या बौद्ध अनुयायाने बारा एकर परिसरामध्ये स्वखर्चाने सुमारे 13 कोटीचे भव्य 'बुद्ध विहार' बांधले आहे .या कार्यासाठी सरकारकडून अथवा कोणत्याही अनुयायाकडून एकही पैसा देणगी घेतलेली नाही .तेथील परिसरामध्ये पण काही भंतेजींची कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यांच्यासाठी पाच एकर जागेत आंबा ,चिकू ,केळी ड्रॅगन फूड इत्यादी फळांची झाडे लावण्यात आली आहेत. तसेच तेथे विपश्यना केंद्र ही बांधण्यात येणार आहे. बालक आणि बालिका यांच्यासाठी धम्म शिबिर प्राध्यापक अशोक भटकर सर चालवीत आहेत .दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी पाचशे भंतेजींच्या उपस्थितीत या विहाराचे लोकार्पण झाले आहे.   
🔵 भेट देण्यासाठी मार्ग:
💠 सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील गूगवाड या गावी
बुध्द  विहार आहे.
💠सांगली
💠जत
💠गूगवाड 
🚓🚕🚌🚞🚎🚋🚃🚌🚓🚌
 

Comments